Profile cover photo
Profile photo
Ramesh Thombre
250 followers -
Uplod Your Videos & MP3 of Marathi Kavita
Uplod Your Videos & MP3 of Marathi Kavita

250 followers
About
Posts

Post has attachment
कवितेचं घर
ते आले, त्यांनी कोपऱ्यात बसवलं कवितेला अन ताबा घेतला मंचाचा कधी गळा काढून तर कधी अश्रू ढाळून कधी तडक भडक ओळी ऐकवून मोहित केलं श्रोत्यांना कधी टाळ्यांसाठी फेकल्या तर चारोळ्या कधी हशासाठी वाचल्या वात्रटिका अन सरतेशेवटी त्यांच्यातलीच एक फर्माईश म्हणून 365 गुणि...

Post has attachment
काय छळतोस तू
...…...... काय छळतोस तू नोकरी सारखा दे उबारा जरा गोधडी सारखा . सूर लागेल रे अंत:करुणेतुनी भेटला जर कुणी बासरी सारखा . सर्व आहे तरी, भोगले ना कधी जन्म गेला तुझा कावडी सारखा . केस हातात घे अन कुरवाळ ना ! काय बघतोस रे लोकरी सारखा . घेतला मी नभी मुक्त झोका तरी ...

Post has attachment
माझा गांधीवाद
खुद्द गांधींनाही पेलवला नसता इतका प्रखर करुन ठेवलाय आज आम्ही गांधीवाद म्हणूनच ... आमच्या रोजच्या व्यवहारातून तो कधीच झालाय बाद ! गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी ... म्हणवून घेण्यात आम्हाला आमचं कौतुक वाटतं अन् गांधीवादाचं हे कर्मट रुप पाहून महात्म्याचंही काळ...

Post has attachment
कीर्तन आणि कीर्तनातील दृष्टांत !
कीर्तन आणि कीर्तनातील दृष्टांत ! वय कुठलंही असो, अगदी शाळकरी किंवा जक्ख म्हातारपण ....आणि शिकवण सुद्धा कुठलीही असो चांगली किंवा वाईट.... ती उदाहरणाशिवाय आपल्या पचनी पडत नाही हे अंतिम सत्य आहे, आपल्याला दृष्टांत लागतो तेंव्हाच समजत .... पण हि सुद्धा एक चांग...

Post has attachment
ऋतू तुझ्या शहराचे
कधीकाळी मोठ्या उत्साहात माझ्या गावची शिव ओलांडताना भरलं माप लाथाडून मी तुझ्या शहरात प्रवेश केला तेंव्हा..... कितीतरी कहाण्या सांगितल्या गेल्या होत्या मला, अभावातून समृद्धीकडे नेण्याच्या. तुझ्या शहरातील गुलाबी हवेत खरच जादू होती दुःख विसरायला लावणारी मीही वि...

Post has attachment
तू पाणी घालतेस तो वृक्ष
तू पाणी घालतेस तो वृक्ष आता चांगलाच फोफावलाय अन कुठल्यातरी ओढीनं पार गॅलरीपर्यंत झेपावलाय तू चिमण्यांना दानापाणी कारायचीस  म्हणून त्या येऊन बसायच्या वृक्षावर आणि शीटत राहायच्या त्याच्या अंगाखांद्यावर दिवसभर तू दिवसभर काळजी घ्यायचीस चिमण्यांची, तुझी चाहूल ला...

Post has attachment
देव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही ?
देव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही ? अश्या कश्या देवापुढं झुलत्यात गायी ।। धृ ।। पावसाचा थेंब न्हाई पोळलेलं जिन्ह घोटभर दुधाविना रडतया तान्हं घासभर खाण्यासाठी चाले वणवण ज्याला त्याला पोटावर बांधण्याची घाई ।। १ ।। आया बाया भेदरल्या साव झाले गुंड डोळे गेले गरदी...

Post has attachment
कवितेविषयी बोलावं असे काय असतो आपण ?
कवितेविषयी बोलावं असे काय असतो आपण ? खरं तर मीच बोलत असतो कवितेसोबत माझ्या विषयी .... आणि तिचा मोठेपणा म्हणून ती ऐकत असते माझा शब्द न शब्द मला बोलायचं असतं, झाडांशी फुलांशी, इथल्या डोंगरदऱ्यांशी मला बोलायचं असतं उन्हाशी, सावलीशी, मावळत चाललेल्या दिवसाशी रुस...

Post has attachment
Photo

Post has attachment
ओढून सावल्या दाट
ओढून सावल्या दाट ही शांत झोपली रात पानांची सळसळ चाले अंधार गर्द घनदाट आवाज येतसे दूर की रातकिड्यांचा सूर मन आशेची हुरहूर मन शंकांचे काहूर घन काळ्या अंधारात चांदणे पहुडले शांत ही चंद्रचोर साक्षीला मन भरल्या अंधारात कल्लोळ मातला आत हा 'हवा घालतो' वात चुकलेला ...
Wait while more posts are being loaded