Profile cover photo
Profile photo
Anagha Nigwekar
229 followers
229 followers
About
Anagha's posts

Post has attachment
थोडा है थोडे कि जरुरत है…३
मंडळी, आपण हातात घेतलेलं हे तिसरं काम. पहिलं काम होतं छोट्या मुलामुलींच्या गणवेषांचं. म्हणजे शिक्षण . दुसरं एका पाड्याच्या पाणी साठवणकरिता टाकीचे बांधकाम. म्हणजे पाणीव्यवस्थापन . आणि काल जे एक पाऊल टाकलं ते...मानसिक व शारीरिक अत्याचारातून गेलेल्या व नशीब बल...

Post has attachment
माझी मी...
हल्ली रडूबिडू येत नाही असं एक क्षण वाटतं… आणि स्वत:बद्दल तशी खात्री होताहोता एखादा चित्रपट समोर येतो आणि अख्खं थेटर जिथे खदखदुन हसत असतं तेव्हा हमसाहमशी रडताना माझी मीच मला सापडते… आणि मग काही कळेनासं होतं. दुसऱ्यांना ओळखायचं राहिलं बाजूला, आपण स्वत:ला ओळखत...

Post has attachment
एक दिवस
खरं तर रोजच्यासारखा एक दिवस. म्हणजे अगदी वाऱ्याची एक झुळूक आली. आणि एक पिंपळ पान हललं. मग दुसरी झुळूक आली. आणि दुसरं पान हललं. हा असा एक दिवस. कालचा. शहराच्या टोकावरचा समुद्रासमोर रस्त्याचा, अंधारा कोपरा. एका लांबसडक गाडीच्या पाठीवर पहुडलेला एक कुत्रा. आणि ...

Post has attachment
गुलाबी
चंदेरी गाडी घरून निघाली. रस्त्यातलं ओळखीचं झाड कालपरवापर्यंत रिकामं झालं होतं. पिंपळाचं. आज त्यावर गुलाबी स्वप्न उगवली होती. नाजूक. सूर्य ती स्वप्न जपेल. जोपासेल. कधी ना कधी ती स्वप्न जून होतील. सूर्य कठोर होईल. स्वप्न उखडून टाकेल. पुन्हा नवी स्वप्न उगवायला...

Post has attachment
दोरी...
वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात. त्यावर थोडा विचार केला की त्यातला कुठला विचार आपल्या मनाला पटतो आहे हे कळतं. आणि मग आपण नक्की कुठल्या बोटीत बसलो आहोत ह्याची जाणीव होते. देशभरात बंदी घातलेली डॉक्यूमेंटरी काल बघितली. 'India's daughter' ही डॉक्यूमेंटरी बघितल्यान...

Post has attachment

Post has attachment
रोपटं
माझ्या मनात येणाऱ्या चांगल्या विचारांना मला धरून ठेवावसं वाटतं.  स्वच्छ, निर्मल पाणी वाहून जाऊ नये म्हणून एखादा बांध घालावा तसं. कारण, कारण मी बघितलंय… माझेच कोमल विचार मला उघड्यावर टाकून निघून जाताना मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलंय. आणि मी रिकामी होत रा...

Post has attachment
अम्मा, आन्डू ?
रात्र झाली होती. सूर्याने सगळा फाफटपसारा आवरला होता व चंद्राने रंगमंचावर एन्ट्री घेतली होती. मला चंद्र एकूणच फार आवडतो ह्याचं कारण बहुतेक तो शुभ्र असतो हे असावं. मी आणि माझी लेक, आम्ही दुसऱ्या गावात होतो. हॉटेलच्या सज्ज्यात मी उभी होते. दिवसा उजेडी दूर डाव्...

Post has attachment
अजून एक व्यक्तीचित्र
घरी असलं की काय करू आणि काय नको असं होत असतं ! पुस्तक वाचू, गाणी ऐकू की चित्र काढू ! एक जाडजूड पुस्तक चालू केलंय वाचायला. आणि माझ्या इतर उद्योगांत, हे पुस्तक माझे काही महिने तरी गिळंकृत करेल ! मध्यंतरी दिवसाला एक चित्र असा संकल्प केला होता खरा पण तो संकल्प ...

Post has attachment
न्यूटनची उडी
एकूणच सज्ज्यात उभं राहून बाहेर बघायला मला आवडतंच. वाटतं आपण कोणीही असू शकतो. हे हाडामांसाचं फक्त एक आवरण आहे. ते मी पांघरलेलं आहे. तात्पुरतं. पुढल्या क्षणी जर मला वाटलं तर हे पांघरूण झुगारून देऊन समोरच्या आसमंतात पंख पसरून उडून जावं…तर ते तसं करण्याचा अधिका...
Wait while more posts are being loaded