Post has attachment
Krishna the playful child

The Birth of Krishna
Sadhguru recounts how Krishna was born, and explains how he was a remarkable being right from the outset.

Butter pranks
Krishna is famous for his butter thieving activities as a child, and constantly kept the Gopis on their toes. Sadhguru recounts how organised and skillful Krishna was in his endeavors!

The loveable thief
Sadhguru looks at how the very essence of Krishna as a child was his mischievous and playful pranks, and yet, his joyful nature melted everyone’s heart.

Photo

Post has attachment
Maharashtrian bharit
Khandeshi bharit Jalgaon special

Post has attachment
Sangeeta Chaudhari has invited you to Learn and Earn on SLIDE. Learning has never been more fun! Get Interesting content at your fingertips. Install SLIDE and Earn from anywhere! https://42.slde.io/6f19ae85

Post has attachment

Post has attachment
।। ॐ श्री ग़ुरवे नमः ।।
श्री कार्तिकी एकादशी माहिती...

पांडूरंग पांडूरंग पांडूरंग पांडूरंग पांडूरंग पांडूरंग......

एकादशी व्रताचे महत्त्व

अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.

अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।

एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। – पद्मपुराण

अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.

आ. ‘एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या विष्णुतत्त्वामुळे वायूमंडल विष्णुतत्त्वयुक्त लहरींनी भारित असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्त्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते.’ – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६. एकादशीचा उपवास

‘पंधरा दिवसांतून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरिराच्या दोषांना जाळून टाकतो आणि १४ दिवसांत आहाराचा जो रस बनतो, त्याचे ओजात रूपांतर होते; म्हणूनच एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे. एरवी गृहस्थाश्रमींनी मासातील केवळ शुक्लपक्षातील एकादशीचा उपवास करावा, असे आहे; परंतु चातुर्मासात दोन्ही पक्षांतील एकादशीचे व्रत करावे.’
एकादशीचे लाभ

‘पद्मपुराणा’मध्ये एकादशीचे पुढीलप्रमाणे लाभ सांगितले आहेत.

स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।

सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।

न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।

न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । – पद्मपुराण आदिखंड

अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशीला हरिदिन विष्णूचा दिवस, असे संबोधतात.

कार्तिकी एकादशी

या रात्री श्रीविष्णूला बेल वाहतात आणि शिवाला तुळशीपत्र वाहतात. याला `हरिहर-भेट’ किंवा `हरिहर-अद्वैत’ म्हणतात.

कार्तिकी एकादशीला श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र वाहावे
कार्तिकी एकादशीला श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र वाहावे

१. महत्त्व

अ. कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा लंघून (ओलांडून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत !

‘कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का ? एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे (अध्यात्मशास्त्रीय कारण) म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो.

ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्‍या भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून (स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे; कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.’

एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांत एकादशीचे व्रत केले जाते. या व्रताचे महत्त्व आणि त्याचे प्रकार यांविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.

१. देवता

एकादशी या व्रताची देवता श्रीविष्णु आहे

२. प्रकार

एकादशीचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत. ज्या वेळी एका पक्षात हे दोन भेद संभवतील, त्या वेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसर्‍या दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते. शैव लोक स्मार्त एकादशी, तर वैष्णव लोक भागवत एकादशी पाळतात. प्रत्येक मासात दोन, याप्रमाणे वर्षात चोवीस एकादश्या येतात.

आ. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत संकल्पाने विधीपूर्वक चालू करावे लागत नाही.

इ. काळानुसार प्रत्येकातील सत्त्व, रज आणि तम गुणांचे प्रमाण पालटत असते. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता सर्वांधिक असते. त्यामुळे या वेळी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो.

४. व्रत करण्याची पद्धत

एकादशीला काहीएक न खाता केवळ पाणी आणि सुंठसाखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय. ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे. एकादशीला उपवास करून दुसर्‍या दिवशी पारणे करतात.

पुण्यसंचय व्हावा, या सद्हेतूने एकादशीकडे पहाणे अयोग्य आहे. एकादशी व्रत केल्याचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत अन् होणार आहेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात. पहिल्या पंधरवड्यात ‘स्मार्त’ ही शंकराची आणि दुसर्‍या पंधरवड्यात ‘भागवत’ ही विष्णूची एकादशी येते. हिंदु धर्माच्या सर्व मासांतील तिथी चंद्राच्या भ्रमणावर निर्मिलेल्या आहेत. अमावास्या ते पौर्णिमा यांच्या मधल्या पंधरवड्यास ‘शुक्ल पक्ष’ आणि पौर्णिमा ते अमावास्या यातील पंधरवड्यास ‘कृष्ण पक्ष’, असे संबोधतात. यात चांद्रवर्षाप्रमाणे प्रती मासाला दोन एकादशी येतात.

२. गोत्रवध दोषाच्या नाशासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला एकादशी व्रत करण्यास सांगणे

महाभारत युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने ‘गोत्रवध दोषाच्या नाशासाठी काय करावे ?’, असे कृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने ‘एकादशी व्रत केल्याने गोत्रहत्यादोष नाहीसा होईल’, असे त्याला सांगितले. या व्रताचे आचरण केले असता, महापातकाचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील.

३. पौराणिक कथांमध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असून
व्रतवैकल्यांमध्ये लपलेल्या विज्ञानामुळे मानवाचे कल्याण होणार असणे

आपल्या पौराणिक कथांमध्ये एक वैचारिक सूत्र असते. त्याचप्रमाणे त्यांमध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असते. इतकेच नव्हे, तर या व्रतवैकल्यांमध्ये मानवाला कल्याणकारी असे विज्ञानही लपलेले असते.

सरळ रूपाने ‘एकादशी उपवास करा’, असे सांगितले, तर लोक सिद्ध होतातच असे नाही; म्हणून त्यांना पुण्य आणि
मोक्ष यांच्या प्राप्तीसंदर्भात सांगितले जाते. ‘या उपवासांनी सर्व पातकांचा नाश होऊन ऐश्वर्य अन् आरोग्य संपन्नता प्राप्त होईल’, असे लोकांना सांगितले जाते.

४. शरीर निरोगी रहाण्यासाठीही एकादशी महत्त्वाची !

आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले असून या पंचमहाभूतातील पंचतत्त्वे आपल्या शरिरात कार्यरत असतात. या सर्वांचा आपल्या शरिरावर परिणाम होत असतो. वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर (अनिष्ट) परिणाम करत असते. त्यामुळे आपले शरीर निरोगी रहाण्यासाठी एकादशी व्रत करणे महत्त्वाचे आहे.

५. शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे अन्
चंद्राच्या कारकत्वाला प्रतिकार करणे यांसाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक !

‘एकादशीनंतर पौर्णिमा आणि अमावास्या या दोन तिथी येतात. त्या वेळी आकाशात पूर्ण चंद्र आणि अस्तंगत चंद्र असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्याप्रमाणे तो जलावरही परिणाम करतो. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना समुद्राला येणारी भरती-ओहोटी ही चंद्राचा समुद्रातील पाण्यावर होणारा परिणाम दर्शवते. त्याचप्रमाणे भूपृष्ठावरील आणि मानवी शरीरातील पाणी यांवरही चंद्राचा परिणाम होत असतो. शरीरातील जलतत्त्व आणि मन यांवर चंद्राचा परिणाम झाल्यामुळे फेपरे येणे, ‘फिट्स’ येणे, शरीर कमकुवत होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे अन् चंद्राच्या कारकत्त्वाला प्रतिकार करणे यांसाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे.
Photo

Post has attachment
॥ जय मल्हार ॥
बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय म ल्हार॥

हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥
सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥
शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥
आरती करी॥ देवा ओवाळी ॥
नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥
कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥
भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार॥


चंपा शष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
Photo

Post has attachment

गायत्रीमंत्राबद्दल लोकांना खूप कुतूहल असते. पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेकांना ‘ॐ तत्सवितु:’ ही सविता (सूर्य) गायत्री माहिती आहे.

पण अशा एकंदर चोवीस गायत्र्या आहेत असे म्हणतात.
गायत्र्या निरनिराळ्या देवतांच्या निरनिराळ्या असतात. सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही; पण सविता गायत्री हीच मुख्य मानली जाते. ज्या गायत्र्यांचा लोक साधारणत: जप करतात त्या पुढे दिल्या आहेत.

१. सूर्य गायत्री
ॐ तत्सविर्तुवरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि । धीयोयोन:
प्रचोदयात् ।।

२. विष्णु गायत्री
ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि ।
तन्नो विष्णु: प्रचोदयात् ।।

३. महादेव गायत्री
ॐ तत्पुरुषाय विद्महे महा देवाय धीमहि । तन्नो रुद्र:
प्रचोदयात् ।।

४. गणेश गायत्री
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि ।
तन्नो दन्ती प्रचोदयात् ।।

५. आदित्य गायत्री
ॐ भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि ।
तन्नो आदित्य प्रचोदयात् ।।

६. श्रीलक्ष्मी गायत्री
ॐ महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि ।
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ।।

७. पांडुरंग गायत्री
ॐ भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि ।
तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।

८. ब्रह्मा गायत्री
ॐ चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि । तन्नो ब्रह्म: प्रचोदयात् ।।

९. नृसिंह गायत्री
ॐ नृसिंहाय विद्महे वङ्कानखाय धीमहि ।
तन्नो नृसिह: प्रचोदयात् ।।

१०. कृष्ण गायत्री
ॐ देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि ।
तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।

११. अग्नी गायत्री
ॐ सप्तजिव्हाय विद्महे अग्निदेवाय धीमहि ।
तन्नो अग्नि: प्रचोदयात् ।।

१२. इंद्र गायत्री
ॐ सहस्रनेत्राय विद्महे वङ्काहस्ताय धीमहि ।
तन्नो इंद्र: प्रचोदयात् ।।

१३. हनुमान गायत्री
ॐ अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि ।
तन्नो हनुमंत: प्रचोदयात् ।।

१४. राम गायत्री
ॐ भरताग्रजाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि ।
तन्नो राम: प्रचोदयात् ।।

१५. चन्द्र गायत्री
ॐ क्षीरपुत्राय विद्महे अमृततत्त्वाय धीमहि ।
तन्नो चन्द्र: प्रचोदयात् ।।

१६. यम गायत्री
ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि ।
तन्नो यम: प्रचोदयात् ।।

१७. वरुण गायत्री
ॐ जलबिम्बाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि ।
तन्नो वरुण: प्रचोदयात् ।।

१८. राधा गायत्री
ॐ वृषभानुजायै विद्महे कृष्णप्रियायै धीमहि ।
तन्नो राधा प्रचोदयात् ।।

१९. दुर्गा गायत्री
ॐ गिरिजायैच विद्महे शिवप्रियायैच धीमहि ।
तन्नो दुर्गा प्रचोदयात् ।।

२०. पृथ्वी गायत्री
ॐ पृथ्वदेव्यै विद्महे सहस्रमत्र्यैच धीमहि ।
तन्नो पृथ्वी प्रचोदयात् ।।

२१. सीता गायत्री
ॐ जनक नन्दिन्यै विद्महे भूमिजायैच धीमहि ।
तन्नो सीता प्रचोदयात् ।।

२२. षण्मुख गायत्री
ॐ षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि ।
तन्नो षण्मुख: प्रचोदयात् ।।

२३. वैश्वानर गायत्री
ॐ पावकाय विद्महे सप्तजिव्हाय धीमहि ।
तन्नो वैश्वानर: प्रचोदयात् ।।

२४. गौरी गायत्री
ॐ सुभागयैच विद्महे काममालिन्यैच धीमहि ।
तन्नो गौरी प्रचोदयात् ।।

देवी गायत्रीची तीन रूपे मानली जातात.सकाळी ती रक्तवर्णी अक्षमाला-कमंडलुधारिणी ब्राह्मी असते. मध्याह्नी ती शङ्ख, चक्र, गदा धारणकारिणी वैष्णवी असते व संध्याकाळी ती वृषभारूढा, शूळ, पाश, नरकपाल धारिणी वृद्ध शिवाणी असते.
Photo

Post has attachment

Post has attachment


सबसे पहले भगवान विष्णु ने किस पर किया था सुदर्शन चक्र का प्रहारभगवान विष्णु का एक नाम चक्रधर है। इनका यह नाम इसलिए है क्योंकि इनकी उंगली में सुदर्शन नामक चक्र घूमता रहता है। इस चक्र के विषय में कहा जाता है कि यह अमोघ है और जिस पर भी इसका प्रहार होता है उसका अंत करके ही लौटता है।


भगवान विष्णु ने जब श्री कृष्ण रुप में अवतार लिया था तब भी उनके पास यह चक्र था। इसी चक्र से इन्होंने जरासंध को पराजित किया था, शिशुपाल का वध भी इसी चक्र से किया गया था।

श्री कृष्ण अवतार में यह चक्र भगवान श्री कृष्ण को परशुराम जी से प्राप्त हुआ था क्योंकि रामावतार में परशुराम जी को भगवान राम ने चक्र सौंप दिया था और कृष्णावातार में वापस करने के लिए कहा था। लेकिन भगवान विष्णु के पास यह चक्र कैसा इसकी बड़ी ही रोचक कथा है।

इस तरह भगवान विष्णु को मिला सुदर्शन

वामन पुराण में बताया गया है श्रीदामा नामक एक असुर था। इसने सभी देवताओं को पराजित कर दिया। इसके बाद भगवान विष्णु के श्रीवत्स को छीनने की योजना बनाई।

इससे भगवान विष्णु क्रोधित हो गए और श्रीदामा को दंडित करने के लिए भगवान शिव की तपस्या में करने लगे। भगवान विष्णु की तपस्या से प्रसन्न होकर शिव जी ने भगवान विष्णु को एक चक्र प्रदान किया जिसका नाम सुदर्शन चक्र था। भगवान शिव ने कहा कि यह अमोघ है, इसका प्रहार कभी खाली नहीं जाता।

भगवान विष्णु ने कहा कि प्रभु यह अमोघ है इसे परखने के लिए मैं सबसे पहले इसका प्रहार आप पर ही करना चाहता हूं।

Photo

Post has attachment
भगवान विष्णु का एक नाम चक्रधर है। इनका यह नाम इसलिए है क्योंकि इनकी उंगली में सुदर्शन नामक चक्र घूमता रहता है। इस चक्र के विषय में कहा जाता है कि यह अमोघ है और जिस पर भी इसका प्रहार होता है उसका अंत करके ही लौटता है।भगवान विष्णु ने जब श्री कृष्ण रुप में अवतार लिया था तब भी उनके पास यह चक्र था। इसी चक्र से इन्होंने जरासंध को पराजित किया था, शिशुपाल का वध भी इसी चक्र से किया गया था।

श्री कृष्ण अवतार में यह चक्र भगवान श्री कृष्ण को परशुराम जी से प्राप्त हुआ था क्योंकि रामावतार में परशुराम जी को भगवान राम ने चक्र सौंप दिया था और कृष्णावातार में वापस करने के लिए कहा था। लेकिन भगवान विष्णु के पास यह चक्र कैसा इसकी बड़ी ही रोचक कथा है।

Photo
Wait while more posts are being loaded