Profile cover photo
Profile photo
Mahaveer Sanglikar
440 followers -
I am a Numerologist, Face Reader, Spiritual Healer and Author. I help people by solving their problems. I write short stories in Marathi language.
I am a Numerologist, Face Reader, Spiritual Healer and Author. I help people by solving their problems. I write short stories in Marathi language.

440 followers
About
Mahaveer's posts

Post has attachment
माझे रहस्यमय प्रयोग: बाळाचा जन्म आणि अंकशास्त्र
-महावीर सांगलीकर  8149703595 वयाची तिशी ओलांडून गेलेल्या नीताचं अजून लग्न झालं नव्हतं. ती कुणाला पसंत पडेल एवढी सुंदर नव्हती. शिकलेली होती, पण जॉब नव्हता. मी तिला कांही सल्ले दिले. कांही पुस्तकं वाचायला सांगितली, कांही व्हिडीओज बघायला सांगितले. ही पुस्तकं आ...

Post has attachment

Post has attachment
माझे रहस्यमय प्रयोग (2) : जन्मांक 8 शी मैत्रीचा प्रयोग
-महावीर सांगलीकर  Numerologist & Motivator 8149703595  अंकशास्त्रात 8 हा अंक धन, संपत्ती आणि सत्ता यांच्याशी संबधित आहे. ज्यांच्या चार्टमध्ये हा अंक जन्मांक, भाग्यांक किंवा नामांक म्हणून आलेला असतो, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर धन आणि संपत्ती येण्याची शक्य...

Post has attachment
एक घटना... विचार करण्यासारखी
-महावीर सांगलीकर  एक वर्षापूर्वी मला औरंगाबादवरून एक विद्यार्थ्याचा फोन आला होता. त्याला म्हणे डॉक्टरनं सांगितलं होतं, की त्याला एक गंभीर आजार आहे आणि तो फारतर सहा महिने जगेल. त्यानं मला असं सांगताच मी म्हणालो, हे बघ, कोणताही शहाणा डॉक्टर तुला असं सांगणार न...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

विज्ञान म्हणजे काय? गूढ विद्या आणि विज्ञान
-महावीर सांगलीकर
Mobile Phone 8149703595

अमुक गोष्ट सायन्स आहे का किंवा सायंटीफिक आहे का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. गूढ गोष्टींचे अनेक अभ्यासक या प्रश्नाला उत्तर म्हणून आपला विषय सायन्स कसा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात.

पण खरं म्हणजे सायन्स किंवा विज्ञान म्हणजे काय हेच अनेकांना माहीत नसते. ‘सायन्स’ या शब्दाची ऑक्सफोर्ड डिक्शनरीतली व्याख्या अशी आहे:

The intellectual and practical activity encompassing the systematic study of the structure and behavior of the physical and natural world through observation and experiment.

वरील व्याख्येवरून कोणत्याही विषयाचा पद्धतशीर अभ्यास केला तर ते सायन्स ठरते. विज्ञान या शब्दाचा भारतीय परंपरेतील अर्थही साधारण तसाच आहे. तिथं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असा अर्थ दिला गेला आहे.

अनेकांना असं वाटतं की विज्ञान म्हणजे केवळ फिजिक्स. ते फिजिक्सचे नियम गूढ विद्यांना लावायला जातात. प्रत्यक्षात फिजिक्सचे नियम अगदी सायकॉलॉजी, बायॉलॉजी अशा विषयांना देखील लागू होत नाहीत. सोशल सायन्सेस फिजिक्सच्या नियमात कशी बसतील? तेंव्हा फिजिक्सच्या नियमात बसणारं तेच विज्ञान असं मानणं म्हणजे एक अंधश्रद्धा आहे.

माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही. पण या शास्त्राचे विरोधक ज्योतिषांकडून ज्या अपेक्षा करतात, त्यांना चॅलेंज देतात तेंव्हा मला गम्मत वाटते. जसे, की आम्ही दहा कुंडल्या देऊ, ज्योतिषांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे 50 टक्के जरी बरोबर दिली, अगदी त्यातील पाच कुंडल्यांच्या बाबतीत तरी, तर आम्ही एवढे बक्षीस ठेवता येईल. मग असेच चॅलेंज हवामान शास्त्राला देखील देता येईल. म्हणजे आम्ही दहा ठिकाणे सांगू, पावसाळ्यातील एखादी तारीख देऊ, तुम्ही आम्हाला त्या त्या गावी त्या तारखेला उन पडेल की पाऊस, वीजा कडकडतील की नाही, वातावरण थंड राहील का गरम, अशा पाच प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यातील 50 टक्के उत्तरे बरोबर आली तर हवामान शास्त्र हे विज्ञान आहे ही गोष्ट आम्ही मानू. असो. या संदर्भातला माझा ‘अनिसचे विद्वान(?) लेखक आणि अंकशास्त्र’ हा लेख अवश्य वाचावा. ( http://numerology-marathi.blogspot.in/2015/10/blog-post_19.html )

एखादी गूढ विद्या विज्ञान आहे की नाही ही गौण गोष्ट आहे. त्या विद्येचा जर मानवी कल्याणासाठी, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी उपयोग होत असेल, तर ती विद्या विज्ञान आहे का नाही यावर चर्चा, वाद करणे हा वेडगळपणा आहे. गूढ विद्यांचा जर कोणी दुरुपयोग करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे, पण त्यावरून ती विद्या म्हणजे अंधश्रद्धा आहे असे कसे काय म्हणता येईल? मग तोच नियम अॅलोपथीला लावता येईल. म्हणजे, अनेक अॅलोपथीक डॉक्टर्स रोग्यांना लुटत आहेस, अनेक हॉस्पिटल्स म्हणजे लुटण्याचे अड्डे झाले आहेत, म्हणजे मग अॅलोपथी ही अंधश्रद्धा ठरवायची काय?

विज्ञान असण्याचा सर्वाधिक मान ज्या फिजिक्सला मिळतो, तिथंही अनेक गोष्टी या गृहीत धरलेल्या आहेत, अजून सिद्ध झालेल्या नाहीत. अनेक गोष्टींच्या बाबत परस्परविरोधी वेगवेगळ्या थेअऱ्या मांडल्या जातात, आणि खुद्द संशोधकांमध्ये थेअरी प्रमाणे गट आहेत. (जसे, विश्वाच्या उत्पत्तीची बिग बॅन्ग थेअरी आणि स्टेडी स्टेट थेअरी).

गूढ विद्यांच्या अभ्यासकांनी आपली विद्या सायन्स आहे हे सिद्ध करण्याच्या भानगडीत पडू नये. त्याची गरज नाही. आपला अभ्यास आणि संशोधन करत राहावे, त्यांचा लोकांना फायदा करून द्यावा. रिझल्ट्सना महत्व द्यावे. विरोधकांकडे दुर्लक्ष करावे.

Wait while more posts are being loaded