Profile cover photo
Profile photo
Praveen Bardapurkar
298 followers -
A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor.
A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor.

298 followers
About
Posts

ब्लॉग नाही , कारण ...
या आठवड्यात ब्लॉग नाही लिहिला .
कारण , एक तर बऱ्यापैकी कंटाळा आलेला होता .
दुसरं म्हणजे , 'अस्वस्थ महाराष्ट्र' हा विषय डोक्यात होता आणि लिहायला सुरुवातही केलेली होती पण मित्रवर्य अविनाश धर्माधिकारी याचा याच विषयावरचा मजकूर वाचनात आला .
प्रतिपादन जरी स्वाभाविकपणे वेगळं असलं तरी 'बेस लाईन' एकच होती आमची दोघांची .
...मग , कुठल्या तरी वळणावर येऊन जगणं थांबल्यासारखा कंटाळा आणखी विस्तीर्ण आणि अस्ताव्यस्त पसरला .
असो .
भेटू यात , पुढच्या आठवड्यात .
( अनेकांनी विचारणा केली म्हणून ब्लॉग अपडेट न होण्याचं कारण लिहिलं , बस्स इतकंच ! )
-प्रब
१२ ऑगस्ट २०१८
Add a comment...

BLOG ALERT -
अपयश नोकरशाहीचं , जबाबदारी सरकारची आणि होरपळ रयतेची !
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून समाजात कधी नव्हे अशी
अस्वस्थता व काहींसं भय आणि या सरकारवर अनिश्चिततेचं मळभ दाटून आलेलं आहे .
हे घडलं त्याचं कारण , नेमकं भान राखून योग्य वेळी फिरवली नाही तर
तव्यावरची भाकरी जळून जाते याचा मंत्री आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांना विसर पडला हेच आहे .
वाचा- https://goo.gl/H2Yaau
किंवा - blog.praveenbardapurkar.com
Add a comment...

BLOG ALERT -
कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती ,
सातारचे खासदार उदयसिंहराजे भोसले हे दोन राजे आणि
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे मराठा समाजाच्या हिताची सूत्रे आता जाऊ पाहत आहेत . त्यामुळे अस्वस्थ होऊन होऊन जर
शरद पवार जर अ-जाणती भाषा करत असतील तर ती मुळीच समर्थनीय नाही ;
ती पवार यांच्या प्रतिमेलाही शोभेशीही नाही .
वाचा- https://goo.gl/H2Yaau
किंवा - blog.praveenbardapurkar.com
Add a comment...

Post has attachment
BLOG ALERT -
अपयश नोकरशाहीचं , जबाबदारी सरकारची आणि होरपळ रयतेची !
राज्यात पेटलेल्या वणव्यात रयत होरपळत आहे आणि इकडे
नोकरशाही मात्र सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार मिळणाऱ्या गलेलठ्ठ आर्थिक लाभाचे हिशेब करण्यात मश्गुल आहे .
त्यातच आता राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संपाची हांक दिलेली आहे .
हे म्हणजे रोम जळत असतांना नीरोनं फिडेल वाजवण्यासारखं झालं .
वाचा- https://goo.gl/H2Yaau
किंवा - blog.praveenbardapurkar.com
Praveen Bardapurkar's Blog »
Praveen Bardapurkar's Blog »
blog.praveenbardapurkar.com
Add a comment...

Post has attachment
BLOG ALERT -
अपयश नोकरशाहीचं ,
जबाबदारी सरकारची
आणि
होरपळ रयतेची !
वाचा- https://goo.gl/H2Yaau
किंवा - blog.praveenbardapurkar.com
Photo
Add a comment...

Post has attachment
डॉ. निकिता आणि डॉ. अनिरुद्ध यांना शुभेच्छा !
आमची लाडकी लेकरं निकिता आणि अनिरुद्ध देशपांडे या डेंटिस्ट दांपत्याच्या ओमेगा या मल्टीस्पेशियालीटी क्लिनिक्सचा शुभारंभ आज एका कौटुंबिक आणि अनौपचारिक कार्यक्रमात झाला . औरंगाबाद शहरातलं इतकं सुसज्ज , आखीव-रेखीव आणि प्रशस्त डेंटल क्लिनिक्स हे बहुदा एकमेव असावं . तिथलं सुंदर वातावरण आवडल्यानं मी तर रिसेप्शन म्हणजे गल्ल्यावरच ठिय्या मारला आज कारण लगेच पहिला पेशंटही आला !
आमचे दोस्तयार डॉ. अंजली आणि डॉ. मिलींद देशपांडे यांचा डॉ. अनिरुद्ध हा मुलगा आणि डॉ. निकिता ही सून . त्यांच्या सुमनांजली हॉस्पिटलचा औरंगाबाद शहरात मोठा नावलौकिक आहे . सिडकोतील सुमनांजली हॉस्पिटलच्याच इमारतीत , समोरच्या भागातच हे ओमेगा मल्टीस्पेशियालीटी क्लिनिक्स आहे .
डॉ. निकिता आणि डॉ. अनिरुद्ध यांचं अभिनंदन तसंच त्यांच्या या इनिंग्जला खूप खूप शुभेच्छा आणि ​आशीर्वादही !​
-पहिल्या छायाचित्रात डॉ. अनिरुद्धसह अस्मादिकांची बेगम मंगला .
-दुसऱ्या छायाचित्रात क्लिनिक्समधे डॉ. निकितासह आस्मादिक .
-तिसऱ्या छायाचित्रात 'गल्ल्यावर' आस्मादिकांनी असा ठिय्या मारला !
PhotoPhotoPhoto
30/07/2018
3 Photos - View album
Add a comment...

Post has attachment
BLOG ALERT -
सुसंस्कृतपणा : ‘त्यांचा’ आणि आपला...
प्रत्येक बाबीकडे राजकीय हेतू ठेऊन ,
जात-धर्माचा विचार करुन निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण आलेलो असतांना ,
‘फेकू’ आणि ‘पप्पू’ ही आपली ओळख सुसंस्कृतपणाचा सर्वोच्च निकष ठरलेली असतांना ;
ही काय समंजसपणा , संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणाची लक्षणं आहेत काय , असा प्रश्न उभा ठाकणं स्वभाविकच नाही का ?
अशा वातावरणात आपल्याला कोलिंदा ग्राबार कितारोविच यांच्यासारखे लोकप्रतिनिधी मिळावेत अशी अपेक्षा बाळगता येईल का ?
वाचा- https://goo.gl/osav45

किंवा - blog.praveenbardapurkar.com
Photo
Add a comment...

Post has attachment
BLOG ALERT -
सुसंस्कृतपणा : ‘त्यांचा’ आणि आपला...
एक समाज म्हणून आधी आपल्याला जात-पात-धर्म-राजकीय विचार
आड न आणता आपण बहुसंख्यांत
‘त्यांच्या’सारखा सुसंस्कृतपणा आणि समंजसपणा वैपुल्यानं निर्माण करावा लागेल मग
त्यापाठोपाठ संवेदनशीलता चालत येईल ; तरच
आपल्यातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी सर्वार्थानं
सुसंस्कृत , समंजस आणि संवेदनशील असतील...
म्हणूनच ते तसे वागतीलही .
तुम्हाला काय वाटतं ?
वाचा- https://goo.gl/osav45
किंवा - blog.praveenbardapurkar.com
Praveen Bardapurkar's Blog »
Praveen Bardapurkar's Blog »
blog.praveenbardapurkar.com
Add a comment...

Post has attachment
BLOG ALERT -
​एकिकडे नरेंद्र मोदीं यांच्यावर राहुल गांधी न घाबरता हल्ला करतात आणि लगेच जाऊन त्यांची गळाभेट घेतात ; असं असेल तर नरेंद्र मोदींविरुद्ध राहुल गांधी लढणार कसे , असा अत्यंत विपरीत संदेश या कृतीतून गेला .
वाचा- https://goo.gl/if63tZ
किंवा - blog.praveenbardapurkar.com
Praveen Bardapurkar's Blog »
Praveen Bardapurkar's Blog »
blog.praveenbardapurkar.com
Add a comment...

Post has attachment
// १४ // माझी माय मराठी, अचूक मराठी //

न्यायालयीन कामकाजाच्या वृत्तसंकलनाची भाषा ...
न्याय यंत्रणेची एक खास आदब असते , शिष्टाचार असतो आणि महत्वाचं म्हणजे न्यायालयाशी निगडीत भाषेला संवैधानिक अधिष्ठान आहे . त्यामुळे त्या संदर्भात अत्यंत कांटेकोरपणा बाळगायला हवा असतो . ती आदब , ते संवैधानिक अधिष्ठान , ती आदब आणि तो शिष्टाचार लिहिता/बोलतांना अनेकदा पाळला जात नाही पण , न्याय यंत्रणेच्या क्षमाशील वृत्तीमुळे सारं बिनबोभाट सुरु आहे !
= औरंगाबाद , नागपूर आणि मुंबई अशा तीनही ठिकाणी उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं वृत्तसंकलन करण्याची संधी मला मिळालेली आहे . आधी नागपूर आणि नंतर औरंगाबाद या दोन्ही खंडपीठांच्या वृत्तसंकलनासाठी माध्यमात स्वतंत्र बीट निर्माण करण्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे . माझ्यासोबत या कामात तयार झालेल्या तेव्हाच्या सहकाऱ्यात प्रमोद माने , मनोज जोशी अशा काही न्यायालयीन कामकाजाचं बिनचूक वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांची नावं आहेत . नागपूरच्या न्यायालयाशी संबंधित वृत्तसंकलनाच्या बहुपेडी अनुभवांवर आधारीत “ ‘बार’मधले दिवस ” हा तेव्हा लिहिलेला लेख माझ्या ‘दिवस असे की...’ या पुस्तकात ( प्रकाशक- ग्रंथाली ) पृष्ठ क्रमांक ३२वर समाविष्ट आहे ; न्यायालयीन कामकाजाचं वृत्तसंकलन करणारांनी तो नक्की वाचावा .
= न्याय यंत्रणेचं वृत्तसंकलन जबाबदारी अवघड असते . क्षुल्लक चूक झाली तरी फटकन अवमानाची कारवाई होऊ शकते . मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे तत्कालिन न्यायमूर्ती अशोक देसाई यांच्या ‘कृपे’ने माझ्यावर ‘सू मोटो क्रिमिनल कंन्टेम्प्ट’ दाखल होण्याची वेळ आलेली आहे ; माझ्यासोबत आरोपी होते चक्क , मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालिन प्रभारी मुख्य न्यायमूर्ती पेंडसे आणि लोकसत्ताचे तत्कालिन संपादक अरुण टिकेकर ! ती उत्कंठावर्धक हकिकतही वर उल्लेख केलेल्या मजकुरात आहे .
= उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायनिवाडा करणाऱ्या अधिकाऱ्याला ‘न्यायमूर्ती’ संबोधण्याचा आणि उच्च न्यायालयापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या न्यायालयाच्या न्यायनिवाडा करणाऱ्या अधिकाऱ्याचला ‘न्यायाधीश’ म्हणण्याचा शिष्टाचार आहे . हे काही कुठे लिखित स्वरुपात नाही तर इंग्रजांच्या काळापासून सुरु झालेली ती परंपरा/शिष्टाचार आहे आणि घटनेच्या पवित्र्यासारखी तो पाळला जातो . एका न्यायाधीशाने स्वत:चा उल्लेख ‘न्यायमूर्ती’ असा सातत्याने केल्यावर त्याच्याविरोधात अवमानाची याचिका दाखल झाल्याची आठवण सेवानिवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश , आता उच्च न्यायालयात वकिली करणारे सन्मित्र प्रकाश परांजपे यांनी नुकतीच सांगितली .
= न्यायालयात कोणीही कोणतीही ‘मागणी’ ( Demand ) करीत नाही तर न्यायालयाला नेहमीच विनंती-याचना करावी लागते . कनिष्ठ न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका ( petition ) करण्यात आली असं म्हणायला हवं . आजकाल बातम्यांत किंवा राजकीय पक्ष . संस्था-संघटनांच्या नेत्यांच्या बोलण्यात उच्च न्यायालयाकडे मागणी केली अशी भाषा असते आणि ती चूक आहे ! न्यायालय निकाल देतात , आदेश देतात आणि क्वचित निर्देशही ; त्याबद्दल लिहिता/बोलतांना काळजी घ्यायला हवी .
= एखादी याचिका ‘सादर’ ( submit ) झाली आणि ‘दाखल’ ( admit ) झाली यात कायदेशीर अर्थ असलेला खूप मोठा फरक आहे . याचिका सादर झाली म्हणजे ती न्यायालयाकडे देण्यात आली ; याचिका सादर झाली म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली असं नसल्यानं आमच्या काळात सादर झालेल्या याचिकेबाबत बातमी होत नसे . अशी बातमी देण्याचा प्रमाद करण्यास कुणी धजावतही नसे .
= अनेकदा , सादर झालेली याचिका ‘दाखल’ करून घेण्याआधी न्यायालयाकडून ती ‘याचिका दाखल का करुन घेऊ नये’ अशी नोटीस ( त्याला NBA- Notice Before Addmission असं म्हणतात ) सरकार किंवा संबधितांवर बजावली जाते . त्या नोटीसीवर आलेल्या उत्तरानं समाधान झालं तर , न्यायालय याचिका दाखल करुन न घेण्याची शक्यता जास्त असते ; तशी शक्यता निर्माण झाली तर याचिकाकर्ता ती याचिका अनेकदा परत घेतो ( आणि काही वेळा संभाव्य नामुष्कीही टाळतो ) . याचिका ‘दाखल’ होण्याच्या संदर्भात अनेकदा युक्तीवादही केला जाऊ शकतो . याचिका दाखल का करुन घेऊ नये अशी नोटीस जारी झाल्यावर किंवा युक्तीवादानंतर याचिका दाखल करुन घ्यायची किंवा नाही हे उच्च किंवा सर्वोच्च न्यायालय ठरवते . त्या कार्यवाहीच्या संदर्भात बातमी करण्याची मुभा आमच्या काळात होती आणि महत्वाचं म्हणजे याचिका वाचून बातमी करावी लागत असे . कित्तीही पानांची असली तरी , याचिका वाचण्याचं एक खास तंत्र आहे ; ते ज्येष्ठ आणि नामवंत वकील असलेल्या अविनाश गुप्ता , सुबोध धर्माधिकारी या दोस्तयारांनी मला शिकवलं !
= वकिलानं तोंडी सांगितलेलं ऐकून बातमी न करण्याची दक्षता आम्हाला घ्यावी लागत असे . तशी वेळ आलीच तर अपरिचित किंवा ज्याच्याकडून अचूक माहिती मिळणार नाही अशी भीती असे त्या वकिलाकडून लेखी घेण्याची काळजी घेतली जात असे . संस्था/संघटनांकडून न्यायालयाच्या प्रक्रियेच्या संदर्भात आलेल्या बातमीची संबंधित/परिचित वकिलाशी बोलून शहानिशा करुन घेण्याचीही पद्धत माझ्या पिढीच्या रिपोर्टिंगच्या दिवसात होती . या कामात सुबोध धर्माधिकारी , अविनाश गुप्ता , श्रीहरी अणे , शशांक मनोहर , चंद्रशेखर कप्तान , आनंद परचुरे अशा अनेक वकील मित्रांचं सहकार्य त्याकाळात मिळालेलं आहे .
= न्यायालयाने आदेश ( Order ) दिले की निर्देश ( Directions ) का निकाल ( Judgement ) या संदर्भातही खूप संभ्रम असल्याचं जाणवतं . ‘न्यायालयाने दिले ५ वर्षांच्या सक्तमजुरीचे निर्देश’ असं अनेकदा ऐकायला किंवा वाचायला मिळतं ; जे की चूक आहे . एका हेबियस कॉर्पसवर निकाल देतांना न्यायालयाने प्रत्यक्षात ‘आदेश’ दिला आहे ; आज वाचण्यात आलेल्या मजकुरात मात्र ‘निर्देश’ असा उल्लेख आलाय . तो अर्थातच चूक आहे .
= उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका ( Public Interest Litigation ) दाखल केली जात असते जनहितार्थ याचिका ( Public Benifit Litigation ) नाही म्हणून ‘जन हितार्थ’ किंवा ‘जनलाभ’ याचिका हे प्रयोग चूक आहेत .
= अनेकदा अनेक खटले कायद्यातील आपल्याला अज्ञात आणि क्लिष्टही
( विशेषत: घटनात्मक ) मुद्दयांवर आधरित असतात . अशा वेळी मराठीत केलेली बातमी मी अनेकदा अविनाश गुप्ता , सुबोध धर्माधिकारी , शशांक मनोहर यांना दाखवून घेत असे . क्रिकेटपटू हरभजनसिंगच्या ऑस्ट्रेलियात गाजलेल्या ‘मंकी’ प्रकरणासहसह दोन/तीन वेळा मी साक्षात व्ही. आर. मनोहरसाहेब यांच्याशीही संपर्क साधला होता आणि उदारमनानं त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं . औरंगाबाद ब्युरोला (मे ९८ ते मार्च २००३ ) असतांना उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आदरणीय नरेंद्र उपाख्य नानासाहेब चपळगावकर यांनाही मी दोन-तीन वेळा यासंदर्भात त्रास दिला होता .
= न्यायालयीन वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात मराठीतला आमच्या पिढीतला ‘दादा’ माणूस म्हणजे ‘लोकसत्ता’तील माझा एकेकाळचा सहकारी अजित गोगटे ! हा मजकूर लिहितांना त्याची आवर्जून आठवण आली .
असो .
मे. हु. जा. व्हा.


-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९
मे. हु. जा . व्हा.
praveen.bardapurkar@gmail.com
blog.praveenbardapurkar.com
= no permission required ; FEEL FREE TO SHARE !
Add a comment...
Wait while more posts are being loaded