Post has attachment
https://youtu.be/-vO5O-wnLIg
ज्या गड-किल्ल्यांनी शिव शंभू काळातील दैदिप्यमान इतिहास अनुभवला ज्यांनी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व त्यागले अशा सर्व गडकोटांना आणि हुतात्म्यांना एक आदरांजली म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सामानगडावर दसऱ्याचा विजयोत्सव साजरा करण्यात आला।
संपूर्ण गड जणु शिवकाळात परत गेला असा आभास मनात आला।
या वेळी काही रणरागिणी होत्या ज्यांनी डोळ्याची पारणे फेडणाऱ्या कला प्रदर्शित केल्या, त्यांचे देखील मनापासून आभार।
मित्रांनो, आयुष्यात हा असा अनुभव एकदा तरी घ्या, खात्री देतो कि पुढचा दसरा देखील तुम्ही गडांवर साजरा करण्यास नक्की याल।
आपला हा विडिओ नक्की पहा, आणि आवडल्यास comment करून सांगा प्रतिक्रिया आणि subscribe करा चॅनेल कारण आपण अश्याच दुर्गदर्शनाचा आनंद आपणास देत राहू।
जय जिजाऊ,
जय शिवराय,
जय शंभुराजे

साभार दुर्गवीर प्रतिष्ठान

Post has attachment

Post has attachment
प्रत्येक शिवभक्तांपर्यंत ही चित्रफित पोहोचावयास हातभार लावा
ही घोडदौड अशीच सुरु ठेवा
जय भवानी
जय शिवराय ....
https://www.youtube.com/watch?v=J1UXgY-5qik

Post has attachment
Here's my first collection on G+. Starting with the portraits, people and street photography. #essenceofindia
Follow this collection for interesting stories!

Post has attachment
वर्धनगड(सातारा) गडदर्शन व संवर्धन मोहीम - ५ व ६ जुलै २०१४ 
दुर्गवीरांचे पुन्हा एकदा पाउल, साताऱ्याच्या भूमीवर! 

या मोहिमेला सातार्यातील ''शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान '' च्या धारकार्यांचा विशेष सहकार्य लाभणार आहे 

शिवदुर्ग वर्धनगडावर दुर्गसंवर्धन आणि श्रमदान मोहीम दि.५ व ६ जुलै २०१४ 
श्रमदानाचे स्वरूप :
१) गडावरील पाण्याच्या टाकी स्वच्छ करणे . 
२) महादरवाजा व परिसरातील स्वच्छता करणे . 
३) गडावरील वास्तूंची नोंद करणे . 

साताऱ्याची भूमी एक मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी असलेली !
शिवकालीन इतिहासातही साताऱ्याचे स्थान महत्त्वाचे होते. समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट जेथे झाली ते ठिकाण चाफळ(तालुका पाटण) याच जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवरायांनी अफझलखानाचा शिताफीने वध केला. ही घटना छत्रपतींच्या मुत्सद्देगिरीची, शौर्याची व गनिमी कावा तंत्राची साक्ष देणारी घटना होय.

वर्धनगड हा किल्ला साताराच्या महादेव डोंगर रांगेवरील भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्‍याच्या सीमेवर कोरगावच्या 7 मैलांवर व साताराच्या ईशान्येस 17 मैलांवर बांधलेला आहे.किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे.वर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्‍क्‍कम तटबंदी दिसते.आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे.
या साताऱ्याच्या पुण्य भूमीत हे दुर्गसंवर्धन संरक्षण करण्याच्या शिवकार्याला एकदा येवून तर पहा.
अनुभवा ते समाधान ,अनुभवा तो गड परत एकदा !

सर्व इच्छुक शिवभक्तानी खालील क्रमांकावर संपर्क साधून आपल्या उपस्थितीची नोंद करावी.
दुर्गवीर संपर्क : 
विक्रम कणसे ; 09423915149 (सातारा )
ओंकार डोंगरे : 9890990755 (सातारा) 
राहुल कणसे :- 8908177224 ( अंगापुर) 
ओम शिव :- 7745009006 ( कराड) 
सचिन जगताप:- 9890662855 (पुणे)
सुरज कोकितकर : 9167635585(मुंबई )

FB EVENT :https://www.facebook.com/events/488004394664062/?ref=3&ref_newsfeed_story_type=regular&source=1 
Photo

Post has attachment
दुर्गवीर प्रतिष्ठान गेली ४ वर्ष गडसंवर्धनाचे कार्य करीत आहे. यात प्रामुख्याने सुरगड व मानगड या किल्ल्यांवर जास्तीत जास्त श्रमदान करून या किल्ल्यांना जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी दुर्गवीर प्रयत्नशील आहेत. याचीच परिणीती म्हणून नुकतेच एस. टि. महामंडळाने देखील दुर्गवीर च्या या कार्याची दखल घेत दुर्गसंवर्धनाच्या या कार्यात आपला खारिचा वाटा उचलण्यास सुरुवात केली आहे. माणगाव विभागात जाणा-या एस. टि. वर "किल्ले मानगड" चा फलक लावून सर्वसामान्यां पर्यंत हा गड पोहोचविण्याच कार्य करीत आहे. 
दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे एस. टि. महामंडळाचे शतश: आभार
आपणही आपल्या परिसरातील एस. टि. महामंडळाच्या अधिका-यां भेटून आजूबाजूच्या परिसरातील गडाच्या नावाचा फलक लावल्यास तो गड सर्वसान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. 
जय शिवराय…. 
#दुर्गवीर
http://www.durgveer.com/
ईमेल: durgveer.com@gmail.com
Photo

Post has attachment
कोणत्याही कार्याला प्रयत्नाची आवशक्यता असते , आपले प्रयत्न जर निष्ठापूर्व असेल तर ते कार्य सुखकर होऊन पूर्ण होते . 

साधारण तीन महिन्या पूर्वी कोल्हापूर जिल्यातील चंदगड तालुक्यातील 
गंधर्वगडाला दुर्गवीरच्या शिलेदारांनी भेट दिली होती .…
गडावर तटबंदी सोडून बाकीच्याची अवस्था इतकी वाईट आहे कि हा गड होता का ? हाच प्रश्न पडतो. 
गंधर्वगडवासियांना गडावरील अवशेषांचे ऐतिहासिक महत्व न कळल्यामुळे बरेच अवशेष नामोशेष होणाच्या मार्ग वर आहे .गायी-गुर जातात आणि अडकतात म्हणून चक्क चोर वाट बुजवण्यात आली आहे .गडावर प्राचीन विहारी आहेत काहींचा वापर होतो तर काही बुजवून टाकल्या आहेत . हा गड हेरेकर सावंत यांच्या कडे होता व त्यांचा वाडा होता पण तो वाडा बुजवून तेथे आत्ता पटांगण करण्यात आले आहे . काही चौथर्यांचा वापर कचरा टाकण्यास साठीच होतो . 
अश्या प्रचंड अडचनींना तोंड देत हा गड उभा आहे . 

इतिहासाचा उल्लेख केला तर शिवरायांनी वसवलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत गंधर्वगडाचा उल्लेख सभासद बखरीत आढळतो तसेच सदाशिवराव भाऊ कर्नाटकात जाताना येथे काही काळ मुक्कामास होते. 

या वरूनच किल्ल्याचे महत्व आपण समजू शकतो …
या गावातीलच "तुकाराम अमृस्कर " नावाच्या एका ६५ पार केलेल्या 'तरुणाला " व त्यांच्या सहकार्यांना गडाविषयी खूप तळमळ . त्यांनी आजवर गडा विषयी बरीच ऐतिहासिक नोंदी , पेपर मधील गडाविषयी आलेल्या कात्रण , गडावरील जुन्या वास्तु अशी माहिती जमा केली आहे . 

#दुर्गवीर परिवारातील मूळ कोहापूरचे पण कामानिम्मित मुंबईत निवासी असणार्या ''राहुल पट्टेकर '' यांना हि गडाविषयी अनस्था माहित होती . त्यांनी ती बर्याच वेळा व्यक्त हि करून दाखवली . त्यांनी या गडाविषयी संपूर्ण जबादारी पेलण्याचा विश्वास दर्शवल .

२५ ५-२०१४ प्रमुख संतोष हसुरकर आणि राहुल पट्टेकर यांनी " तुकाराम काकांची भेट घेतली. काकानी पोटच्या पोर प्रमाणे गडाची अवस्था दुर्गवीर समोर ठेवली …. नामोशेष झालेलेया प्रत्येक ठिकाणाची अवस्था स्वतः येवून दाखवली . 

या भेटी दरम्यान दुर्गवीर प्रमुखांनी त्या काकांनची राहुल पट्टेकर यांचा गडाविषयी तळमळ पाहून एक शब्द दिला … 

कितपत करू ? केव्हा पूर्ण करू? हे नाही सांगू शकत पण जो पर्यंत या दुर्गवीरच्या प्रत्येक मावळ्याच्या शरीरात शक्ती आणि मनात शिवरायांची निष्ठा आहे तो पर्यंत करत राहू ….

मित्रानो , आपण काय करू शकतो ? या प्रश्नांचे उत्तर शोधण्य पेक्षा आपण करू शकतो हे आपण जाणले पाहिजे …

गडावर लवकरच श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात येईल . … एक नम्र विंनती आहे . कोल्हापुरातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या कार्यात आपले योगदान द्यावे . ह्या महान कार्याचा आवक बरच मोठा आहे त्यासाठी प्रचंड मनुष्य बळाची गरज आहे कारण हे काम केवळ एकट्या दुकट्याने पार पडणारे नसून संपूर्ण समूहाच्या सहकार्याच्या मदतीनेच ते शक्य आहे ….

जय शिवराय 

या कार्यसाठी आम्हला नक्की संपर्क करा . 

संतोष हसुरकर : 9833458151 (कोल्हापूर )
राहुल पट्टेकर :- 08976058437 (कोल्हापूर )
विवेकानंद दळवी :-09594152045 (कोल्हापुर)
अजित राणे :- 8097519700 
नितीन पाटोळे :- 86558 23748 
सचिन जगताप :- 9890662885 
Photo

Post has attachment
हि साक्ष दुर्गवीरांची, 
लावू बाजी आम्ही प्राणांची, 
पुन्हा चमकवू गगनी,
शान ह्या गडकोटांची !

www.durgveer.com
Photo

Post has attachment
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
शालेय वस्तू वाटप " मोदगे '' बेळगाव २१.६.२०१४
11 Photos - View album

Post has attachment
Wait while more posts are being loaded