संसार

संसार म्हणजे दोन जिवांचा मेळ
खेळावा लागतो मजेशीर खेळ
तूझे माझे करणारे होतात इथे बाद
समजदार पडतात एकमेकाच्या प्रेमात

कधी रुसवा तर कधी नाराजी
हिच संसारातील खरी ताजगी
संशयाला इथे नसतो थारा
विश्वासाला मान असतो मोठा

संसाराचा ताण दोघांना ही असतो
तकरारीचा सुर मात्र कोणाचाच नसतो
एकमेकांचा भार  सांवरता सावरता
नकळत घट्ट होतो नात्यांचा जिव्हाळा

गोडी गुलाबीच्या या वातावर्णात
नकळत वर्षा मागुन वर्षे सरुन जातात
जिवनातल्या उतरणीला मात्र
एकमेकांचा  हात धरुन असतात

               माणूस

जिवनात सर्व मिळून देखील
समाधानी मात्र कधीच नसतो
अंपूर्ण काही तरी राहिल्याच्या
जाणिवेत सतत वावरत असतो

पैसा अडका कमवून देखिल
समाधानापासून लांबच असतो
इतरांशी तुलना करता करता
दु:खात नेहमी बुडून असतो

मृगजळा मागे मागे पळताना
अस्तित्वालाच विसरून जातो
नको त्या व्यर्थ हंव्यासापाई
आयुष्यभर पळतच असतो

शिक्षणाच्या पदव्या घेऊन देखील
अशिक्षीतासारखा वागत असतो
अंधश्रध्येच्या जुनाट कल्पनेत
भरकटलेले जिवन जगत असतो

विचारांच्या वाद विवादात 
नेहमी सर्वांत पुढे असतो
आचरणाची वेळ येता मात्र
काढता पाय पहिला घेतो

देवाधंर्माच्या नावाखाली
लाखो करोडो उधळत असतो
गरिबाला रुपया देताना मात्र
दहा दहा वेळा विचार करतो

आयुष्याच्या सांजवेळी
एकटाच जीवन जगत असतो
माझ माझ म्हणण्यासारख
जोडीला अस काहीच नसत
र-jay

                 असमाध‍नी

समाधानानी नेहमी जगण्याकरता
प्रत्येकजण धडपड करत असतो
समधानाचे समाधान होई पर्यत
पूर्ण जीवनच पणाला लावत असतो

समाधानाच्या फक्त नावाखाली
आपल्या गरजा वाढवत बसतो
मन‍ाविरूद्ध एखादे घडताच काही
निराशेमध्ये स्व:ताला ढकलून देतो

इतरांन पेक्षा खुप क‍ही जवळ असून
इतरांन पेक्ष‍ा  कमीच समजत असतो
आहे त्यात समाधान मानण्या पेक्षा
असमाधानातच नेहमी वावरत असतो

सुखाच्या मागे सतत धावता धावता
समाधानाची ओळख विसरुन जातो
जवळच्या सर्व सुख सोयींना सोडून
दु:खाच्या विळख्यात गुरफडत जातो

समाधान आणि माणसाचे नाते हे
मृगजळातल्या पाण्यासारखे असते
वास्तवातील प्रत्यक्ष सुखांना सोडून
कल्पनेतल्या दुनियेत भरकटत असते

र-jay


      शर्यत सुखाची

प्रत्येकाची असते धडपड
जिवन च‍ांगले जगण्याची
इच्छा मात्र कधिच नसते
वर्तमानात समाधी राहण्याची

जवळ सर्व असून सुद्धा
मन नेहमी व्याकुळ असते
मृगजळा मागे धावता धावता
साठवण्याचे व्यसन लागते

कमी पणाची जाणिव सदा
काट्या सम  टोचत राहते
मिळवलेले सर्व काही
उपभोगाशिवाय पडुन राहते

हव्यांस‍ाच्या या स्पर्धेमंध्ये
हार मात्र आपलीच असते
जिवघेण्या या शर्यतीमंध्ये
नेहमीच कोणीतरी पुढे असते

मोठ्या मोठ्या स्वप्नानमुळे
जगणे मात्र राहुन जाते
आयुष्याच्या सायंकाळीसुद्धा
काही तरी राहिलेल असते. . .

र-jay

      नात्यांची श्रीमंन्ती

रस्त्याने एकदा चालता चालता
विलक्षण दृष्य पाहिले कडेला
दोन असह्य चिमुकल्या जिवांना
पाहिले निर्सगाशी झुंज देताना

कडाक्याची बोचरी थंडी होती
शरिराला ती गोठवत होती
फाटलेल्या एका कपड्यामंध्ये
एकमेकींना त्या बिलगुन होत्या

थरथरत्या घट्ट मीठीमंध्ये
एकमेकींना त्या सावरत होत्या
नात्यातील आपल्या अतुट प्रेमाची
जाणीव जणू मला करुन देत होत्या

मळलेल्या त्यांच्या शरिरातले
मन मात्र स्वच्छ दिसत होते
दारिद्र्यातील ती अतुट नाती
श्रीमंन्तीला ही लाजवीत होती

जरी असलो श्रीमंन्त आपण
नात्यांनी मात्र गरीबच असतो
हेव्यादाव्याच्या जगात आपण
माया ममताच विसरुन जातो

र-jay

       न कळलेला देव

देवाची भक्ति कशी करावी
सांगेल का कोणी मजला
काय असे केले म्हणजे
भावेल तो माझ्या मनाला

                           देवस्तानाच्या वा-या करुन
                           खरच देव भेटतो का कधी
                           देव देव करणा-यांना तरी
                           सापडतो का त्या ठिकाणा

सोन्याच्या सिंहासनासाठी
देव करतो का हट्ट कधी
सोन अन रेशिम वस्त्रासाठी
येतो का तो आपल्या दारी

                           पंचपक्वांनाच्या नैव्यदाने
                           मन तृप्त होते का देवाचे
                           दान पेट्या तूडुंब भरल्यावर
                        समाधसन होते का भगवंताचे

नवसरुपी स्वार्थी आमिषाची
भूल पडते का त्याला कधी
सर्वाना भरभरुन देणा-यालाच
पडत असेल कधी काही कमी
            
                         देऊळात देव शोधणा-यांना
                         माणसांत का तो दिसत नाही
                         कर्मामधले त्याचे अस्तित्वामंध्ये
                         दिसेल का तो कधी........

र-jay

          शिक्षण

आयुष्याला घडवण्याला
शिक्षणाचीच साथ असते
जन्मा पासून मृत्यु पर्यत
शिकवणी ही चालुच असते

आई बाबांच्या मार्गदर्शनाने
पहिले पाऊल टाकले जाते
ख-या अर्थाने पाहिले तर
शिक्षण तेव्हाच सुरु होते

पाठ्य पुस्तकातून शिकताना
समाज ही शिकवण देत असतो
सृष्टीचे नियम पाळण्यासाठी
निसर्ग ही पाठ शिकवत असतो

शिक्षणाच्या पवित्र साथीने
उंचच उंच शिखर गाठता येते
शिक्षणाचे महत्व सांगण्यासाठी
बहिणाई ही ओव्या बोलत असते

वेगवगळ्या लोकात वावरताना
आपणच आपले शिकायचे असते
अनुभवातून शिकण्यासाठी
जगात कोणतीच शाळा नसते

जिवनभराच्या शिक्षणाला
संस्काराची जोड द्यायची असते
शिकवण देणा-या माता पित्याचे
सुशिक्षित पणे ऋण फेडायचे असते

र-jay

अपेक्षा

माणसांच्या अपेंक्षा ईतरांकडुन
का असतात नेहमीच एकतर्फी
माझ्याच व्हाव्यात त्या पूर्ण
हट्टाहास का‍ असतो मनी

सर्वांनाच आपण गृहीत धरतो
अपेंक्षा आपल्या साकारताना
आपण नसतो कधी तयार
दुर-याच्या अपेंक्षा पुर्ण करायला

संकट आणि दु:खाच्या परिस्थीत
साथ सर्वांचीच अपेंक्षित असते
सुखमय दिवस उपभोगताना
आठवण मात्र कोणाचीच नसते

अपेक्षाचा जेव्हा भंग होताना
दोष इतरांनाच देत असतो
आपण कुठे कुठे कमी पडलो
विचार याचा कधिच मनात नसतो

सर्वंच आपण आपल्या डोक्यावर
अपेक्षांच ओझे घेऊन फिरत असतो
नाही जमले कधी पूर्ण करायला तर
मृत्युला ही कधिकधी जवळ करतो...
                          र-jay

        रुसलेला पाऊस

असा कसा निस्टूर झालास
कुठे जाऊन रुसून बसला
तुझ्या वाचून संसार माझा
पोरका होऊन गहाण पडला

काळी आईच्या गर्भातली
बिजे ठेवलीस रे तहानलेली
अंकुर फुटण्या अ‍ाधिच त्यांना
देऊ नकोस मातीतच समधी

पोरावानी जपलेल्या गुरांची
तडफड पाहिली चा-यासाठी
काळजा वरती दगड ठेऊन
बांधून आलो कसाईच्या दारी

पाणावलेल्या व्याकूळ नजरेने
पाहतो उजाड माळरानाला
एक दिवस फुलेल हिरवे शिवार
समजवतो माझ्याच मनाला

एकच आता मागणे तुझ्याकडे
पाठ फिरवू नको माझ्याकडे
मनसोक्त होऊन बरस शेतामंध्ये
नको नेऊ आत्महत्येच्या रस्त्याकडे. . .

र-jay
Wait while more posts are being loaded