Profile cover photo
Profile photo
पु.ल. प्रेम
103 followers -
http://cooldeepak.blogspot.com
http://cooldeepak.blogspot.com

103 followers
About
Posts

पु.लं.तुम्ही तुमच्या साहित्यात देवांपासुन संतांपर्यंत..नेत्यांपासुन शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांवर #कोपरखळ्या,निखळ विनोद केलेत.
पण तुम्ही आज असे काही विनोद केले असते तर आम्ही ते सहन केले नसते!कारण आता आमच्या चित्तवृत्ती इतक्या अस्थिर,उतावीळ झाल्या आहेत..आम्ही आमच्या आर्दशांबद्दल,जातींबद्दल इतके पजेसिव्ह झालो आहोत की आम्ही तुमच्या नर्म विनोदाला न समजता आमच्या धार्मीक.. जातीय भावना दुखावल्यामुळे आम्ही तुमचे पुतळे जाळले असते.

https://cooldeepak.blogspot.in/2017/11/blog-post.html
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

आठ नोव्हेंबर, पुलंचा जन्मदिवस. पु. ल. गेले तेव्हा मी नुकतंच लग्न होऊन मी दिल्लीला राहायला गेले होते. घरी टीव्ही तेव्हाही नव्हता आणि इंटरनेटचा वापरही तेव्हा कमी होता. मराठी पेपर मी घ्यायची पण ते तीन दिवसानंतर यायचे. त्यामुळे पु. ल. इस्पितळात आहेत, अत्यवस्थ आहेत हे माहिती होतं. हे कधी तरी घडणार आहे हेही माहिती होतं. पण तरीही मन ही वस्तुस्थिती स्विकारायला तयार नव्हतंच. पु.ल. गेले ही बातमी माझ्या वडिलांनी मला फोन करून कळवली तीही नवरा घरी असल्याची खात्री करून घेऊन. माझं पु.ल. प्रेम त्यांना चांगलंच ठाऊक होतं. बातमी ऐकली आणि मुसमुसून रडायलाच लागले. घरातलंच कुणीतरी अत्यंत जवळचं माणूस गेल्यासारखं निराधार वाटत होतं मला. माझ्या नवऱ्याला कळेना की मी एव्हढी का रडतेय. तो अमराठी असल्यामुळे त्याने पुलंविषयी फक्त ऐकलं होतं. त्या दिवशी मी केलेला सगळा स्वयंपाक तसाच्या तसा बाजूला ठेवून दिला. घश्याखाली घासच उतरेना. त्या दिवशी मी दोन तास खपून मी पापलेटचं कालवण बनवलं होतं. त्या दिवसानंतर जवळ जवळ दोन वर्षे मी पापलेटला हातही लावला नाही. मासळी बाजारात पापलेट दिसलं तरी मला पु. ल. आठवायचे.........
पुढे वाचा -->https://cooldeepak.blogspot.in/2017/02/blog-post.html
Add a comment...

पुलंनी लिहिलेली अनेक वाक्य आपल्याला तोंडपाठ आहेत. पण तीच वाक्य मूळ स्वरूपात - पुलं च्याच हस्ताक्षरात लिहिलेली मी जेव्हा पाहिली तेव्हाची ही गोष्ट.

२००७
प्रोजेक्ट मॅनेजर ला "मी घरी चाललोय" असं डायरेक्ट तोंडावर सांगून असुरी आनंदानं ऑफिस मधून बाहेर पडलो आणि फोर्ट च्या दिशेने निघालो. 'एशियाटिक सोसायटी' आत्तापर्यंत सिनेमात पहिली होती आणि एक दोनदा बाहेरून. अर्थात मी उड्या मारत पोहोचलो तरी 'तिथे आपल्याला आत सोडतील का?' हा एक प्रश्न डोक्यात होताच. तिथे कोणी आपल्याला उगाच ओरडेल अशी भीती वाटत होती. पण तसं कोणी ओरडलं नाही. एका छोट्याश्या हॉलकडे जाणाऱ्या बाजूला बोर्डवर माहिती लिहिली होती. मी आत गेलो कोणी अडवल नाही.....
पुढे वाचा ->https://cooldeepak.blogspot.in/2016/11/blog-post.html
Add a comment...

Post has attachment
पु. ल. देशपांडे यांच्या नस्ती उठाठेव पुस्तकातून -

वन डॉटर शो - अर्थात एकपुत्री नाटक.
(संपूर्ण पुरुष पात्र विलागीत आवाज नाट्य )
निवेदक:
प्रस्तुत नाट्यातील प्रमुख पात्र बेबी हे आहे. हे पात्र हळूहळू एखाद्या नदीच्या पात्रासारखे वाढत जाते, हे कळेलच. दुसरे पात्र म्हणजे बेबी ची आई - तथा 'ममी'. ह्या 'आवाज नाट्यात' हे सर्वात जास्त आवाज करणारे पात्र आहे. ह्या नाटकातील अत्यंत गौण पात्र म्हणजे बेबीचा बाप उर्फ ड्याडी. हे पात्र सदैव आतल्या आवाजात बोलते.
ह्याखेरीज नाटकात अनेक पात्रे येतात व बहुदा हाय खाऊनच जातात.

खोताच्या वाडीत जर न चुकता हिंडू शकलात, डॉक्टर फान्सेस्का यांच्या म्याटरनिटी होम मधल्या एका स्पेशल रूममध्ये ममी मच्छरदाणीच्या पडद्या आड झोपल्या आहेत. - गाढ झोपल्या आहेत.
पुढे वाचा -> https://cooldeepak.blogspot.in/2016/10/blog-post.html
Add a comment...

चिवड्यात अठरापगड गोष्टी असून त्याच्या भोवती मित्रमंडळीच्या अड्ड्याचे कुंपण आहे. मात्र चिवडा हा एकट्याने खाण्याचा पदार्थ नव्हे.
.
चिवड्याची चव खाणाऱ्यांच्या संख्येने गुणले असता वाढते! पण चिवड्यातला अत्यंत चविष्ट भाग तळाशी उरलेले तिखट-मीठ इतरांची नजर चुकवून तर्जनीने चेपून ती जीभेवर दाबल्यावर कळतो. ह्याला धैर्य लागते! .
चिवड्याचे मूळ स्वरूप म्हणजे भत्ता. ह्याला मजूर-चळवळीच्या प्रथम चरणात 'लेनिन मिक्श्चर' म्हणत असत. म्हणजे भोवती मार्क्सवादी गप्पा सुरू झाल्या की भत्त्याचे लेनिन मिक्श्चर होत असे! कुरमुरे, डाळ, दाणे, कांदा, बारीक शेव, कोथिंबीर, मिरच्या आणि उघड्यावर गप्पा! चारचौघांत जो ओतला की "अरे बाप रे! एवढं हे कोण संपवणार?" असा सार्वजनिक उद्गार निघून ज्याचा शेवट रिकाम्या कागदाखाली पडलेला शेंगदाणा हळूच उचलून तोंडात टाकण्यावर होतो, तो खरा भत्ता!
- माझे खाद्यजीवन (पु.ल.)
Add a comment...

Post has attachment
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पुल देशपांडे हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र सारस्वताला परमेश्‍वराने दिलेले वरदान आहे. पुल देशपांडे हे साहित्याच्या सर्वच क्षेत्रांत वावरलेत. विपुल लेखन केले. नाटके लिहिलीत. एकपात्री प्रयोग केलेत. चित्रपटांची निर्मिती केली. भावगीतांना व गाण्यांना सुंदर चाली लावल्यात. पुल सुंदर अभिनय करीत, सुरेल पेटी वाजवीत. या सार्‍या गुणांवरही ताण म्हणजे पुल एक उत्तम रसिक होते. चांगल्या गाण्याला, चांगल्या संगीताला, चांगल्या लिहिण्याला आणि चांगल्या बोलण्याला पुल मनमोकळी दाद देत. असल्या बहुशृत कलाकारास महाराष्ट्र कधी.....
पुढे वाचा --> https://cooldeepak.blogspot.in/2016/09/blog-post_19.html
Add a comment...

परवाचीच गोष्ट. किराणाभुसार दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.
दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.
ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."
"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली.
पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली,
"दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."
"ह्मा पणतीत?" दुकानदार म्हणाला.मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले."यवड्या पैशात किती बसतं ते द्या"
"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"
"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत."पोरीने स्वत:चा 'आमच्याकडे' असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितितही मला मजा वाटली.
"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही?"
"अॅंटलीस्ट फिफ्टीन!" दुकानदार.
त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो. त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टींची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो.
-- एक शून्य मी
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
"पंधरा पैशांचे ष्टांप द्या..."
"पलीकडच्या खिडकीत जा."
"अहो, पण..."
"पाटी वाचता येते ना?" माझ्या मुखमंडलात असा काय गुण आहे मला कळत नाही, पण बसकंडक्टर (सौजन्यसप्ताहातसुद्धा), पोष्ट-अगर-तारमास्तर, तिकीट-कलेक्टर, हॉटेलातले वेटर, कापड-दुकानातले पंचा-विभागातले लोक गुरकल्याशिवाय माझ्याशी बोलतच नाहीत. साऱ्या दिवसाचा उद्धटपणा माझ्यावर काढतात. अशावेळी आपण गेल्या जन्मी कोण होतो, म्हणून ह्या जन्मी हा भोग माझ्या नशीबी यावा, ह्या विचाराने मी हैराण होतो. आता हा पोष्टातला धाकटा मास्तर; त्याला "पाटी-वाचता-येते-ना?" असे कुत्सित बोलायचे कारण काय?
--> http://cooldeepak.blogspot.com/2016/07/blog-post_11.html
Add a comment...
Wait while more posts are being loaded