Profile cover photo
Profile photo
Khandesh Mali Mitra Mandal
6 followers -
जय ज्योती !!!! जय क्रांती !!!!
जय ज्योती !!!! जय क्रांती !!!!

6 followers
About
Khandesh Mali Mitra Mandal's posts

Post has attachment
मित्र हो,
भारतातील समाज क्रांती जनक महात्मा ज्योतिबा फुलेंनी

विद्याविना माती गेली
मतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
एवढे अनर्थ अविद्येने केले.असे समाजाला संबोधून विद्येचे अर्थात शिक्षणाचे महत्व प्रतीपादन केले.शिक्षणाशिवाय परिवर्तन होणार नाही हा विचार सुमारे १५० वर्षापूर्वी मांडून समाज प्रबोधन केले. खानदेश माळी मित्र मंडळाने देखील हा वारसा घेतला असून मंडळाचे कार्य आता समाज बांधवांच्या नजरेत भरू लागले आहे.यंदा आपण अनेक संकल्प सिद्धीस नेत आहोत. यासाठी आपणासर्वांच्या सहकार्याची मंडळास गरज आहे. जुन्या चुका ,जुने गैरसमज यांना कायमची मुठमाती द्या व संघटीत होऊन खानदेश माळी समाज बांधवांच्या उन्नती साठी व उत्कर्षासाठी अविरत राहून समाजास प्रगतीपथावर न्या. परिस्थितीत आमुलाग्र परिवर्तन होत आहे. हे स्पर्धेचे युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने व संगणकीकरणाने इंटरनेट मुळे हे जग अगदी जवळ येऊ पाहत आहे. अशा स्थितीत आपण बुरसटलेले विचार, हेवेदावे बाळगून स्वतःच्या प्रगतीत अडथळा निर्माण करून समाज व्यक्ती विकासात अडथळा निर्माण करू नका अशी मी विनम्र आवाहन करतो.आज समाजातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पैशा अभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात आपल्या मंडळाची एक वसतिगृह बांधण्याचा आपला मनोदय आहे. तसेच मंडळाच्या सभासदाच्या व इतरांच्या मुलामुलींची अल्प खर्चात विवाह संपन्न व्हावेत म्हणून मंगल कार्यालय उभार्णीचाही आपला मनोदय आहे. या सर्व गोष्टींसाठी आपल्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. आतापर्यंत आपण चांगले सहकार्य दिले आहे. या पुढे असेच सहकार्य मिळेल. हि खात्री आहे. संस्थेच्या स्थापनेला सहा वर्ष पूर्ण होत असले तरी संस्थेच्या स्थापनेपासून तन मन धन अर्पण करून मनोभाव सेवा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची मी अंतःकरण पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.स्मरणिका प्रकाशन सोहळ्याची आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे इयत्ता दहावी बारावी व महाविद्यालयीन स्थरात तसेच मेडीकल व इंजिनीरिंग क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या डिप्लोमा , डिग्री उत्तीर्ण झालेल्या व इतर क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्याचे आपापल्या क्षेत्रात ठरवलीले कर्तृत्व आणि मिळवलेले यश या बद्दल त्यांना गौरविण्याचा व उपस्थित राहून आशिर्वाद देण्याचा हा अभूतपूर्व संगम स्मरणिका प्रकाशन व वर्धापन सोहळ्यास जुळून आला आहे. पूर्वजांचे संचित व आपल्या सारख्या मान्यवरांची व कार्यकर्त्यांचे आशिर्वाद या योगे मंडळाचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल आहे. याबद्दल मला शंका नाही.मंडळामार्फत वधुवर सूचक समिती स्थापन करण्यात आली आहे.आतापर्यंत अनेक वधुवर पालक परिचय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.या माध्यमातून आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लग्ने जमली आहेत.आपणास सोयीचे व्हावे म्हणून वेबसाईटवर वधुवर समितीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची नावे ,पत्ते देण्यात आलेले आहेत. वधूवरांचे नाव नोंदणीसाठी कृपया संबंधित कार्यकर्त्याकडे संपर्क साधावा. प्रत्येक सभासदांनी आपल्या मायभूमीत सगळीकडे त्या उपक्रमाची माहिती द्यावी जेणे करून वधुवर मेळावा संबंधित कार्यास चांगले यश प्राप्त होईल.
जय ज्योती जय क्रांती. 
Photo
Wait while more posts are being loaded