Profile cover photo
Profile photo
Atharva Publications
About
Posts

Post has attachment
Add a comment...

Post has attachment

आदिवासी विभागातील स्पर्धा परीक्षा साठी शिफारस केलेले एकमेव पुस्तक
***************
आदिवासी संस्कृती : भाषा आणि साहित्य
लेखक
प्रा. डॉ. पुष्पा यशवंत गावीत
***************
किमंत २५०/- सवलतीत २००/-
पोस्ट खर्च फ्री
***************
पुस्तक मिळण्यासाठी संपर्क
अथर्व पब्लिकेशन्स जळगाव
मो ९७६४६९४७९७,९९२३३७४८२२
फोन ०२५७- २२३९६६६
http://www.atharvapublications.com/book-detail.php?id=80

किंवा
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5129942875610532065?BookName=Aadivasi%20Sanskruti
--
Add a comment...

Post has attachment

लेखक-प्रकाशक कार्यशाळा
जळगाव (प्रतिनिधी) : खानदेश हा प्रांत जसा सुपीक काळ्या मातीसाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो साहित्याचा कसदार वारसा जोपासणारा आहे. जनजीवनावादी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव आपल्या विद्यापीठाला दिल्याने खानदेशाच्या साहित्यिकांसाठी ही गौरवाची, अभिमानाची घटना आहे. त्या घटनेचे औचित्य साधत लेखक आणि प्रकाशक कार्यशाळा आयोजित करून खानदेशातील लिहित्या हातांना बळ देऊन ‘छापीसनी होतो कागद शहाणा’ त्या छपाई करणार्‍या माणसांनाही या निमित्ताने ऊर्जा मिळावी, खानदेशातील लेखक-प्रकाशक यांच्यातील नाते दृढ व्हावे, त्यांच्यातील अनुबंध घट्ट व्हावा आणि प्रकाशनासंबंधीची जाणीव, जागृती व्हावी तसेच खानदेशातील लेखकांना नवनवीन संधी मिळाव्यात, प्रकाशकांना प्रकाशन व्यवसायासंबंधी सखोल तांत्रिक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी खानदेशमध्ये प्रथमच अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, डॉ.ए.जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अथर्व पब्लिकेशन्स जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७-८ सप्टेंबर २०१८ रोजी दोनदिवसीय ‘लेखक-प्रकाशक कार्यशाळा’ डॉ. आण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात येत आहे.
सदरील कार्यशाळेमध्ये लेखन आणि प्रकाशन, पुस्तकांचे प्रकार, भाग, संपादन प्रक्रिया, स्वयंसंपादन किंवा पुनर्लेखनाचे महत्त्व, मुद्रितशोधन, ग्रंथनिर्मिती प्रक्रिया, प्रकाशनासाठी कॉपी तयार करणे, जीएसटी आणि कॉपीराइट कायदा, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आव्हान, ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पुस्तक व्यवसायाचे अर्थकारण-विक्री आणि विपणन व्यवस्था तसेच लेखक-प्रकाशक अनौपचारिक गप्पा, पुस्तक देवाणघेवाण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी पुणे-नागपूर-मुंबईची अनुभवी, तज्ज्ञ मंडळी जळगाव येथे येत आहेत. या मंडळींशी संवाद साधण्याची संधी प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे. सदरील कार्यशाळेत २०० च्या वर संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत लेखक-प्रकाशकांचा समावेश होणार आहे.
या कार्यशाळेत लेखक, नवलेखक, पुस्तकविक्रेता, प्रकाशक, नवप्रकाशक, मुद्रक यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यशाळेसाठी नाममात्र नोंदणी शुल्क १०० रुपये असून नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी ९६७३२३९६६६ या नंबरवर संपर्क साधावा.
Add a comment...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
Wait while more posts are being loaded