कुणाला काही पोस्ट करावयाच्या असतील तर करू शकता

🌺🌸🙏।।श्री गुरुदेव ।।🙏🌸🌺

दीक्षा घेतल्यावर सद्गुरूंजवळ कसे वागावे ?

🔅सद्गुरूंशी खोटे बोलू नये.
🔅फार बोलू नये .
🔅सद्गुरूंची निंदा करू नये
🔅आपले बोलणे बरोबर नाही ,
असत्य आहे. या स्वरूपाचे
शब्द तोंडात येऊ नये .
🔅गुरूंसमोर वेगळी पूजा करू
नये .
🔅मर्यादा सोडून वागू नये.
🔅दीक्षा वगैरे विषयावर आपले
प्रभुत्व दाखवणारे भाषण
करू नये .
🔅सद्गुरूंचे आसन , अंथरुण ,
वस्त्रादि-कपडे -, अलंकार ,
पादुका , चित्र इ.ना स्पर्श
करून वंदन करावे .
🔅गुरू आज्ञा मोडू नये .
🔅सद्गुरूंना प्रत्युत्तर देऊ नये .
🔅दिवसा , रात्री , सदैव
सेवकाप्रमाणे त्यांची आज्ञा
पाळली पाहिजे .
🔅असत्य , अशुभ , वादविवाद
इ. टाळावे .
🔅सद्गुरूंना न आवडेल असे
करू नये .
🔅सद्गुरूकार्यातआळस करू
नये .
🔅सद्गुरू कार्यात लौकिक
इच्छा नसाव्यात .
🔅सद्गुरू कार्यात राग नसावा .
🔅सद्गुरूंच्या डोळ्याला डोळा
भिडवून कधीही बोलू नये .
🔅सद्गुरूंना नमस्कार
केल्याशिवाय ओलांडून वा
समोरून जाऊ नये.
🔅संपत्ती , जात किंवा आश्रम
इ . चा अभिमान नको .
🔅 सद्गुरूंसमोर अद्वैताची
भाषा करू नये .
🔅 सद्गुरूंसमोर देव पूजाही करू नये .
🔅सद्गुरूंसमोर पलंगावर निजू
नये व तसेच समोर हात पाय
पसऱून बसू वये .
🔅आळस , अंगविक्षेप समोर
करू नये .
🔅जाता-येता सद्गुरूंच्या
पादुकांना वंदन करावे .
🔅त्यांचे काम प्रसन्नतेने करावे .
🔅सद्गुरूंची सावली ओलांडू
नये .
🔅त्यांचे पुढून तसेच जाऊ नये .
🔅अनवाणी जाऊन आधी
गुरुगृहाला वंदन करावे .
🔅सद्गुरूंसमोर आपला शिष्य-
संप्रदाय मिरवू नये .
🔅अहंकार करू नये .
🔅आपल्या गुरूंना त्यांच्या गुरूंसमोर नमस्कार करू नये .
🔅सद्गुरूंशी ' तुम्ही ' सर्वनामान न बोलता' आपण ' सर्वनाम वापरून बोलावे .
🔅सद्गुरूंना वंदन करून त्यांचेजवळ बसावे .
🔅सद्गुरूंच्या आज्ञा घेऊन त्यांच्या जवळून जावे .
🔅सद्गुरूंसमोर काम , क्रोध , लोभ ,मान घेणे , हसणे , स्तुती करणे , कुटिलता दाखविणे , ओरडणे , रडणे या गोष्टी करू नये.
🔅सद्गुरूंना ऋण देणे किंवा त्यांच्याकडून ऋण घेणे , त्यांना वस्तू विकत देणे या गोष्टी करू नये .
🔅सद्गुरूंच्या समाधानातून शिष्याला पूर्णत्व प्राप्त होते.
🔅सद्गुरूंच्या आठवणीत सर्व देवतांचे स्मरण अंतर्भूत आहे .
🔅गुरू , गुरू-मंत्र आणि इष्टदेवता या तीन वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच आहे असे समजावे.
🌺🌸🙏।।श्री गुरुदेव ।।🙏🌸🌺

Post has shared content

मुंबई हुन कुरावपूर आणि पिठापूरम ला कसं जायचं आणि तिथे राहण्याची व्यवस्था ह्या बद्दल कोणी माहिती देईल का ?

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी केलेल्या करुणात्रिपदी चा भावार्थ

शांत हो श्री गुरुदत्ता
मम चित्ता शमवी आता !

तु केवळ माता जनिता
सर्वथा तु हितकर्ता
तु आप्त स्वजन भ्राता,
सर्वथा तुचि त्राता
भयकर्ता तु भयहर्ता,
दंडधर्ता तु परिपाता
तुजवाचुनी न दुजी वार्ता,
तु आर्ता आश्रय दत्ता
मम चित्ता शमवी आता !

हे श्री गुरु दत्तात्रेया, तु शांत हो, तु अशांत आहे असे आम्हास वाटल्यामुळे आमचे चित्त भयभीत झाले आहे, अशांत झाले आहे.
तु आमचा केवळ माता, जन्मदाता नसुन तुच सर्व अर्थानुसार , सर्व प्रकारे आमचे हित करणारा आहेस. तसेच तुम्ही आमचे आप्त, स्वजन, भाउ, नातेवाइक असुन तुम्हीच आमचे संरक्षण, तारणहार आहेत. या भवसागरापासुन आम्हास तुम्ही पैलतीर नेणारे आहे. तसेच तुम्ही भयनिर्माण करणारे, व भय हरणारे, भयाचा नाश करणारे आहात. आमच्या दु:खाचे , तुम्हीच पारिपत्य करणारे आहात. हे गुरुराया, अशा प्रकारे तुम्हीच आमचे तारणहार असल्याने व आमच्या दु:खाचे नाश करणारे असल्याने तुम्हीच आमचे एकमेव आश्रयस्थान आहे व त्यामुळे आम्हास तुम्हावाचुन दुसरे दैवत नाही.

अपराधास्तव गुरुनाथा,
जरी दंडा धरिसी यथार्था
तरी आम्ही गाउनी गाथा,
तव चरणी नमवु माथा
तु तथापि दंडीसी देवा,
कोणाचा मग करु धावा
सोडविता दुसरा तेव्हा,
कोण दत्ता आम्हा त्राता
मम चित्ता शमवी आता !

आम्ही काही चुक केली, आमच्याकडुन काही प्रमाद घडला, अपराध घडला व देवा तुम्ही आम्हास जरी योग्य तो दंड केला तरी आम्ही तुमचे गुणगान करु, लीला गायन करु व तुमच्या चरणी माथा ठेउ, तुम्हाला शरण येउ. हे गुरुदेवा, तुम्ही आम्हाला दंड केल्यावर आम्ही पामरांनी तुमच्याशिवाय कोणाचा धावा करायचा ? आम्हास तुमच्याशिवाय कोण सोडवणार ? कारण तुम्हीच आमचे त्राता आहात.

तु नटसा होऊनी कोपी,
दंडिताहि आम्ही पापी
पुनरपि चुकता तथापि,
आम्हावरी नच संतापी
गच्छत: स्खलनं क्वापि,
असे मानुनी नच हो कोपि
निजकृपालेशा ओपी,
आम्हावरी तु भगवंता
मम चित्ता शमवी आता !

हे गुरुदेवा, तुम्ही आमच्यावर क्रोधीत झाल्यावरही आम्हा पामराकडुन परत चुका होऊ शकतात. परंतु तुम्हास ही विनंती आहे कि, तुम्ही आम्हावर संतापु नका. कारण आम्ही पामर अज्ञ आहोत . तेव्हा आपण आमच्यावर कृपा करा.

तव पदरी असता त्राता,
आडमार्गी पाउल पडता
सांभाळूनी मार्गावरता,
आणिता न दुजा त्राता
निजबिरुदा आणुनी चिता,
तु पतीत पावन दत्ता
वळे आता आम्हा वरता ,
करुणाघन तु गुरुनाथा
मम चित्ता शमवी आता !

हे गुरुदेवा, तुमच्या अध्यात्मपथावर चालताना , तुमची उपासना करताना , तुमच्या चरणाचा आश्रय घेतलेला असताना आमच्या कडुन अज्ञानामुळे काही चुक होऊ शकते. तेव्हा हे गुरुदेवा तुम्ही आम्हाला सांभाळुन घ्या. आम्हाला तुमच्याविना कोणीही सांभाळुन घेउ शकत नाही. आपले पतीतपावन हे सार्थ आहे. व करुणाघन गुरुदत्ता , तुम्ही आमच्या वर कृपा करा.

सहकुटुंब सहपरिवार,
दास आम्ही हे घरदार
तव पदी अर्पु असार,
संसाराहित हा भार
परि हरिसी करुणासिंधो,
तु दीनानाथ सुबंधो
आम्हा अघलेश न बाधो,
वासुदेव प्रार्थित दत्ता
मम चित्ता शमवी आता !

हे गुरुदत्ता, आम्ही सर्व कुटुंब तुमचे दास आहोत , आम्ही सर्व परिवार तुमचे भक्त आहोत. आम्ही तुमची भक्ती करतो आहे. आम्ही भक्तीभावाने तुमची आराधना करतो आहे. आमच्या जीवनातील सर्व असार, बरे वाईट कर्मे तुमच्या चरणी अर्पण करत आहे. तसेच ह्या प्रपंचाची चिंता तुमच्यावर सोडत आहे. हे गुरुदत्ता, दीनानाथा, तुम्ही आमच्या चिंतांचे हरण करा. आम्हास कोणतीही कुबाधा होऊ देऊ नका. आमचे मन, चित्त सदा आपल्या भक्तीत लीन राहो, आपल्या चरणी स्थिर राहो, अशी प्रार्थना हा वासुदेव तुम्हाला करीत आहे .

Post has attachment
श्री सिद्ध मंगल स्तोत्र
Photo
Wait while more posts are being loaded