Stream

Join this community to post or comment

Parveen Tanwar

Discussion  - 
 
ऐसा ही होना चाहिए ना
 ·  Translate
1
Add a comment...

Parveen Tanwar

Discussion  - 
 
जीने की कला 
 ·  Translate
11
1
Manohar Kumar's profile photo
Add a comment...
 
२२ ऑगस्ट

समाधान ही परमेश्वराची खरी देणगी.

प्रत्येकाला असे वाटते की, मी कुणाची निंदा करीत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी, आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात, हे कसे काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला, तरी त्याच्या हे मनात आल्यावाचून रहात नाही. नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा, आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे, यावरून भगवंताला न्यायी कसे म्हणावे, अशीही पुष्कळांना शंका येते. खरोखर, याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की, बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले, पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग! दोन रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता, आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता; तर कोणता रस्ता आपण धरायचा ? भगवंताकडे जाणार्‍या लोकांचे गीतेमधे दोन वर्ग सांगितले आहेत; एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात, ते सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात, पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते, म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन, ते कर्मयोगी होत. सांख्यांचा साधनमार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो; आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे चट्‌दिशी पोहोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता ? तो मार्ग असा - वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा, पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे, हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे.

दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण विचारले तर ती माणसे दहा निरनिराळी कारणे सांगतील. यावरून असे दिसते की जगातील कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचे शास्त्र निराळेच आहे. ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून, तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत, प्रत्येकाला काही तरी कमी असणारच. पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की, आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे; म्हणून त्याचे दुःख कायम राहते. भगवंतावाचून असणारे वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुखसमाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय.

प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे.


🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
4
Vipin Wani's profile photo
 
Nice. .
Add a comment...
 
१८ ऑगस्ट

रामाला अनन्यभावे शरण जा.

प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला, तर खचित् असे आढळून येईल, की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे. जो काही पैसाअडका, मानमरातब मिळतो आहे, तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून, कोणत्याही बऱ्यावाईट कर्माचा अभिमान धरू नका, किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट् करील. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करू या. 'राम कर्ता' म्हणेल तो सुखी, 'मी कर्ता' म्हणेल तो दुःखी. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावे आणि मजेने असावे; आनंदाने संसार करावा. 'तुझ्या नामस्मरणाची गोडी दे' हेच मागावे.

प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून, समाधानात रहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. असे वागल्याने हवे-नकोपण नाहीसे होते, आणि अहंपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा, रामाला अनन्यभावे शरण जा. 'रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानीन,' अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळे मदतीकरिता हातच पुढे करीत नाही, त्याला तो काय करणार ? तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले, म्हणून ते 'समर्थ' होऊ शकले. ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली, तो जगाचा स्वामी होईल. म्हातारे असतील त्यांनी भगवद्‌भजनात आपला वेळ घालवावा, आणि तरूण असतील त्यांनी भगवत्‌स्मरणात कर्तव्याला चुकू नये, हाच समाधानाचा मार्ग आहे; यातच सर्वस्व आहे. जो भगवंताच्या प्रेमात निमग्न राहतो, त्याला उपदेश करण्याची जरूरी नसते. भगवंताने गोपींना उपदेश केल्याचे ऐकिवात नाही. त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या. भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल. म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आयुष्य घालवा. भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद.

राम कर्ता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा, त्यालाच आस्तिक म्हणावा.


🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
1
Add a comment...
18
Dilip k. maheshwari's profile photoaayushman kumar's profile photo
2 comments
 
My salute to the future of our nation.
Add a comment...
 
१३ ऑगस्ट

देहाचे भोग आणि आनंद

तुम्हाला आपल्या हिताकरीता दुसर्‍याच्या उपयोगी पडणे जरुर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा की, परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे ? तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही. पण आपल्या हिताकरीता, म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी, दुसर्‍याच्या उपयोगी पडणे जरूरी आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे परमात्म्याला पोहोचते.

परमात्म्याने पाठवलेली दुखणी, संकटे, यांत आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर सांगितली, तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सदगुरुंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी, संकटे यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद ? पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा विश्वास आहे कुठे ? परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत ? दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही, तर पुढे तरी भोगावा लागणारच ना ?

देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता; पण तुम्हाला देहाचा असा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषपणे भासते इतकेच. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे, दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल; म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे, आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे.

अनुसंधान कशाला म्हणावे ? उठणे, बसणे, जप करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टा-मस्करी करणे, वगैरे क्रियांमधे भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. 'मी अनुसंधान टिकवीन' असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणेच होय. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंद दिसतो.

देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकू या आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करू या.

🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
1
Add a comment...
 
१० ऑगस्ट

अनुसंधानीं चित्त । सर्वांभूतीं भगवंत ।
हाच माझा परमार्थ ॥

ज्यास पाहिजे असेल हित । त्याने ऐकावी माझी मात ॥
जो झाला रामभक्त । तेथेच माझा जीव गुंतत ॥
मला रामभक्तावीण काही । सत्य सत्य जगी कोणी नाही ॥
जीवाचे व्हावे हित । हाच मनाचा संकल्प देख ॥
तुम्हास सांगावे काही । ऐसे सत्य माझेजवळ नाही ॥
पण एक सांगावे वाटते चित्ती । रघुपतीवीण शोभा नाही जगती ॥
मुलगी सासरी गेली । तिची काळजी सासरच्याला लागली ।
तैसे तुम्ही माझे झाला । आता काळजी सोपवावी मला ॥
सदा राखा समाधान माझा आशीर्वाद पूर्ण ॥
मी तुमची वेळ साधली । हा ठेवा मनी विश्वास । आनंदाने राहावे जगात ॥
अंतकाळची काळजी । तुम्ही कशाला करावी ? ॥
व्यवहार मी सांभाळला । तरी पण रामाला नाही दूर केला ॥
राम सखा झाला । नामी धन्य मला केला ॥
मी तुम्हास म्हटले आपले । याचे सार्थक करून घेणे आहे भले ॥
नामापरते न माना सुख । हाच माझा आशीर्वाद ॥
मला माझे बोल सत्य । कृपा करील खास भगवंत ॥
मी असो कोठे तरी । मी तुम्हापासून नाही दूर । याला साक्ष रघुवीर ॥
तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण । दुःखी होऊन न करावे अप्रमाण ॥
तुम्ही माझे म्हणविता । मग दुःखी कष्टी का होता ? ॥
उपाधीवेगळे झाला । ऐसे ऐकू द्यावे मला ॥
माझे ज्याने व्हावे । त्याने राम जोडून घ्यावे ॥
दृश्य वस्तूचा होतो नाश । याला मीही अपवाद नाही खास ॥
शेवटी मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥
अनुसंधानी चित्त । सर्वांभूती भगवंत ।
नामी प्रेम फार । त्याला राम नाही दूर ॥
मी सांगितल्याप्रमाणे वागावे । राम कृपा करील हे निश्चित समजावे ॥
आता आनंदाने द्यावा निरोप । हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख ॥
सदा राहावे समाधानी । नको सुखदुःख काळजीचा लेश । माझा झाला जगदीश ।
हा भाव ठेवा निरंतर । राम साक्षी, मी तुम्हापासुन नाही दूर ॥
सर्वांचे करावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥
सर्वांनी व्हावे रामाचे । हाच माझा आशीर्वाद घेई साचे ॥
जगाचे ओळखावे अंतःकरण । तैसे आपण वागावे जाण ॥
नामापरते दुजे न मानावे । एका प्रभूस शरण जावे ॥
हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥
विवेक-वैराग्य संपन्न । सदा असो अंतःकरण ॥
अखंड घडो भगवद्‍भक्ति । आत्मज्ञानप्रतीति ।
ब्रह्मस्वरूपस्थिती । नामी निरंतर जडो वृत्ती ॥
मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार । न सोडावा आता धीर ॥
सुखाने करा नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥

काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥

🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
1
Add a comment...
 
९ ऑगस्ट

ज्याला समाधान तो भाग्यवान.

ज्याचे 'हवेपण' जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते, त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा; तो आज आहे अन उद्या नाही. पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल ? श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असा होऊ नये, याची श्रीमंतानी काळजी घ्यावी. खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य, आणि हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त, तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देवू शकत नाही. खरोखर, समाधानासारखे औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारले तर तो म्हणाला, "अहो, मला मधुमेह झाला आहे; मी आतून पोखरला गेलो आहे ! त्यापेक्षा तुम्ही बरे." खरोखर, त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणार्‍या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे ! सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत. पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली ? व्यक्ती काय किंवा समाज काय, यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही; म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही.

खरोखर, प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते; आणि सुख तरी काय, दुःखाची कमतरता ते सुख ! राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते; म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करीत नाही की, जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का ? याचे उत्तर 'नाही' असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धिचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे, भगवंताचा आनंद हा उपाधीरहीत आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन नामात राहणे हा एकच उपाय आहे.

नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही.

🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
1
Add a comment...
 
७ ऑगस्ट

रूपाची ओळख नामानेच होते.

नुसत्या शास्त्रपठणामुळे होणार्‍या ज्ञानापेक्षा भक्ती ही नक्कीच श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मस्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये, नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते; म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. वृत्ती आवरणार्‍याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्मविचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे, साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मानतो; म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे, तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहीजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महीमा, त्याचे विभूतिमत्व, आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो.

सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूतिरूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात् भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात् गुणांची आणि भावांची जरूरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचे रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली; प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे ! तुकारामबुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला 'राम' म्हणाले नाहीत, किंव दत्ताला 'महादेव' म्हणाले नाहीत. जगत् हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात् आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहाते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेपलीकडे असते. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय; आणि जे सत्य आहे, ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय.

भगवंताची रूपे जेथून येतात, तेथे 'नामा'चे वास्तव्य आहे.


🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
1
Add a comment...

About this community

Explore more about yoga meditation to stay fit and healthy.
 
 
काबुल / कपीसा/ कश्यपपुरा  की  वर्तमान
स्थिति  के लिए कौन  जिम्मेदार  है ? क्या  हम है ?
क्या हम पापी नहीं ? हम नहीं तो पापी कौन है ?

वह ऐसे  लोग है। …जिन्हो ने मुग़ल को आते देख कर चहेरा ही बदल दिया। इल्तमश  को  ग़ज़नवी का  गवर्नर बनाने वाले  समानिद का आज का रूप  देख कर मई  हैरान हु। कुतबुद्दीन का आज का  रूप देख कर मई हैरान  हु।  मुइज़्ज़िद्दीन  का आजका रूप देख कर मई हैरान हु।  शेर शाह सूरी का आजका  रूप देख कर मई हैरान हु।  लव नंदन ( लन्दन)  को यही लोग क्विट रूप बदल कर  क्विट इंडिया कह सकते है। ।येह  देख कर  मई हैरान हु।  जहा नमक पकता नहीं वह उन्हें नमक का  सत्याग्रह करते देख कर मई हैरान हु।
 ·  Translate
“Arab marched through the central Iranian deserts. After long siege they took Nishapur ,( west of modern massshad) the main city of Khurasan After that Arab marched towards Sasanian in the northeast, the city of Marw. (Persian last ruler)Yazdajird third assesinated. Arab took control of plain of ...
1
1
Devanathan R's profile photo
Add a comment...
 
Home · About us · History · Sardhav History · Committee · Live Darshan · Event · Navratri Artist 2014 · Gallery · Navratri 2014 · Donner · Aarti 2014 · Asthami Havan (Patala) · Prasad 2014 · Makan Dan · NRI · Contact us. Garba play Ground. Navratri. Navratri 2013. Stage. Garba play Ground ...
1
Add a comment...
 
२० ऑगस्ट

दास विषयाचा झाला । सुखसमाधानाला आंचवला ॥

सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय ॥

त्यातच देहाला दुखणे । म्हणजे दुःखाचा कळस होय ॥

मिठाचे खारटपण । साखरेचे पांढरेपण ।

यांस नसे वेगळेपण । तैंसे देह आणि दुःख जाण ॥

देहाने जरी सुदृढ् झाला । तेथेही दुःखाचा विसर नाही पडला ॥

सांवली जशी शरीराला । तैसा रोग आहे शरीराला ॥

रामकृष्णादिक अवतार झाले । परी देहाने नाही उरले ॥

स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई । परि वियोगाचे दुःख अनिवार होई ॥

देहदुःख फार अनिवार । चित्त होई अस्थिर ॥

देहाचे भोग देहाचेच माथी । ते कोणास देता येत नाहीत । कोणाकडून घेता येत नाहीत ॥

आजवर जे जे काही आपण केले । ते ते प्रपंचाला अर्पण केले । स्वार्थाला सोडून नाही राहिले ॥


अधिकार, संतति, संपत्ति । लौकिकव्यवहार, जनप्रीति, ।

या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते । अखेर दुःखालाच कारण होते ॥

जो जो प्रयत्‍न केला आपण । तेच सुखाचे निधान समजून ।

कल्पनेने सुख मानले । हाती आले असे नाही झाले ॥

ज्याचे करावे बहुत भारी । थोडे चुकता उलट गुरगुरी ।

ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन । हे ओळखून वागावे आपण ॥

प्रपंचात आसक्ती ठेवणे । म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे ।

म्हणून आजवर खटाटोप खूप केला । परि कामाला नाही आला ॥

विषयातून शोधून काढले काही । दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही ॥

म्हणून प्रपंचाने सुखी झाला । ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ॥

ज्याची धरावी आस । त्याचे बनावे लागे दास ॥

दास विषयाचा झाला । तो सुखसमाधानाला आचवला ॥

ज्या रोपट्यास घालावे खतपाणी । त्याचेच फळ आपण घेई ॥

विषयास घातले खत जाण । तरी कैसे पावावे समाधान ? ॥

प्रपंचातील संकटे अनिवार । कारण प्रपंच दुःखरूप जाण ॥

आजवर नाही सुखी कोणी झाला । ज्यानी विषयी चित्त गुंतविले ॥

कडू कारले किती साखरेत घोळले । तरी नाही गोड झाले ।

तैसे विषयात सुख मानले । दुःख मात्र अनुभवास आले ॥

प्रपंचातील उपाधि । देत असे सुखदुःखाची प्राप्ति ॥

संतति, संपत्ति, वैभवाची प्राप्ती, । जगांतील मानसन्मानाची गति, ।

आधुनिक विद्येची संगति, । न येईल समाधानाप्रति ॥

प्रपंचातील सुखदुःखाची जोडी । आपणाला कधी न सोडी ॥

नामातच जो राहिला । नामापरता आठव नाही ज्याला ।

परमात्मा तारतो त्याला । हाच पुराणीचा दाखला ॥

नका करू आटाआटी । राम ठेवावा कंठी ॥


🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
1
Add a comment...

LAXMIKANT JAIN

Discussion  - 
 
 
#Yoga  is a holistic way of life - more than just asanas (postures) and pranayam (breathing techniques). It is about harmonising the body with the mind.
Combined with #ayurveda   – the program provides a multi dimensional routine, using the inherent principles of nature, to help maintain health by keeping the body, mind and spirit in perfect equilibrium.

for more information-->> http://bit.ly/1eLreWF

#AyurvedicTreatment   #DeepamMeditours  
#YogaAwareness   #AyurvedaAwerness  
3
Add a comment...
 
१५ ऑगस्ट

वृत्तिचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण.

आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला 'मी' कोण हे पाहावे, जे नासणार ते 'मी' कधी असणार नाही; म्हणजे पंचमहाभूतांचा 'मी' नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंतस्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते; तेव्हा त्यापैकी थोडा तरी 'मी' असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे, आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले, म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले, म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत.

आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहानसहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आमचे चुकते. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे, असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो, आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो, याला काय करावे ? जो परमार्थात जाणता, तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल ? अनेक बुद्धिमान, विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते, तिथे बावळटपणाला वावच नाही.

विद्वान लोक वेदान्त अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की, 'अरे, हा वेदान्त आपल्यासाठी नाही.' परंतु ही चूक आहे. वेदान्त हा सर्वांसाठी, सर्व मनुष्यमात्रासाठी आहे. वेदान्ताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदान्तात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत; त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून, आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा, दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते, आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही.

वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे,
आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
1
Add a comment...
 
१५ ऑगस्ट

वृत्तिचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण.

आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला 'मी' कोण हे पाहावे, जे नासणार ते 'मी' कधी असणार नाही; म्हणजे पंचमहाभूतांचा 'मी' नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंतस्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते; तेव्हा त्यापैकी थोडा तरी 'मी' असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे, आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले, म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले, म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत.

आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहानसहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आमचे चुकते. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे, असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो, आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो, याला काय करावे ? जो परमार्थात जाणता, तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल ? अनेक बुद्धिमान, विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते, तिथे बावळटपणाला वावच नाही.

विद्वान लोक वेदान्त अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की, 'अरे, हा वेदान्त आपल्यासाठी नाही.' परंतु ही चूक आहे. वेदान्त हा सर्वांसाठी, सर्व मनुष्यमात्रासाठी आहे. वेदान्ताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदान्तात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत; त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून, आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा, दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते, आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही.

वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे,
आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
1
Add a comment...
 
१२ ऑगस्ट

शांति परमात्मस्मरणाने मिळते.

नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संतलक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण. तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा-शांतिरूप आहे. त्याप्रमाणेच संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हीच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती. भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत-भावना, तिथे खरी शांती नाही. अनन्येतेने शांती प्राप्त होते, आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक अशाश्वत आहेत. त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. शांती बिघडायला दोन कारणे आहेत: एक: गत गोष्टींचा शोक, आणि दुसरे: पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही; पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे.

आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले. तो तेथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये-जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला, म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधुची शांती पूर्वीच्या स्थळी होती, तशीच दुसर्‍या ठिकाणीही कायम होती. शेतमालाकाला आश्चर्य वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. कर्तेपण आपल्याकडे घेऊ नये. अकर्तृत्वभाव ठेवावा. अशाने शांती येईल. जगच्चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजेरजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केले असताना मिळेल ? भगवत्स्मरणावाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते ते ते भगवद्‌इच्छेने घडते ही दृढ भावना असणे, हेच शांतीचे लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती, याने शांती येतेच असे नाही. निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे. मनाविरूद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल. मनातली शांती कायम ठेवून रागावता येते. तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही.

शांती परमात्मस्मरणाने मिळते. ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा.

🙏"श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज"🙏
 ·  Translate
2
1
bhaskaran B's profile photo
Add a comment...
 
This is the Age of Action and your Ideal Action will be when you Use your Identity- Position- Power for the Selfless Service (Karma Yoga) To Mankind/Humanity which is your Worship to GOD-

It is your DUTY to do KARMA YOGA (Good Deeds/ Selfless service for Humanity and Mother EARTH (Restoring its Original VIbration) Real Test is not Renouncing Material Life but how to Live like a Liberated Breathing ENTITY !

Goal is not isolation of the Self from Prakrti or Maya (Material Nature) but the integration of the individual Self to the Universal Self and the realization of the universe as the expression of Lord's spiritual Energy. The ideal is not the rejection of the universe but its assimilation to its Source.

It is your only DHARMA
It is your only TRUE RELIGION
It is your only TRUE CASTE
It is the Beginning and END of LIFE !

UNTIL HIS LAST BREATH-MAN HAS ONLY ONE DUTY AND THAT IS TO DO KARMA YOGA ! ONE WHO REMEMBERS THIS WILL MAKE SOMETHING OF HIS LIFE

Money shall loose it's worth soon, so if you have enough paper money, use it to Score good karma, buy Poor (street or otherwise) or one in need Food, Water, Clothes, Shelter, Give wisdom to the Ignorant and Courage to Foolish.
Karma yoga is the Highest Religious Practice of this time and will Liberate you

Those who do not Give back to Universe Finally shall start rotting in there body suits and you see the Decay on there Pathetic Faces !

Man is Recognised by his Deeds but not by his Birth- As by Birth we all are from Low Caste (Sudras)

Use the Internet for Jnana Yoga (Knowledge to get Wisdom) - Use the Internet to Bathe your Senses in Sacred Sounds - Use the Internet to Fix your Gaze on Divine Images that purify your Mind ! Use the Technology for your Upliftment ! 

B LIKE LOTUS There is Mud all around you, and you can feel them clearly. Above you, above this muddy pool of dirt, mud and filth, are Sunshine and Air. 
Air touches man from all Stratas and All Human Beings Breathe and Get coolness from SAME AIR ! 

SUNRAYS IS SAME FOR EVERYONE 

EACH SOUL After death Takes with it ALL the Experience, Impressions and Ideas which it Gained on Earth; it takes its Mind, its Intelligence, its intellect and powers of the senses and enjoys, or reaps the Fruits of its Own Thoughts and Deeds

After our Death Through our Soul What we Retain is our Individuality and continue to Exsist through ETERNITY !

YOU ARE HERE TO GIVE AND FOR THAT YOU HAVE BEEN GIVEN THIS VEHICLE CALLED BODY TO SCORE GOOD KARMA THROUGH GOOD DEEDS AND SELFLESS SERVICE ! NOT TO GET ACADEMICALLY QUALIFIED ONLY TO BECOME DOG OF ROTHSCHILD ILLUMINATI OWNED COMPANIES AND BRING THE PURPOSE OF EVIL TO FORE ~

DO KARMA YOGA AND MOVE ON PATH TO LIBERATION ! I AM WITH YOU 

HARE #KRIVADNA  
3
TrueKrishna Priya (UpgradedDNA)'s profile photoMeena Mukerjee's profile photo
3 comments
 
Because we don't realize atma tirth is the best pilgrimage..here we meet God who is not separate from His srishti so our service to people to enviornment becomes worship.thanks for your comment to my post.
Add a comment...

Rajesh Sharma

Yoga Meditation Lifestyle  - 
 
जय गुरुदेव
दिनांक 8/8/15 को शाम 7:30 (भारतीय समय) पूरी दुनिया में गुरूजी के साथ ध्यान होगा, जो गिनेस वर्ल्ड रिकॉर्ड होगा।
यह रिकॉर्ड ऑनलाइन कनेक्शन से ही होगा।
यह जरुरी है के आप अगर ग्रुप में भी बैठे है तो अपने स्मार्ट फ़ोन से ऑनलाइन कनेक्ट करें।
इस ऐतिहासिक आयोजन का हिस्सा बनने के लिए निचे दी हुई लिंक पर जाकर अपना रजिस्ट्रेशन करवाये।
Have you all registered for the global online meditation with srisri??
Its very simple!
Just click : http://planetmeditates.org/?oref=G2TFI
And enter your email id & click on I AM Participating!
Please do this NOW and confirm!
 ·  Translate
4
4
shantanu adhav's profile phototriloknath tripathi's profile photo
Add a comment...