Post has attachment

Post has shared content

जा सुखांनो परत जा....

जा सुखांनो आता परतच जा.....

या जीवनात माझ्या ,
सोबत न सोडणा-या
दुःखांना तर सीमाच नाही
माफी असावी सुखांनो ,
माझ्याकडे तुम्हांस आता
मुळी जागा उरलीच नाही

दुःखाश्रू ओघळून कोरडलेल्या
डोळयांतून आसवे डबडबून
आता कधी गळणारच नाही
आनंदाश्रू पाणावयास सुखांनो ,
डोळ्यांत एक टिपूस थेंबही
मुळी आता शिल्लकच नाही

दुःखांनी केले निगरगट्ट इतके
ज्याचा माझ्यावर कुठलाही अन्
कोणताही परिणाम होतच नाही
सुखांनो , तुम्ही आता दूरच राहा
तुम्हांस अनुभवयाला देखील
माझ्यात ती भावनाच नाही

सुखांनो , तुम्ही तर मला लत लावून
निर्ढावून , अंधारात , अनभिज्ञ ठेऊन
खरे जीवन आधी कळू दिलेच नाही
पण या दुःखांनी बरेच काही केले
मला धडपडून उभे राहाण्यास शिकवले
तुझ्यासारखे कधी ठकवलेच नाही

घडी - घडी ये - जा करण्यापेक्षा
आल्या पावली तुम्ही परतच जा
मागे फिरून आता यायचेच नाही
आमिषात तुझ्या पुन्हा अडकून
उगाच स्वतःची फसवणूक करून
मला माझी हसवणूक करायचीच नाही

जा सुखांनो आता तुम्ही परतच जा.....

🌼 © ⏩ जगदीश अहिरराव

Photo

गरज घटना दुरुस्तीची...........!


लोकशाही राज्य पद्धती स्विकारून आणि निधर्मी राष्ट्राची स्थापना करून आपण घोडचूक तर केली नाही ना? असा प्रश्न घटना स्विकृती नंतर सदुसष्ट वर्षे झाल्यावरही वारंवार मनात येतो. आपल्या देशात हिंदू धर्माचे लोक बहुसंख्येने रहातात. अनेक वर्षांपासून इतर धर्मीय लोकही सुखाने एकत्र नांदत आहेत. भारत देश वैविध्यपूर्ण निसर्गानी, अठरा पगड जाती आणि अनेक धर्मांनी समृद्ध आहे. "विविधतेत एकता" या वचनानुसार आपल्या देशात जी विविधता आढळते ती जगात इतरत्र कुठेही आढळत नाही.
प्रत्येक धर्माला, जातीला सणवार, चालिरिती, उपासना, श्रद्धास्थाने जतन करण्याची पूर्ण मोकळीक आहे. मूलभूत तत्त्वांचा समावेष असलेल्या विचारपूर्वक लिहिलेल्या उत्कृष्ट राज्य घटनेमुळेच आपल्याला आचार विचारांचे, लेखनाचे, धर्माचे, राजकीय मत प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य मिळाले आहे. घटनेने बहाल केलेले स्वातंत्र्य अनमोल आहे. परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्याचा गर्भितार्थ समजून घेण्यात आपण गल्लत केलेली जाणवते. स्वातंत्र्य म्हणजे सवंगता नाही. स्वातंत्र्याची अपेक्षीत सार्थ जाणीव आपण मनात रुजविली पाहिजे. यामुळे जातीय दंगे, भाषिकवाद, प्रांतवाद उद्भवणार नाहीत. लोकशाही राज्य पद्धती स्विकारल्यामुळे अठरा वर्षावरील सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क घटनेने बहाल केला आहे. आज खरोखर सर्वच पात्र मतदार मतदान करण्यास बौद्धीकदृष्टया खरोखरचं सक्षम आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न डोक्यात घोळत रहातो. अशिक्षीत आडाणी आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याकरीता जरूर असलेले किमान ज्ञान ज्याच्याकडे नाही अश्या मतदाराने केवळ वयाचा निकष पूर्ण केला म्हणून त्याचे आणि एखाद्या शिक्षीत जाणकाराचे मत सममूल्य ठरविणे घातक आहे. मतदाराच्या वयाबरोबरच किमान शैक्षणिक पात्रतेचा अंतर्भाव मतदार पात्रतेसाठी असावा. यामुळे पैसे, कपडे आणि दारूच्या बाटलीच्या अमिषाने केल्या जाणाऱ्या मतदानाला निश्चीत आळा बसेल. तसेच वैचारिक बैठक असलेले, देशहिताची जाणीव असणारे सार्वत्रीक वर्तमान परिसथितीची जाणीव असणारे मतदारच निवडणूक प्रक्रियेत आपला योग्य अपेक्षीत सहभाग नोंदवू शकतील. मतदाराची शैक्षणीक पात्रता महानगर, नगरपरिषद, ग्रामपंचायत या निकषावर ठरविता येईल. तसेच याच निकषांच्या आधारे उमेदवाराची किमान शैक्षणीक पात्रता देखील ठरविली जावी. त्यामुळे उमेदवारी मिळविण्या करीता केल्या गेलेल्या लाजिरवाण्या मारामाऱ्या दूरदर्शनवर पहाण्याचे टळेल. सार्वत्रीक परिस्थितीची जाणीव असलेले सजग उमेदवार निवडणूक रिंगणात पहायला मिळतील. स्वातंत्र्यापूर्वी आर्थिक परिस्थिती मतदाराची सक्षमता ठरवित असे.परंतु स्वातंत्र्योत्तर काळात वयाबरोबरच शैक्षणीक पात्रता विचारात घेतल्यास फार मोठ्या प्रमाणावर निवडणूकितील अनुचीत प्रकारांना पायबंद बसेल. शिक्षीत नागरिकांचा टक्का वाढण्यास मदत होईल. भावी दैदिप्यमान भारताच्या निर्मितीकरीता तो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरेल. घटनेत बदल करण्याकरीता जनमत घेऊन आवश्यक घटना दुरुस्ती केल्यास एकविसाव्या शतकातील स्पर्धात्मक जगाला सामोरे जाणे सोपे होईल. निर्णय प्रक्रियेत अमुलाग्र बदल होऊन देशहिताचे निर्णय घेण्यात मोलाची मदत होईल. या प्रकारची घटना दुरुस्ती करायला बराच विरोध केला जाईल, राजकीय पक्ष आणि नेते टोकाचे गैरसमज पसरवतील. कदाचित नको असलेले जातियवाद डोके वर काढतील. परंतु दूरगामी दृष्टीने विचार केला तर सद्य लोकशाही प्रक्रियेत उत्तम परिणाम घडवून आणण्याकरीता, भारताची आर्थिक, सामाजिक, राजकीय पातळी वाढविण्या करीता वरील सुचनांचा साकल्याने विचार करणे अनिवार्य होत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तर वर्षात कोणाकडून किती आणि कशा चुका झाल्या या विषयावर चर्चेचे गुऱ्हाळ चालविण्या ऐवजी वर्तमानात काय बदल केले पाहिजेत याकडे लक्ष दिले पाहिजे. ■

--
Sent from Fast notepad

आज भी प्यार करते हे तेरे से,
ये मत समझ के मुझे कोई मिला नही
मिले तो बहुत लेकिन तेरे सिवा किसी को चाहना नही...

Post has shared content
राधेला तिकडे टोचला काटा
तर जीव माझा इकडे तडफडतो....
राधेच्या अबोल्याने मन,
आणि जीव माझा फडफडतो...
*Miss you*🌹🌹
राधेला तिकडे टोचला काटा
तर जीव माझा इकडे तडफडतो....
राधेच्या अबोल्याने मन,
आणि जीव माझा फडफडतो...
*Miss you*🌹🌹
Photo

"Rose" तर तिला पण द्याजी तुमच्यासाठी "रोज" दुःखांशी संघर्ष करुन झगडत असते."Propose" तर तीला पण कराजी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या "pose" ची खरी शिल्पकार असते."Chocolate" तर तीला पण द्याजी स्वतः झटुन तुम्हांला आयुष्यात"ready&set" करते."Teddy" तर तीला पण द्याजी तुम्हाला लहानपणापासुनच "teddy" सारखं जपत असते."Promise" तर तीला पण कराजिने तुमच्या करीता सगळी सुखे "miss" केलेले असते."Kiss" तर तीच्या पण हातांना कराजिने तुमच्यासाठी हात झिजवलेले असते."Hug" तर तिला पण कराजिने तुम्हांला तिच्या "कुशीत" मौल्यवान वस्तु सारखे जपलेले असते."VALENTINE" तर तिच्या सोबतपण साजरा कराजिने तुम्हाला प्रेम करायला शिकवले असते."girlfriend" नावाच्या बाईच्या आधी पण एक बाई असते.तिचे नाव "आई"असते.

Post has attachment
अवघे गरजे पंढरपूुर

अवघे गरजे पंढरपूुर
चालला नामाचा गजर ध्रु

टाळ घोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी जाहलोहो चंद्रभागा तीर
चालला नामाचा गजर ।।१।।

इडापिडा टळुन जाती
देहाला या लाभे मुक्ति
नाम रंगी रंगलो हो संतांचे माहेर
चालला नामाचा गजर ।।२।।

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
🌿 🌺👉 good evening * 👈🌺🌿
🌿🌺👉 my sweet friends 🌹 _ 👈🌺🌿

"ना फिरायला गाडी 🚗पाहिजे,"
"ना गळ्यामध्ये घालायला हार 📿 पाहिजे,"
"भगवद् गीता 📕मध्ये श्री कृष्णा ने
खुप चांगली गोष्ट सांगीतली आहे "*
"जीवन चा उद्धार करण्यासाठी...
फक्त मित्र 🙋‍♂, प्रेम 💞आणि परिवार 👨‍👩‍👧‍👦 पाहिजे..."

❤🌹शुभ संध्या 🌹❤
Photo
Wait while more posts are being loaded