कधी तो कधी ती....फक्त प्रेम.......... . तोकधी उठायचा ती कधी बसायची तो कधी हसायचा ती कधी रुसायची तो इंग्लिश गाणी ऐकायचा ती मराठी गाणी ऐकायची तो ToM& JerrY पाहायचा ती D.D.L.J मध्ये रमायची त्याने PerFumE दिला तर ती गजरा घेऊन ये म्हणायची मग गजरा हातात दिला तर केसात माळ कर म्हणायची माळता येत नाही म्हणाला की त्याच्यावर चिडायची वैताग आहेनुसता म्हणाला कि खूप रड रड रडायची रात्री अहोरात्री मधेच उठून ती छानसा SmS पाठवायचीआणि नेमका त्याला त्याच वेळेस एकही ओळ पाठवायला नाही आठवायची त्यानेBlaNk SmS पाठवला कि ती त्याच्यावर जामचिडायची आणि मग दुसर्या दिवशी फोनन उचलून त्यालादिवसभर खूप पिडायची त्या संपूर्णदिवशी मग तो एकटा एकटा होऊन राहायचा आला असेल तिचा कुठला SmSम्हणून सारखा सारखा फोन पाहायचादुसर्या दिवशी पहाटेच तिचा फोन इत्यादी असे काही तरी घडायचे चुकले रे माझे माझ्या सोनुल्या असे म्हणून तिच परत रडायची आश्या या रडा-रडीला कारणांची कमी नसतेकोणत्या गोष्टीवरून होईल भांडण कधी काळी याची कधी हमी नसते...--

~ चंद्रकोर तू ~

 वेडावलो मी आज 

 त्या चंद्र कोरीस पाहतांना 

 दिसलीस मजला तू 

 त्यात लाजतांना 

 पाहिले तुझा चेहरा 

 हातांनी झाकतांना 

 मी दिसता तुझ्या 

 अधरांनी गोड हसतांना 

 कसे मोहित केले 

 तू माझ्या लोचनांना 

 मलाही कळले नाही 

 माझे भान हरवतांना 

 बेभान झालो मी 

 तुझ्यावर नजर खिळतांना 

 गंध आला प्रितीचा 

 घेतलेल्या श्वासांना .

 संजय एम निकुंभ , वसई 

 दि. ०८.०२.१३ वेळ : ६.२५ स.

असं झालं नकळत, 
       माझं तिच्यावर प्रेम !
       ह्रधयापासून ,
       ह्रधय तिच्यापाशी ठेवलं,
       त्तिच्या आठवणीना  त्यात साठवून ठेवलं,, 
       त्यात माझी काय चूक।।।।
 असं झालं नकळत, 
       माझं तिच्यावर प्रेम !
       तिच्या हसन्याला मी फसलो 
       दिवस रात्र मग हसतच बसलो 
       त्यात माझी काय चूक।।।।
असं झालं नकळत, 
       माझं तिच्यावर प्रेम !
      तिच्या बोलण्याला मन माझं भूलले,
      ह्रधयातले पाखरू ओठावर खुलले 
त्यात माझी काय  चूक।।।।
असं झालं नकळत, 
       माझं तिच्यावर प्रेम !
       मनापासून,
       मन तिच्यातच गुंतून राहिलं 
      आयुष्यात स्वताला तिच्याविना उदास पहिलं 
त्यात माझी काय चूक।।।।
 असं झालं नकळत, 
       माझं तिच्यावर प्रेम !

माझ्या मनांतील विचार 
   बेलगाम सुटले आहेत 
अंतराळात झेप घेऊन 
   तें सखीस शोधत आहेत ।
मिटल्या पापणीत माझ्या 
   स्वप्नें अनेक तरंगत आहेत  
सखीच्या शोधांत ती 
   खोल अंतरी जात आहेत ।
दीर्घ उसासे श्वास आणि 
   दूर दूर जात आहेत 
हरपलेला गंध सखीचा 
   उपवनांत शोधत आहे ।
विचार गेले स्वप्नं गेली 
   श्वासही बाहेर भटकत आहे 
आश्चर्यही वाटते ही 
   अजून मी जगत आहे ।। रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ... 
Please click on this 
http://www.kaviravi.com/2013/02/love-poem_19.html

तुला पाहिलं अन .............

 तुला पाहिलं 

 अन भान हरवलं 

 कसं सांगू तुला 

 तू चित्त चोरलं 

 तुझ्या सुंदर रुपानं 

 मला वेड लावलं 

 तुझ्याकडे माझं 

 मन धावत सुटलं 

 नयन तुझे जादुगार 

 त्यात मन फसलं 

 पाहता तुझ्या डोळ्यात 

 मन मला विसरलं 

 तुझ्या मुलायम केसांत 

 मन माझं गुंतलं 

 तुझं रूप गोजिरं 

 मनी माझ्या ठसलं 

 तुझ्या गुलाबी ओठांनी 

 मन बेभान झालं 

 तुझं सौंदर्य पाहून 

 हृदय तुझं झालं .

 संजय एम निकुंभ , वसई 

 दि . ०१. ०३. २०१३ वेळ : ७.४५ संध्या.

तु माझ्यापासून दूर
माझ्या हृदयात आठवणींचे पूर
तुझ्या गोड आठवणीच मला
दिवस रात्र स्मरतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

काही क्षण आपण एकमेकांसोबत घालविले
कधी मी तर कधी तु मला हसविले
पण थोडयाश्या आठवणीही जेव्हा
हृदयात खोल रुततात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

आपण एकमेकांना भेटलो
काही काळ एकमेकांसाठी जगलो
स्वतःसाठी न जगता जेव्हा 
दोन जीव एकमेकांसाठी जगतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

जेव्हा रडू तुला आले की 
अश्रू माझे वाहायचे
जेव्हा हसू मला आले की
डोळ्यात तुझ्या चमकायचे
दुख असो की आनंद
जेव्हा दोघ एकत्र अनुभवतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

प्रेम कधीही होऊ शकते
कोणावरही होऊ शकते
कधी झाडावर तर 
कधी मातीवर होऊ शकते
जेव्हा कुठच्याही नात्याची
मुळे खोलवर रुजतात

ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
ह्यालाच तर प्रेम म्हणतात.... 

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush

स्पर्श 
कुमुदिनी काळीकर 

शब्द हा फुका 
स्पर्श बोलका 
पाठी हात तू 
फिरवशील का 
दु;ख हे मुके 
होई बोलके 
नयनी वाहता अडवशील का 
जखम ही अशी 
काळजातली 
स्प्न्दनातुनी जाणवेल का 
शब्दी शुष्कता 
स्पर्शी आर्द्रता 
तो गारवा मज देशील ना 
स्पर्श हा असा 
शांतवी जीवा 
वाटतो हवा 
श्रान्त या जीवा

Post has attachment
तू आहेसच जगा वेगळी .............सारं ऐश्वर्य 

तुझ्या पायाशी 

लोळण घेत असतांना 

आरस्पानी सौंदर्य 

तुला 

लाभलेलं असतांना 

तू कधीच 

त्याचा टेंभा 

मिरवत नाहीस ...........तू रहातेस शांत , शीतल 

नदीसारखी 

अन हसतेस इतकी गोड 

नुकतीच कळी उमलल्यासारखी 

तुझ्या मनाची सुंदरता 

टपकते तुझ्या वागण्यातून 

इतका गोड स्वभाव कसा 

असं वाटत मनास  राहून राहून ...................तुझ्या त्या स्वभावानच मी 

तुझ्याकडे खेचला गेलो 

मैत्रीचे धागे जुळले तुझ्याशी 

अन तुझा होत गेलो .....

तुझ्या न माझ्या सहवासातल्या 

त्या सुंदर क्षणांनी 

मनी प्रितीचे तार छेडले 

तुझे लांब सडक केसं 

अन कधीतरी घातलेल्या अंबाड्यात 

माझे मन गुंतले ........जेव्हाही पाहिले तुझ्या सुंदर डोळ्यांत 

माझे भान हरपत गेले 

गत जन्माची तूच राधा 

माझ्या मनास कळून गेले 

तुझ्या त्या नयन कटाक्षाने 

मन शिकार झाले 

कळले नाही काळजात 

तू कधी घर केले ...............विश्वासाच्या धाग्यांनी अपुल्या 

मनास जवळ आणले 

जे स्वप्न न पाहिले कधी 

ते ओंजळीत आले 

मला कुठे ठाऊक होतं 

प्रेम म्हणजे काय 

पण तू भेटलीस अन 

मन प्रेमाचे होऊन गेले .......कुठलीही वचने नाहीत 

कुणाला फसवणे नाही 

तरी दोन जीव नकळत 

एक हृदय होऊन गेले 

अशी हि प्रेमाची 

कहाणी आहे वेगळी 

प्रेम झाले तुझ्यावर 

कारण 

तू आहेसच जगा वेगळी .                                     कवी : संजय एम निकुंभ , वसई 

Post has attachment
हलके हळवे
धूसर धुकट
चित्र उमटते
पुसट पुसट .
चित्र लडिवाळ
मधाळ लाजरे
चित्र नखरेल
नाजूक नाचरे .
चित्र थिरकते
लयीत फिरते  
चित्र मनातील
गझल बोलते .
कधी उन्हातील
ओले रिमझिम
कधी जलातील   
शारद चमचम .
कधी श्वासातील
धगधग उष्ण
कधी वेळूतील
तगमग कृष्ण .
प्रियतम तरी
जाते निसटत
रंग नभातील
डोही हरवत .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Post has attachment
Wait while more posts are being loaded