Profile cover photo
Profile photo
Milind Phanse
1,597 followers -
"सापडाया लागलो आता कुठे माझा मला मी | जीवना, तुज शोधण्याला राहिले आयुष्य कोठे... ||"
"सापडाया लागलो आता कुठे माझा मला मी | जीवना, तुज शोधण्याला राहिले आयुष्य कोठे... ||"

1,597 followers
About
Communities and Collections
View all
Posts

Post has attachment
See No Evil?
See No Evil?
city-journal.org
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has shared content
जालियनवाला बाग हुतात्मा दिन !!!!

१३ एप्रिल, भारताच्या स्वात्यंत्रलढ्याच्या इतिहासातले सर्वात काळे पान. शहर अमृतसर साहेब, ठिकाण जालियनवाला बाग.
१३ एप्रिल १९१९, वार रविवार, आजुबाजुच्या अनेक गावातून बैसाखीच्या मेळ्याव्यासाठी आलेले अनेक लोक. जालियानवाला बाग म्हणजे एक सर्वसाधारण मैदान. चारही बाजूंनी इमारतींनी घेरलेले. मैदानात जायला छोटासे रस्ते आणि मैदानात एक विहीर. आपतकालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. अमृतसरला त्या दिवशी कर्फ्यू लावण्यात आल्याची घोषणा. दुपारी दोन वाजता जनरल डायरनी बैसाखी मेळावा संपल्याची घोषणा केली. जनरल डायरच्या खबर्यांनी संध्याकाळी जालियानवाला बागला रोवाल्ट कायद्याच्या विरोधात सभा असल्याची खबर दिली.

या घटनेला थोडासा पूर्व-इतीहास देखील आहे. रोवाल्ट कायदा म्हणजे ना दलील ना सुनावणी, सिधा फैसला आणि तोही सरकारला हवा तसा. या कायद्याला विरोध करणाऱ्या डॉ सत्य पाल आणि डॉ सैफ्फुद्दिन किचलू साहेबांना गोऱ्यांनी अटक केलेली आणि या दोघांना अटक करून कुठे ठेवले आहे हे सांगायला त्या वेळेस सरकार तयार नव्हते. पंजाबच्या मनात बंड धुमसत होते. मोठे बंड होवू शकते हे डायरच्या लक्षात आलेले. १० एप्रिल १९१९ला या दोघांना अटक झाली आणि पंजाबात तुरळक हिंसा झाली जी स्वाभाविक होती. सरकारी इमारतींवर हल्ले झाले. ११ एप्रिल १९१९ ला इंग्लिश मिशनरी शाळेची एक शिक्षिका मार्सेला शेरवूडला आपल्या सगळ्या विध्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे असे लक्षात आले आणि तिनी सगळ्यांना घरी पाठवले, त्यात ५००ते ६०० भारतीय विध्यार्थी पण होते. सायकलनी घरी जात असतांना कच्चा कुर्रीच्हन या छोट्याश्या रस्त्यावर लोकांच्या समूहानी मार्सेलाला घेरले, तिला नंगे करून लाथा बुक्यांनी मारण्यात आले पण काही भारतीय लोकांनीच तिला वाचवले. खर तर हि रोवाल्ट कायद्याविरुध्ध एक पब्लिक प्रतिक्रिया होती पण डायरनी याला किळसवाणे रूप दिले. कच्चा कुर्रीच्हन रस्त्यावर जातांना भारतीय लोकांना रांगत जावे लागेल असा फतवा त्यांनी काढला. आपल्या ह्या हुकुमाचे स्पष्टीकरण देतांना निर्जल्ज डायर म्हणतो " भारतीय लोक देवासमोर रंगत जातात आणि त्यांना हे कळायला हवे कि युरोपियन स्त्री हि हिंदू देवता समान आहे."

पुढील दोन दिवस अमृतसर शांत होते पण पंजाब मात्र धुमसत होता. सरकारी इमारती आणि रेल्वे स्थानक टार्गेट करण्यात आली आणि यात तीन युरोपियन लोकांचा जीव गेला. १३ एप्रिल १९१९ ला ब्रिटिशांनी पंजाबवर मिलिटरी कायदा बसवला. चार पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे या सगळ्यावर बंदी आली.

पण त्या आधीच म्हणजे १२ एप्रिल १९१९ ला हिंदू कॉलेज मध्ये मीटिंग झाली आणि रोवाल्ट कायद्याविरुध्ध जाहीर सभा जालियनवाला बागला १३ एप्रिल १९१९ ला घेण्याचे निश्चित झाले. १३ एप्रिलला सकाळी चार पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे ह्यावर कायद्यांनी बंदी आहे हे जाहीर करण्यात आले पण बैसाखीच्या आनंदात रमलेल्या लोकांचे या घोषणेकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले.

अमृतसरला त्या दिवशी कर्फ्यू लावण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दुपारी दोन वाजता जनरल डायरनी बैसाखी मेळावा संपल्याचा हुकुम दिला. जनरल डायरच्या खबर्यांनी संध्याकाळी जालियानवाला बागला रोवाल्ट कायद्याच्या विरोधात सभा असल्याची खबर डायरला दिली. मेळावा बंद केल्यामुळे हजारो लोक त्या जेमेतेम सहा का सात एकर जागेत जमा झाले होते. दुपारी डायरनी सभेची हवाई पाहणी केली. बंड आता नक्की होणार हे त्याने गृहीत धरले आणि संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान हत्यारबंद लष्कराची तुकडी घेवून डायर जालियानवाला बागवर चाल करून गेला.

तंग एन्ट्रीच्या रस्त्यावर डायरनी आपले सैन्य उभे केले आणि समोर जमलेल्या हजारो निशस्त्र लोकांवर आपल्या सैनिकांना गोळीबाराचे आदेश दिले. जवळपास पॉइन्ट ब्लांक अंतरावरून रायफलनी गोळीबार करण्यात आला. अवघ्या दहा मिनिटात हजारो राउंड्स फायर करण्यात आले. बच्चे, स्त्रिया, पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता हे हत्याकांड घडवून आणले डायरनी. लोकांनी जिथे जागा मिळेल तिथे धावायला सुरवात केली. चेंगराचेंगरीत अनेकांचे जीव गेले. जीव वाचवण्यासाठी लोकांनी अवधा वीस फूट घेर असलेल्या विहिरीत उड्या मारायला सुरवात केली. १२० मृतदेह त्या विहिरीतून काढण्यात आले. १६५० राउंड्स आणि ३७९ मृत्यू हा ब्रिटीशांचा आकडा. पण खर तर जवळपास हजार लोक मारले गेले.

डायरची मग्रुरी मात्र कधीच संपली नाही, " मी सभा उधळायला नाही तर लोकांना धडा शिकवायला गेलो होतो" असे स्टेटमेंट डायरनी ब्रिटीश सरकारला दिले. हाउस ऑफ कॉमन्सनी डायरचा निषेध केला पण हाउस ऑफ लॉर्डसनी मात्र डायरची बाजू घेतली. ब्रिटनला परत गेल्यावर डायरला त्याकाळी २६००० पौंडांची थैली रेसिस्ट आणि उच्चभ्रू ब्रिटीश लोकांनी दिली. सार जग या उच्चभ्रु ब्रिटीशावर थुंकल. जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटीश साम्राज्याच्या भारतातील अस्ताची सुरवात ठरले. ह्याच हत्याकांडानंतर भगत सिंग, उधम सिंघ सारखे अनेक क्रांतिकारी पंजाबात आणि अखंड भारतात तयार झाले. आज जालियानवाला बाग हे अमृतसरच आकर्षण केंद्र आहे. इथे आता एक बाग आहे आणि ४५ फूट उंचीच लाल दगडात तयार केलेल स्मारक आणि अखंड ज्योत. आजही भिंतींवर गोळ्यांची चिन्हे आहेत जी राष्ट्रभक्तीची मेडल्स ठरली आहेत. काही वर्षांपूर्वी ब्रिटीश पंतप्रधानांनी जालियानवाला बागला भेट दिली आणि लिहून ठेवले " ब्रिटीश इतिहासातील अत्यंत शरमेची घटना "

आज जालियानवाला बाग हुतात्म्यांचा शहीद दिन. माझा सर्व हुतात्म्यांचा कोटी कोटी प्रणाम !!!

फोटो आंतरजालावरून साभार

#हर्षदशामकांतबर्वे
© हर्षद शामकांत बर्वे, औरंगाबाद
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
Wait while more posts are being loaded