Post has attachment

Post has attachment

Post has shared content

Post has attachment

Post has shared content
पसायदान अर्थासह
आता विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञे तोषावे|तोषोनि मज द्यावे | पसायदान हे ||१ ||
अर्थ = विश्वरूप सदगुरू यांनी माझ्या वाग्यज्ञे करुन संतुष्ट होवून मला प्रसाद द्यावा.
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो | भूता परस्परे पडो |मैत्र जीवाचे || २ ||
अर्थ==दुष्टांचा कुटीलपणा जावून त्यांना सत्कर्माची प्रीती उत्पन्न होवो,व जीव मंत्राची एकमेकावर मैत्री वाढो.
दुरातांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्मसूर्ये पाहो | जो जे वांछील तो ते लाहो| प्राणि जात || ३ ||
अर्थ=या सर्व विश्वामधील पापरुपी अंधकार नाहीसा होवून,स्वधर्म रुपी सूर्य उगवूनत्याचा प्रकाश होवो,आणि प्राणि मात्राच्या
ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होवोत.
वर्षते सकलंमंगळी | ईश्वरनिष्ठान्ची मांदियाळी|अनवरत भूतळी | भेटो तया भूता || ४ ||
अर्थ= या भूतलावर अखिल मंगळाच्या वर्षाव करणाऱ्या भगवदभक्तांच्या समुदायाची सर्व भूतानासदभावे करुन
सदोदित भेट होवो.,
चला कल्पतरूचे अरव | चेतना चिंतामणीचे गाव | बोलणे जे अर्णव | पीयूषाचे ||५||
अर्थ== ते भक्तजन कसे आहेत,तर चालते बोलते कल्पतरूचे बाग,जिवंत चिंतामणीचे गाव,किवा अमृताचे चालते बोलते समुद्रच,होत.
चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु || ६ ||
अर्थ==जे कलंकरहित प्रतीचंद्र ,संसार रुपी अंधकार दूर करुन,शांतीसुख देणारे प्रतीसूर्य असे भागवतभक्त,ते सकल
जीवाना प्रिय होवोत.
किंबहुना सर्वसुखी | पूर्णहोवुनी तीही लोकी| भजिजे जो |आदिपुरुशी | अखंडित || ७ ||
अर्थ== फार काय मागावे ! सर्व त्रैलोक्य सुखाने परिपूर्ण होवून प्राणि मात्राला हरिचे अखंड भजन करण्याची इच्छा होवो,
आणि ग्रंथोपजीविये |विशेषी लोकी इये|दृष्टादृष्ट विजये |होआवे जी ||८ ||
अर्थ=आणि या ग्रंथावरच ज्याचे उपजीवन आहे,त्यांना इहलोकचे व परलोकचे सुख प्राप्त होवो.
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो | हा होईल दानपसावो | येणे वरे ज्ञानदेवो| सुखिया झाला. ||९||
अर्थ== तेव्हा सदगुरूप्रसन्न होवून म्हणाले की,तुझ्या म्हणण्या प्रमाणे सर्व होईल,असे वर प्रदान मिळाल्याने
श्रीज्ञानदेव फार संतोषित झाले
Photo

Post has attachment

Post has shared content
जय जगन्नाथ स्वामी
नयनपथगामी भवतु मे
Photo

Post has shared content

Post has shared content
Originally shared by ****
Hahahaha
Photo

Post has shared content
Wait while more posts are being loaded