Post has shared content
करंजी.MP3 - व पू काळे
करंजी.MP3 - व पू काळे डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा Music podcasts - Embed Audio Files - Karanji-VaPuKale

मी तुम्हाला हेच सांगणार आहे दुसऱ्याची नजर उधार घेऊ नका .. स्वताच्या नजरेतील ताकद ओळखा , त्याप्रमाणे आपली मत घाईघाईने मांडण्याची चूक करू नका. अनुभवातून बोला , प्रचीती घ्या , कोणताही अनुभव आपल्या प्रचितीचा हिस्सा झाल्यावर जे होत त्यालाच ज्ञान म्हणतात. हे ज्ञान ज्याच त्याला होत, ते तो दुसऱ्याला देऊ शकत नाही .इतरांकडून समजते त्याला माहिती म्हणतात 

"ज्याला गरज निर्माण होते त्याला ती एकदम लाचार, दुबळा बनवते. आणि जो ती गरज पुरवू शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवते."

नियती माणसाला कोणत्या तरी दालनात शिखरावर नेऊन पोहचवते आणि त्याचा, त्या दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी, जीवनाच्या दुसऱ्या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य, अगदी क्षुद्र करून सोडते.
एका माणसाला छोटा करून तो दुसऱ्याला मोठा करत नाही.
तर एकाच माणसात ती त्याला इथं छोटा तर तिथं मोठा करते.

-व. पु

आपण फ़ुलपाखरु व्हायचं हे सुरवंटाने ठरवलं म्हणजे तो आपणहून स्वत:भोवती कोष निर्माण करतो. स्वत:ला कैदेत बध्द करतो. फ़ुलपाखरु होण्यापूर्वी ही त्यानं घेतलेली छोटी समाधीच समजायची.
मग त्याचं आपोआप फ़ुलपाखरू होतं. प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो त्याचं प्रस्थान मनातच हवं. उपदेश लादला जातो तर निश्चय स्विकारलेला असतो.

आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस ’माणूस’ राहत नाही, तर परतून येतं ते चैतन्य..

कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. माणूस स्वतःचं  व्यक्तिमत्त्व  स्वतः घडवीत नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो. विचारांवर छाया पडलेली असते.आई-बाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मुल त्या व्यक्तीवर प्रेम करू लागते.जे आई-वडिलांचे शत्रू तेच त्या मुलाचे शत्रू.ह्याचाच अर्थ असा की,स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्यांच ऐकतो,त्याच क्षणी तो स्वतःच अस्तित्व,निसर्गाने जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर  हरवून बसतो.

-व. पु 

"एखादी व्यक्ती जाता-जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला कॉमेंट करते.तेव्हा त्यांच फ़क्त नवल वाटतं.पण केव्हातरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडुन बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात.पृष्ठभागावरुन नुसतचं वाहुन गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरुन ठेवलेलं किती हे ’बोअरवेल’ खणल्याशिवाय कळत नाही.वर्ष संपलं की आपण नवीन Calender आणतो.काही वाणसामानाबरोबर फ़ुकट येतात.कधीकधी Calender साठी आपण अनावश्यक वस्तुही घेतो.प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं,कधी जाहीरपणे लावता न येणारं किंवा लावता येणारं,भारी Calender ही आपण पळवलेलं असतं.कितीही आकर्षक -आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ?
नाविण्याइअतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु नसेल.भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकामटेकड्यांना Calender वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.तो पट जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की,प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे.बुद्धी,मन आणि शरीराच दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे."

वसंत पुरुषोत्तम काळे, अर्थात व.पु. काळे, (जन्म मार्च २५, इ.स. १९३३ - जून २६, इ.स. २००१; मुंबई, महाराष्ट्र)
Wait while more posts are being loaded