Profile cover photo
Profile photo
padmakar kolekar
85 followers
85 followers
About
padmakar's posts

।। वेडात मराठे वीर दौडले सात ।।वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल बोलले जाते ते शूर सेनानी म्हणजे प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउत्राव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हलालव विठोजी होय. प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रमकेला होता. त्यांचे व बलोलखानातिल युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे. या सात वीरांनी सुमारे बारा हजार सैन्यावर चाल करुन मोठापराक्रम केला होता. हि लढाई कोल्हापुरातील नेसरी येथे झाली होती.सभासदाच्या बखरीत प्रतापराव गुजर या महान सेनापातीबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे. पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजीपालकर समयी न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे राजेंनी नेताजी पालकर याला बुलावून आणिला आणि “समयास कसा पावला नाहीस?” म्हणून शब्द लावून, सर्नोबाती दुर करून, राजगडाचा सरनौबत कडतोजी गुजर होता, त्याचे नाव दूर करून प्रतापराव ठेवले, आणि सर्नोबती दिली. प्रतापरावांनी सेनापती करीत असता मराठे चारी पातशाहित जे होते व मुलखांत जे जे होते ते कुल मिळवले. पागेस घोडी खरेदी केली. पागा सजित चालिले व शिलेदार मिळवीत चालिले. असा जमाव पोक्त केला. चाहु पाताशाहित दावा लाविला.विजापूरहून आलेल्या बहलोलखान याने बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता, रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते. महाराजांनी प्रतापरावांस बहलोलखानास धुळीत मिळवा असा हुकुम केला. प्रतापरावांनी गनिमी काव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला. बहलोलखान आपल्या सैन्यासह शरण आला. शरण आलेल्या बहलोलखानास प्रतापरावांनी मोठ्या मनाने सोडून दिले. रयतेचे हाल करणाऱ्या बहलोलखानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रताप्रावांस, “बहलोलखानास मारल्याशिवाय मला तोंड दाखवु नका.” असे पत्र लिहिले. राजीयांचे पत्र मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. आपल्या छावणीच्या जवळच असलेल्यानेसरी यथे बहालोल्खानाचा तळ पडला आहे असे प्रतापरावांस हेरांकडून कळल्यास ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोलखानाच्या छावणीवर चालून निघाले. त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हलाल व विठोजी हे वीर होते. या सात वीरांनी बारा हजार सैन्यामध्ये घुसून शेकडो गनिमांना ठार मारले. पण अखेरीस प्रतापराव व सोबतचे सहा वीर मरण पावले. केवढे हे शौर्य या सातवीरांचे? साक्षात मृत्यू समोर उभा आहे माहित असून, हजारोच्यासैन्यावरती सात वीर चालून गेले. पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोटी या सात वीरांनी स्वतःस मरणाच्या हवाली केले. हि घटना माहित झाल्यावर महाराजांस अतीव दुःख झालेव या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले.सभासदाच्या बखरी मधील बलोलखानच्या बरोबरच्या युद्धाचे वर्णनविजापूरहून बलोल्खन बारा हजार सैन्यानिशी चाल करून आला. तो फौजेनिशी हिकडे चालला हि खबर राजीयांस कळोन कुळ लष्कर प्रतापराव यास हुकुम करून आणविले आणि हुकुम केला कि, “विजापूरच्या बलोलखान एवढा” वळवळ बहुत करत आहे. त्यास मारून फत्ते करणे. म्हणोन आज्ञा करोन लष्कर नावाबाव्री रवाना केले.त्यांनी जाउन उम्बारीस नावाबास सांगितले. चौतर्फा राजियाचा फौजेने कोंडून उभा केला. पाणी नाही असा जेर केला. युद्धही थोर जहाले. इतक्यात अस्तमानही जाला. मग निदान करून नवाब पाणियावर जाऊन पाणी प्याला. त्याजवरी प्रतापराव सरनौबत यास आंतस्त कळविले कि “आम्ही तुम्हावरी येत नाही. पातशाहाच्या हुकुमाने आलो. याउपरी आपण तुमचा आहे. हरएक वक्ती आपण राजियाचा दावा न करी.” असे किती एक ममतेचे उत्तर सांगोन सला केला. मग राजीयांचे लष्कर निघोन गेले.राजीयांनी प्रताप्रावांस पाठविले कि, “तुम्ही लष्कर घेओन जाऊन बलोलखान येतो, यांशी गांठ घालून, बुडवून फत्ते करणे नाहीतर तोंड नं दाखविणे.” ऐसे प्रतापराव यांस निक्षून सांगूनपाठविले. त्यावरी प्रतापराव जाऊन बलोलखानशि गांठले. नेसरीवारी नवाब आला. त्यांने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकालहोऊन प्रतापराव सर्नोबत तलवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पडिले. रक्ताच्या नद्या चालल्या. प्रतापराव पडले, हि खबर राजीयानी ऐकून बहुत कष्टी जाले आणि बोलले कि, “आज एक बाजू पडली!”या सात वीरांच्या बलिदानाने स्वराज्यातील मावला पेटून उठला. या वीरांचा पराक्रम इतिहासात कायमचा अमर झाला

Post has attachment
नमो
Photo

Post has attachment

Post has attachment
संघ के कार्यकाल की तस्वीर
Photo

Post has shared content
This poll is not available.

Post has shared content

Post has shared content

Post has attachment
जय हो
मुस्लिम बन चार युवकों ने किया लव जिहाद

Post has attachment

Post has attachment
Wait while more posts are being loaded