Profile cover photo
Profile photo
Warli Painting Adivasi Art
40 followers -
India's Global Art, Proudly Tribal Art
India's Global Art, Proudly Tribal Art

40 followers
About
Posts

Post has shared content
|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : २८ फेब्रुवारी २०१७ ||

निसर्ग, पर्यावरण, जैव वैविध्यता, पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य जतन करून मानव व सगळ्या जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे जग आशेने बघत असताना, समाज अगदी नाजूक वळणावर आहे. एकीकडे समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था नष्ट होऊन परावलंबी पणा वाढत आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या मार्गाने हस्तांतरित होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावत आहे, पिढी च्या पिढी हळू हळू व्यसनातून नष्ट होते आहे, अनुसूचित क्षेत्रातील रोजगार व्यवसाय डोळ्यासमोरून जात आहेत, हक्क डावलले जात आहेत, योजना प्रत्येक्ष पोचत नाहीत, व्यवस्थेत संवेदने चा अभाव, सांस्कृतिक ओळख नष्ट होते आहे.

राज्यातील सगळ्यात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला परिसर "ठाणे / पालघर जिल्हा", दक्षिण गुजरात या परिसरातील अनुसूचित क्षेत्रावर तर प्रत्येक्ष - अप्रत्येक्ष आक्रमणे चालू आहेत. लवकरच आदिवासी समाज अल्पसंख्यांक होऊन नष्ट होण्याची भीती व्यक्त होते आहे. .... (यादी खूप मोठी आहे)

असो, हि सगळी सध्याची परिस्थिती, अनेक वर्षांची आदिवासी चळवळींचा इतिहास, सध्या युवा पिढीच्या प्राथमिकता, समाजा समोरील आव्हाने या विषयी अभ्यासपूर्वक चिंतन करून. समाजाचे प्रश्न/समस्या आव्हाने सोडविण्या च्या पुढे जाऊन रचनात्मक शाश्वत विकास, आदिवासी अस्मिता, सांस्कृतिक ओळख, परंपरा बद्दल समाजात आणि बिगर आदिवासीत संवेदना तयार करून समाजाची स्वाभिमानी स्वावलंबी पिढी तयार करण्याची प्रक्रिया मजबूत करण्यासाठी. आदिवासी हिता साठी होणारे प्रत्येक प्रयत्न मजबूत करण्याची व्यवस्था समाजात रूजवूया. आणि त्या साठी लागणारे संस्कार (जे आदिवासी जीवनशैलीचा सहज अविभाज्य भाग आहे) घरात, समाजात टिकावे त्या साठी प्रयत्न करूया.

याच प्रेरणेने आपण १९९९ पासून विविध सामाजिक चळवळींचा अनुभव/निरीक्षण करून समाजाची स्वतःची स्वालंबी व्यवस्था मजबूत करण्यासाठी युवांचा सहभाग व्हावा यासाठी २००७ पासून आयुश (आदिवासी युवा शक्ती) च्या माध्यमातून विविध उपक्रमांची सुरवात केली गेली. २०११ साली संस्था म्हणून नोंदणी झाली, आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागाने आणि सहकार्याने हे कार्य विविध क्षेत्रात पसरते आहे.

आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान जतन (आदिवासी कला जतन - वारली चित्रकला) उपक्रम राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती), तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते. अगणित पिढ्यानपासून जतन केलेले हे ज्ञान फक्त चित्रा पुरते मर्यादित न ठेवता सामाजिक जीवन, विकासाला आदर्श दिशा म्हणून त्या विषयी जागरूकता आणि विविध कल्पक प्रयत्नातून रोजगार निर्मिती चे प्रयत्न चालू आहेत.

मार्गदर्शक तत्व -

माती : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता करून प्रसार करणे
पाणी : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून स्पर्धात्मकता वाढवणे
चावूल : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करणे

या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी

[अदिकला]
१) अनुभवी कलाकारांसाठी सहकार्य -
आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांची कलाकृती स्थानिक, राज्य, राष्ट्र व आंतराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक्ष ग्राहकांपर्यंत पोचून. त्यांचे आर्थिक सबळीकरण करण्यासाठी चा प्रयत्न आहे. कलाकारांनी त्वरित आपली कलाकृती चे नमुने/माहिती आयुश केंद्रात जमा करावे. होणाऱ्या विविध प्रदर्शनात/कार्यक्रमात/वेबसाईट वर त्या कलाकृतींना प्रसिद्धी दिली जाईल.

२) नवोदित कलाकारांसाठी संधी -
ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर चित्र काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे, गवताच्या शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड, पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी कार्याची आवड आहे आणि त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० चा गट बनवून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क करून नाव नोंदणी करावी, आपल्या संपर्कातल्या कलाकारांना कळवावे.

३) आदिवासी कलाकृती निर्मिती : परवा हॉंगकॉंग येथून मेमेराकी डॉट कॉम तर्फे श्रीमती योशा यांनी संपर्क केला होता. विविध वस्तूवर वारली चित्रकला काढण्या संबधी बोलणे झाले त्यानी नमुना म्हणून २ चामड्याच्या पर्स वर चित्र कलाकृती करण्यासाठी कुरियर केले आहे लवकरच ते पूर्ण करून पाठवण्यात येईल. गुणवत्ता तपासून लवकरच पुढील सविस्तर करार करण्यात येईल. त्यांच्याकडून पर्सवर चित्र काढण्यासाठी नियमित काम दिले जाईल.

४) इत्तर मागण्या - लाकडाच्या वस्तू साठी पुणे येथून चौकशी करण्यात अली आहे. चेन्नई येथून पुरो क्राफ्ट कडून चित्रांची एकत्रित मागणी आली आहे. बेंगळुरू आणि हैदराबाद येथील घराच्या भिंतीवर चित्र काढण्यासाठी चौकशी करण्यात आली आहे.

५) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे कलाकृती केंद्र - ९ मार्च रोजी त्यांच्या कार्यालयातून संपर्क करून आदिवासी कलाकृती तेथील कलाकेंद्रात विक्रीसाठी ठेवण्यासाठी चौकशी केली. लवकरच या संबंधित सविस्तर चर्चा करण्यात येईल. इच्छुक कलाकारांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा

६) सुवास ट्रस्ट साडी चित्रीकरण प्रकल्प - प्रसाशकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून सुवास ट्रस्ट ची स्थापना केली आहे. शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा मुख्य उद्देश ठेवून विविध आदिवासी कलाकृतींना प्रसिद्धी देऊन आदिवासी कलाकारांचे आर्थिक मजबुती करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. सध्या ते मधुबनी चित्र सोबत काम करीत आहेत. सुवास ट्रस्ट तर्फे साडीवर चित्र काढण्यासाठी चौकशीचे करण्यात आलो आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास कोईंबतूर, सुरत, पश्चिम बंगाल येथून सिल्क आणि कॉटन च्या साड्या चित्रीकरणासाठी आयुश ला पाठवल्या जातील. प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे, ट्रस्ट ची टीम लवकरच डहाणू ला भेट देऊन पुढील औपचारीकता पूर्ण करतील.

७) SNDT कॉलेज MSW साठी इंटर्नशिप : मुंबईतील SNDT महाविद्यालयातील MSW अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचा अनुभव मिळावा या साठी प्रथम व द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांना १ महिन्याचे इंटर्नशिप च्या माध्यमातून आयुश च्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे.९मार्च रोजी त्यांनी संपर्क करून चौकशी केली. लवकरच सविस्तर चर्चेसाठी ठरविले जाईल.
.
८) आदिवासी कलाकार : आदिवासी कलाकारांचे प्रोफाइल मार्केटिंग साठी, जिथे जिथे आदिवासी कलाकार सहभागी होतील त्याची माहिती एका ठिकाणी मिळावे या साठी प्रयोग करतो आहोत. आपल्या माहितीत असे काही कार्यक्रम/कलाकार व्हिजिट आल्यास जरूर कळवावे, आपण प्रसारित करूया

९) स्थानिक पातळीवर कला बँक ची निर्मिती : विविध गाव पाड्यावर विखुरलेले आदिवासी कलाकार, आणि कलाकृती सुरक्षित साठविण्यासाठीच्या अडचणी लक्षात घेऊन. कलाकृती एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या साठी आपण रेल्वे स्थानका जवळ (खंबाळे) आणि महामार्ग जवळ (वाघाडी) येथे कला बँक ची निर्मित करण्यात येणार आहे. परिसरातील कलाकारांनी आपल्या कलाकृती आणि नमुना कलाकृती जमा करून नोंदणी करावी.
आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.

१०) पुणे येथे कला विक्री केंद्र : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.

११) चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया
वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-

(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in, BuffyFish, Unexplora, Puro Kraft,

(नोंदणी/करार चर्चा चालू आहे) : हस्त वेमा. ->> यादी आणखीन वाढते आहे.

१२) CSR उपक्रम मुंबई येथे प्राथमिक चर्चा बैठक : २० फेब रोजी भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI - रिजर्व बँक ऑफ इंडिया ची संस्था, देशभरातील सगळे ऑनलाईन व्यवहार या संस्थे मार्फत होतात) यांच्या मुंबई येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक चर्चेची बैठक झाली यात आयुश तर्फे प्रो चेतन दा गुरोडा, बबलू दा वाहुत, प्रांजण दा राऊत सहभागी झाले होते. सकारात्मक आणि स्वानंदात्मक चर्चा झाली, नवीन तंत्रज्ञान चा उपयोग करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी या साठी त्यांच्या सुचने नुसार प्रस्थाव जमा केला आहे, लवकरच त्या संदर्भात सविस्तर चर्चा / प्रेसेंटेशन देण्यात येईल.

१३) पारंपरिक ज्ञान जतन प्रकल्प : समाजात विखुरलेले पारंपरिक ज्ञान विविध माध्यमातून संग्रहित करणे. या प्रकल्पात लिखाण, छायाचित्रीकरण, ध्वनी मुद्रण, चित्रीकरण, संग्रह करून सहभागी होऊन आपल्या समाजाची बौद्धिक संपदा जतन करण्यासाठी हातभार लावूया. इच्छुकांनी संपर्क करावा.

१४) आदिवासी संस्कृती जागरण उपक्रम : आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान या बद्दल जागरूकता करण्यासाठी विविध माध्यमातून शाळा/कॉलेज/पाडा/गाव/शहर या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करणे. आपल्या परिसरात असे कार्यक्रम आयोजित करून किंवा या साठी सहकार्य करून समाज जागृतीच्या कामाला हातभार लावण्यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा.

१५) आयुश चे ऑडिट - आयुश चे संस्था म्हणून नोंद "आदिवासी युवा सेवा संघ" या नावाने आहे, संस्थेचे ऑडिट पूर्ण झाले. ठाणे येथील चार्टड अकॉउंटन्ट यांच्याकडून पूर्ण तपासणी प्रक्रिया केली गेली

१६) सहकार्य आणि सहभाग:
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर, आर्थिक साहाय्य, नवीन आयडिया देणे, संपर्क वाढविणे, जाहिरात करणे, कलाकृती विक्रीसाठी सहकार्य, रोजगार निर्मितीचे उपक्रम मजबुती करण इत्यादी)

#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे : https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.join.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता.

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !

Lets do it together! | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of this Initiative through Warli Painting
माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology
चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

Post has attachment

|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जानेवारी २०१६ ||

पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य, निसर्ग, पर्यावरण, जैव वैविध्यता जतन करून मानव तसेच सगळ्या जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे जग आशेने बघत असताना, समाज अगदी नाजूक वळणावर आहे. एकीकडे समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था नष्ट होते आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या मार्गाने हस्तांतरित होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावत आहे, पिढी च्या पिढी हळू हळू व्यसनातून नष्ट होते आहे, अनुसूचित क्षेत्रातील रोजगार व्यवसाय डोळ्यासमोरून जात आहेत, हक्क डावलले जात आहेत, योजना प्रत्येक्ष पोचत नाहीत, व्यवस्थेत संवेदने चा अभाव, सांस्कृतिक ओळख नष्ट होते आहे, .... (यादी खूप मोठी आहे)

असो, या सगळ्याचा सविस्तर अभ्यास करून प्रत्येक क्षेत्रात समाज हित जपून एकमेकांना पूरक रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देऊन/प्रत्येक्ष उपक्रम सुरवात /सहकार्य /सहभागी होऊन प्रयत्न करून या समस्यांच्या मुळाशी कायमची उपाययोजना प्रत्येक्ष कृतीत उतरवली तर नक्कीच समाजाला आपण चांगले भविष्य देऊ शकतो. त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया.

याच प्रेरणेने आपण गेली काही वर्षे आयुश (आदिवासी युवा शक्ती) या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. आयुश बद्दल २ शब्द १९९९ पासून आयुश च्या संकल्पनेला सुरवात झाली. विविध सामाजिक चळवळींचा अभ्यास, निरीक्षण, सहभाग करून समाज हित प्राथमिकता ठेवून समाजातूनच प्रयत्न व्हावे आणि त्यात युवकांचा सहभाग वाढवावा या साठी २००७ पासून विविध कार्यक्रम घेणे चालू केले. २०११ साली संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. आणि सध्या वेग वेगळ्या माध्यमातून समाज जागृतीचे प्रयत्न चालू आहेत आणि आपल्या माध्यमातून दिवसेंदिवस अधिक प्रभावी बनवतो आहोत.

आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान जतन (आदिवासी कला -वारली चित्रकला) उपक्रम राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती), तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते. हीच मार्गदर्शक दिशा ठरवून आपण विविध उपक्रम करतो आहोत.

माती : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता करणे
पाणी : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून स्पर्धात्मकता वाढवणे
चावूल : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करणे

या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी

[चावूल]

१) झारखंड येथील आदिवासी अभ्यासक आणि चिंतक यांची भेट :
आदिवासी जीवन या बद्दल जागरूकता पसरवणारी प्रसिद्ध आणि अभ्यासू "आदिवासी दर्शन" डॉक्युमेंट्री ची निर्मिती करणारे बीर बिरू ओंपाय मेडिया कंपनी चे, तसेच ‘जोहार सहिया", ‘जोहार दिसुम खबर’ चे संपादक ए के पंकज हे झारखंडहून डहाणू येथे आले होते. सध्या ते आदिवासी कलाकृती विषयी अभ्यास करून त्यावर डॉक्युमेंट्री बनवत आहेत त्या संदर्भात जिव्या सोमा म्हसे यांची मुलाखत घेण्या साठी ते आले होते. पण त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने त्यांना मुलाखत देणे जमले नाही. जाता जाता येथील डहाणू आणि बोईसर येथील स्थानिक कार्यकर्त्यांशी भेटून गेले.

२) *डहाणू रेल्वे स्थानक सुशोभीकरण प्रकल्प - चित्र दुरुस्ती * : "आमची वारली आमची शान" उपक्रमात काढलेली चित्र कौतकास्पद प्रयत्न आहे.
त्या साठी रोशनी फाउंडेशन चैरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि रिलायंस इंफ्रास्ट्रक्चर तसेच कलाकार यांचे आभार! आज वारली कला बघन्या/अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक/अभ्यासक डहाणू परिसरात येतात त्यांच्यासाठी तसेच स्थानीय आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्यासाठी या चित्रामुळे स्थानकाचे वातावरण बदलून गेलेले दिसेल यात शंका नाही. तसेच आदिवासी समाजाचा आत्मविश्वास वाढी साठी कामी येईल अशी अपेक्षा. (यात कोणताही विशिष्ट पंथ किंवा धर्म यांच्या गोष्टी पेक्षा आदिवासी परंपरा/पर्यावरण/निसर्ग वर चित्र अधिक समर्पक)

येथील चित्रात दाखवलेल्या काही आक्षेपार्ह्य चित्राबद्दल अनेकांच्या तक्रारी आल्यावर या एक सामाजिक जबाबदारी म्हणून या संदर्भात संबंधित संस्था यांना लेखी तक्रार केल्या नंतर त्यांनी त्वरित सुधारणा करण्यासाठी तयारी दाखवली, या संदर्भात चर्चे साठी दिनांक ६ फेब रोजी डहाणू रोड स्टेशन येथे त्यांची टीम अली होती. समाजातील जागरूक नागरिक म्हणून अनेकांनी चर्चेत सहभाग घेऊन त्या बद्दल समाजाच्या भावना कळवल्या. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग जास्त होता. त्या नंतर लगेच संबंधितांनी त्या चित्रात दुरुस्ती पूर्ण केली. या पुढे आदिवासी संस्कृती आणि परंपरा या विषयी काही चुकीचा संदेश

या निमित्ताने आदिवासी संस्कृती आणि परंपरा या विषयी pride तयार करणारी व्यवस्था समाजात मजबूत करण्याची आवश्यकता आहे असे जाणवले.

३) बापूगांव येथे वारली चित्रकला कार्यशाळा - हार्ट बिट : विविध सामाजिक कार्यक्रम व वारली चित्रकले साठी अंतर राष्ट्रीय पातळीवर नामांकित कलाकार रमेश दा हेंगाडी यांच्या गावी बापुगाव येथे २२ जानेवारी रोजी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विविध कलाकृती आणि सांस्कृतिक प्रात्याक्षिके ठेवण्यात आली होती. The British Ceramics Biennial (BCB), Manchester Metropolitan University (MMU), Center for Environmental Planning & Technology (CEPT) यांच्या संयुक्त विद्यमाने भारत आणि इंग्लंड येथील कलाकारांना एकत्र आणून निवासी कार्यक्रम ९ ते २३ जानेवारी दरम्यान सुरु आहे यात इंग्लंड येथून आलेले १० कलाकार/अधिकारी सोबत स्थानिक आदिवासी कलाकार सहभागी झाले होते. कला,संस्कृती, परंपरा यात आवड असलेल्यांनी भेट दिली, विद्यार्थ्यांनी मोठ्या आतुरतेने या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रायोजक आर्ट कौन्सिल इंग्लंड हे होते. रमेश दा यांचे VDO निमंत्रण येथे बघू शकता https://youtu.be/RjK6QkHRJHw

३) आदिवासी पारंपरिक कला अभ्यास : वारली चित्राला चे प्रात्यक्षिक आणि परंपरा समजून घेण्यासाठी विविध अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी भेट देतात किंवा मेल द्वारे माहिती मागवतात. अंदाजे १० विविध चौकशी विषयी माहिती पुरविण्यात आली. चेन्नई येथील आंतराष्ट्रीय शाळेत प्रायोगिक तत्वावर वारली चित्रकलेची कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरले आहे, त्या साठी प्राथमिक बोलणे आणि अभ्यासक्रमाचे स्वरूव यावर चर्चा चालू आहे. यशस्वी झाल्यास तेथील १० शाळांत हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. तसेच महाराष्ट्रात पण प्रयत्न करूया (आणि खास करून आश्रम शाळेत)

४) आदिवासी कलाकृती निर्मिती : परवा हॉंगकॉंग येथून मेमेराकी डॉट कॉम तर्फे श्रीमती योशा यांनी संपर्क केला होता. विविध वस्तूवर वारली चित्रकला काढण्या संबधी बोलणे झाले लवकरच पुढील सविस्तर करार करण्यात येईल. त्यानी नमुना म्हणून २ चामड्याच्या पर्स वर चित्र कलाकृती करण्यासाठी कुरियर केले आहे या आठवड्यात ते पूर्ण करून पाठवण्यात येईल.

५) *मुंबई येथील ताजमहाल हॉटेल मध्ये प्रदर्शन * : मुंबईतील ताज हॉटेल च्या जास्त काळ (६ महिने - १ वर्ष) राहणाऱ्या निवास स्थानात वारली चित्रकलेचे प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन ठेवले होते. इतक्या प्रशस्थ संस्थेत कार्यक्रम करण्याचा पहिलाच अनुभव असल्याने बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालेल्या, त्यांच्या अभिप्राय पण पुढील कार्यक्रम अधिक उत्तम करण्यासाठी कामी येईल

५) SNDT कॉलेज मधील MSW विद्यार्थिनी : सूत्रकार येथील रीना घरत या १ महिन्याच्या इंटर्नशिप मार्फत आयुश च्या उपक्रमाला साहाय्य करीत आहेत. वारली चित्रकारांचे अनुभव जाणून घेण्यासाठी मुलाखत, तलासरी तील व्यवसाय निरीक्षण, आदिवासी भाजीपाला विक्री यावर सर्वे करून काही प्रकल्प सूचना बनविण्याचे ठरविले आहे. लवकरच त्यांचा अहवाल सादर करतील. तसेच मुंबई येथील त्यांच्या महाविद्यालयात प्रदर्शनात आपल्या कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांनी नेल्या होत्या.

६) *कमलाकर उराडे पंप उद्योग * : २०१५ साली कमलाकर उराडे यांनी इंधन रहित तयार केलेल्या पंपाच्या साहाय्याने ग्रामीण पातळीवरील पाणी उपसा आणि पर्यावरण ऊर्जा जतन करून प्रभावी पर्याय देऊ शकतो आणि सोबत रोजगार निर्मिती होऊ शकते या उद्देशाने चालू केलेले हे कार्य सोबत IIT मुंबई चे प्रयत्न. झारखंड येथील चेतन एम टेक चे विद्यार्थी आणि त्यांची टीम यांनी कमलाकर उराडे पंपाचे विस्तृत ३D मॉडेल डिझाईन बनवले आहे. आता त्या नुसार एक नमुना पम्प बनवून चाचणी करण्यात येईल. त्या नंतर सविस्तर अहवाल बनवून वयक्तिक/खाजगी/CSR/शाशकीय अर्थ साहाय्यासाठी निवेदन बनवण्यात येईल. १४ जानेवारी रोजी वाघाडी येथे बैठक झाली

७) आदिवासी कलाकार : आदिवासी कलाकारांचे प्रोफाइल मार्केटिंग साठी, जिथे जिथे आदिवासी कलाकार सहभागी होतील त्याची माहिती एका ठिकाणी मिळावे या साठी प्रयोग करतो आहोत. आपल्या माहितीत असे काही कार्यक्रम/कलाकार व्हिजिट आल्यास जरूर कळवावे, आपण प्रसारित करूया

८) स्थानिक पातळीवर कला बँक ची निर्मिती : विविध गाव पाड्यावर विखुरलेले आदिवासी कलाकार, आणि कलाकृती सुरक्षित साठविण्यासाठीच्या अडचणी लक्षात घेऊन. कलाकृती एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या साठी आपण रेल्वे स्थानका जवळ (खंबाळे) आणि महामार्ग जवळ (वाघाडी) येथे कला बँक ची निर्मित करण्यात येणार आहे. परिसरातील कलाकारांनी आपल्या कलाकृती आणि नमुना कलाकृती जमा करून नोंदणी करावी. सगळ्या आदिवासी कलाकारांनी या संधीचा उपयोग आपल्या कलाकृती जगभर पसरवण्यासाठी उपयोगात आणावे. ज्या कलाकारांना आपल्या कलाकृती विक्री/मार्केटिंग साठी जमा करायचे असल्यास त्वरित नोंदणी करून नमुना प्रोडक्ट्स वाघाडी/खंबाळे येथील अयुश केंद्रात जमा करावेत.

आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.

९) पुणे येथे कला विक्री केंद्र : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.

१०) चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया
वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-

(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in, BuffyFish, Unexplora, Puro Kraft,

(नोंदणी/करार चर्चा चालू आहे) : हस्त वेमा. ->> यादी आणखीन वाढते आहे.

स्थानिक पातळीवर आदिवासी कलाकारांना रोजगार मजबुती कारणासाठी प्रकल्प :
चित्र, बांबूच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, सोंगे, खेळणे, वाजवायच्या वस्तू, मान्द्रा, गवताच्या टोपी, इत्यादी जे काही कलाकृती वस्तू बनवल्या असतील त्या आपण घरी बसल्या पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्री करू शकता. आयुश चे संकेत स्थळ हक्काने सगळ्या आदिवासी कलाकारांसाठी, नोंदणीसाठी त्वरित संपर्क करावा.

११) CSR उपक्रम मुंबई येथे प्राथमिक चर्चा बैठक : २० फेब रोजी भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम यांच्या मुंबई येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक चर्चेची बैठक झाली यात आयुश तर्फे प्रो चेतन दा गुरोडा, बबलू वाहुत, प्रांजण राऊत सहभागी झाले होते. सकारात्मक आणि स्वानंदात्मक चर्चा झाली. पुढील बैठक १५ दिवसांनी होईल त्या वेळेस उपक्रम विषयी सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात येईल.

[माती]

१३)संयुक्त राष्ट्र संघ च्या कार्यक्रमात सहभाग : संयुक्त राष्ट्र संघा तर्फे जागतिक आदिवासी विषयावर नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आयुश तर्फे सचिन सातवी आणि डॉ सुनील पऱ्हाड यांच्या नावाचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. कार्यक्रम पुढील प्रमाणे .
16th session of the Permanent Forum on Indigenous Issues (24 April – 5 May 2017) - न्यूयॉर्क
10th session of the Expert Mechanism on the Rights of Indigenous Peoples (19 – 23 June 2017) - जिनेव्हा
निवड झाल्यास पुढील विषयावर प्रेझेन्टेशन सादर करण्यात येईल (जागतिक आदिवासी समाजाला जोडणारा दुवा मजबुती साठी प्रयत्न)
- पारंपरिक ज्ञान जतन करून रोजगार निर्मितीचे उपक्रमातून आर्थिक स्वावलंबन व सांस्कृतिक संपदा टिकविणे
- आदिवासी समाज काल, आज आणि उद्या : भारतातील आदिवासी समाजा समोरील आव्हाने आणि तरतुदी
सदर विषयावर काही इनपूट आणि आपले मार्गदर्शन अपेक्षित आहे.

१४) पारंपरिक ज्ञान जतन प्रकल्प : समाजात विखुरलेले पारंपरिक ज्ञान विविध माध्यमातून संग्रहित करणे. या प्रकल्पात लिखाण, छायाचित्रीकरण, ध्वनी मुद्रण, चित्रीकरण, संग्रह करून सहभागी होऊन आपल्या समाजाची बौद्धिक संपदा जतन करण्यासाठी हातभार लावूया. इच्छुकांनी संपर्क करावा.

१५) आदिवासी संस्कृती जागरण उपक्रम : आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान या बद्दल जागरूकता करण्यासाठी विविध माध्यमातून शाळा/कॉलेज/पाडा/गाव/शहर या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करणे. आपल्या परिसरात असे कार्यक्रम आयोजित करून किंवा या साठी सहकार्य करून समाज जागृतीच्या कामाला हातभार लावण्यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा.

१६) वारली हाट विकास समिती : आदिवासी कलाकार/संस्था प्रतिनिधित्व बाबत - अजून उत्तर येणे बाकी आहे
या संदर्भात लेखी निवेदन जमा केले आहे : जिल्हाधिकारी- पालघर, प्रकल्प अधिकारी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, अपर आयुक्त - आदिवासी विकास विभाग ठाणे, आयुक्त - आदिवासी विकास विभाग नाशिक, सचिव - आदिवासी विकास विभाग मुंबई,
सदर विषय प्रत्येक्ष चर्चा करून लेखी निवेदन जमा केले आहे : मंत्री/पालक मंत्री - आदिवासी विकास यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. आयुक्त - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण निवेदन देऊन चर्चा केली आहे.

१७) आपल्या माहिती साठी वारली चित्रकला - बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शनी नोंदणी : पारंपरिक आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन व्हावे या साठी २०१० पासून सर्व कार्यालयीन प्रक्रिया करून २०१५ मध्ये बौद्धिक संपदा नोंदणी पूर्ण झाली. या सगळ्या प्रक्रिये सगळे कार्य (आर्थिक आणि कार्यलयीन कामकाज ) आदिवासी युवकांनी स्वयंसेवी प्रेरणेने केले. (दुर्दैवाने कोणतीही शासकीय मदत नाही)

१८) आदिवासी नेतृत्व परिचय : झारखंड मधील बिशुनपूर चे आमदार चामर लिंडा हे देशभरातील आदिवासी लोकप्रतिनिधींना भेटत आहेत, आदिवासी प्रश्नावर राष्ट्रीय पातळीवर लोकप्रतिनिधींचा दबाव गट तयार करण्यासाठी असा प्रयत्न गरजेचा आहे. १९ नोव्हेंबर रोजी केळवा येथील बिरसा मुंडा जयंती, २० ला कासा येथील आदिवासी क्रांतिवीर जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गर्शन केले. तसेच पालघर जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींची भेट करून दिली गेली. २१ रोजी नाशिक येथील कार्यकर्त्यांशी, २२ रोजी पुणे येथे कार्यकर्त्यांशी बैठक झाली. पुढच्या महिन्यात हैदराबाद येथे तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मधील आदिवासी लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याचे ठरले आहे. त्या नुसार तेलंगणा आणि आंध्र मधील लोकप्रतिनिधींशी संपर्क चालू आहे.

२०) इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ - "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती
प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली चित्र). सदर पाठ मध्ये उल्लेख आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून, आदिवासी समाजात असेलेल स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन मंडळ, आदिवासी संशोधन व प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद गारे) यांचे वारली चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन दिले आहे. ११ जानेवारी रोजी "तक्रार निवारण सहाय्य पथक" तर्फे सदर प्रकरण संदर्भात पुढील कार्यवाही व्हावी या साठी संबंधित कार्यालयाला कळवण्यात आले आहे

२१) शासकीय पातळीवर आदिवासी कला अभ्यासक्रम निर्मिती : आदिवासी कला आणि पारंपारिक ज्ञान यांच्या आधारे विविध रोजगार निर्मिती अभ्यासक्रम निर्माण करण्या हेतू केंद्रीय कौशल्य आणि इंतरप्रेनरशिप विकास विभाग (Ministry of Skill Development and Entrepreneurship Development) तर्फे आयुश ला अभ्यास भेट देण्या साठी उच्च अधिकारी गट डहाणू - वाघाडी येणार आहे. सदर विषयी चर्चेत सहभागी होण्या साठी इच्छुक अभ्यासकांनी संपर्क करावा (पहिली बैठक मुंबई येथे झाली होती). पुढील सूचनेच्या प्रतीक्षेत

२२) दिनांक ९ डिसेंबर २०१५ रोजी पुणे MSCERT येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) यांच्या स्थरावर आदिवासी बोली भाषा साहित्य प्रमाणीकरण समिती ची पहिली बैठक पार पडली. परिषदेने २०१५-१६ या वर्षात महाराष्ट्रातील आदिवासी बोली भाषा बोलणाऱ्या १६ जिल्ह्यातील १० आदिवासी बोली भाषांची निवड करून त्या भाषांमध्ये "ओढ्या काठी" व "खेळच खेळ" या दोन शीर्षकांची निर्मिती करून अनुवाद केला आहे. हि दोन शीर्षके १६ जिल्ह्यातील शाळांना पुरवली जाणार आहे. पुस्तक छपाई पूर्वी हे साहित्य आदिवासी बोली भाषा प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करण्यासाठी समितीची सभा अयॊजित केली होती. अजून पुढील प्रक्रिये विषयी उत्तर अपेक्षित आहे

समिती सहभागी झालेले सदस्य : सीताराम मंडाले, सचिन सातवी, सुनील गायकवाड, रमजान गुलाब तडवी, सुभाष मेंगाळ, देविदास हिंदोळे, जितेंद्र सुळे, सी के पाटील, वनमाला पवार, लहू गांगड.

पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १० बोली भाषा : वारली, भिली, पावरी, मावची, निहाली, परधान, गोंडी, कोलामी, कोरकू, कातकरी.

२३) सहकार्य आणि सहभाग:
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय,चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर, आर्थिक साहाय्य, नवीन आयडिया देणे, संपर्क वाढविणे, जाहिरात करणे, इत्यादी)

#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे : https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता.

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !

Lets do it together!

AYUSHonline team
www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of this Initiative through Warli Painting
माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology
चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

Post has attachment
|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ ||

पर्यावरण जतन आणि मानवी मुल्य या साठी जग आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांच्या कडे आशेने बघत असताना आपल्या नवीन पिढीची नाळ आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवशक्यता आहे. आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया.

त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया.

आपल्या माहिती साठी

1) इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ - "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती
प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली चित्र).
सदर पाठ मध्ये उल्लेख आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून, आदिवासी समाजात असेलेल स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन मंडळ, आदिवासी संशोधन व प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद गारे) यांचे वारली चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन दिले आहे.

२) वारली चित्र विक्री साठी करार चर्चा :
- चित्र विक्री साठीचा करार आणि संबधित चर्चे साठी इन्फ़ीस्त्रायीद्स (Infistrides) कंपनी तर्फे बरोदडा येथून अभिषेक आणि संकेत आयुश भेटी साठी ३जून रोजी वाघाडी येथे आले होते. संजयदा पऱ्हाड, वनश्या दा भूजड, संदीप दा भोइर, अभिजित दा पिलेना, सचिन सातवी यांच्या सोबत वाघाडी येथे चर्चा झाली. आदिवासी कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांच्या कंपनी तर्फे असेलेले उपक्रम आणि विक्री चक्र यावर सविस्तर चर्चा झाली आणि चित्र वस्तू नमुने परीक्षण केले. करारा वर चर्चा चालू आहे.

- दिल्ली येथील नवरंग क्रियेशन यांनी वारली चित्र खरेदी साठी चौकशी केली आहे. त्यांच्या सोबत चर्चा चालू आहेत

- आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together!

३) वारली चित्र संस्कृती आणि परंपरा या विषयी चर्चा :
- वारली चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या अभ्यासा साठी निफ्ट-मुंबई (National Institute of Fashion Technology) येथून प्रा निकिता आणि ८ विद्यार्थी / विद्यार्थिनी हे १ जून रोजी डहाणू येथे आले आहेत. डहाणू येथे सचिन सातवी यांनी आदिवासी परंपरा, संस्कृती, वारली चित्रकला, आयुश चे उपक्रम या विषयी माहिती दिली. डहाणू येथे १० दिवस राहून विविध कलाकार यांची भेट घेत आहेत. (जिव्या सोमा म्हसे, संपत दा ठाणकर, संजय दा पऱ्हाड, शर्मिला ताई घाटाळ, अभिजित दा पिलेना, यांची भेट घेतली)

- महाराष्ट्रातील आदिवासींवर डॉक्युमेंट्री बावण्याच्या उद्देशाने आदिवासी जीवन शैली, कला , संस्कृती या विषयी अधिक माहिती जाणून घेण्य साठी इंग्लंड येथील आर एफ एस इंटरटेंटमेंट (RFS Entertainment) कंपनीच्या भारताच्या विभागाच्या एम डी श्रीमती वरुणा राणा (India Got Talent - Director) यांनी २९ मे रोजी तलासरी येथे भेट देवून स्थनीक आमदार आणि वसतिगृह यांना भेट दिली. २मे रोजी वाघाडी येथे आयुश ला भेट देवून वारली चित्रकला उपक्रमा विषयी अधिक वितृत चर्चा. तसेच संपत दादा ठाणकर यांच्या सोबत चर्चा केली. ६ जून रोजी संपत दा ठाणकर यांची आदिवासी परंपरा, संस्कृती आणि विविध सामाजिक समस्या या विषयावर मुलाखत चित्रित करण्यात आली.

४) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण :
वनश्या दा भूजड यांच्या विविध नमुना वस्तूंचे चित्रीकरण करण्यात आले. लाकडी वस्तू, कारागिरी, बांबू वस्तू, वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी ज्या कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे. छाया चित्रन करून संकेत स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील किवा संबधित मार्गदर्शन केले जायील.

५) कलाकृती विक्री :
- चित्र विक्री साठी एक महिना चर्चे नंतर, ३० एप्रिल रोजी चेन्नई येथील क्राफ्ट कंपनी ला काही नमुना चित्र पाठवले होते. त्यातील चित्रांची निवड होवून लवकरच २०० चित्रांची मागणीदेत आहेत. सध्या प्राथमिक ५० नमुने बनविणे चालू केले आहे. २५ चित्रे पुरुष चित्रकारांचा गट संजय दा पऱ्हाड यांच्या नेतृत्वात तसेच २५ चित्रे महिलां चित्रकारांचा गट शर्मिला ताई घाटाळ यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहेत.

- मुंबई येथील मेहता परिवाराला वारली चित्र ने साकारलेली एक नवीन पद्धतीची भेट वस्तू निर्मिती साठी चर्चा चालू आहे. संजय दा पऱ्हाड या निर्मिती विषयक चर्चे साठी उद्या मुंबई (अंधेरी) येथे भेट देत आहेत. नवीन वस्तू निर्मिती साठीच्या कल्पकता आणि तंत्रज्ञान यांचा पुयोग करून व्यापकता वाढवण्या साठी उपयोगात येयील

- आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.

६) सहकार्य आणि सहभाग :
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, इत्यादी) संपर्क करून सहभागी होवू शकतात. सदर उपक्रमात इच्छुक छायाचित्रकार/चित्रकार/फोटो एडिटिंग सहभाग घेवून सहकार्य करू शकतात.

७) इत्तर :
- MSG २ या वादग्रस्त चित्रपट निर्मात्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या अंतर्गत कारवाही व्हावी या साठी दिलेल्या निवेदन संदर्भात SP पालघर यांनी SDPO डहाणू यांची भेट घेण्या साठी आयुश तर्फे सचिन सातवी यांनी त्यांच्या कार्यालयाला दिनांक २ जून रोजी भेट घेतली. त्यांच्या कार्यक्षेत्रात हि घटना येत नसल्यामुळे एकंदरीत गोंधळाचे वातावरण झाले होते. त्यांनी त्यांच्या पातळीवरून जमेल सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले

# वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे : https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli
आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता
आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. हेच आयुश आहे.
Lets do it together!

AYUSHonline team
www.adiyuva.in | www.warli.in
Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of our Initiative through Warli Painting
माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology
चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

Post has shared content
Made & Sale by Adivasi, Get it at
 info@warli.in warlikala.com

Special Discounts for Bulk Purchase (Minimum QTY 100)
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
Wooden Product (Code W)
15 Photos - View album

Post has shared content
Lets promote Tribal Entrepreneurship to ensure sustainability, Lets do it together!
Made & Sale by Adivasi, Get it at
 info@warli.in warlikala.com
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
Jute Products (Code J)
18 Photos - View album

Wait while more posts are being loaded