Profile cover photo
Profile photo
AYUSH Adivasi Yuva Shakti (adiyuva)
2,852 followers -
ensuring tribal sucess
ensuring tribal sucess

2,852 followers
About
Posts

Post has attachment
आपल्या माहितीसाठी..

संवाद - ट्रायबल कॉन्क्लेव्ह २०१८ (जमशेदपूर १५-१७/१०/२०१८)

या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या आदिवासी कार्यक्रमात समाजासाठी कार्य करणारे आणि समाजावर त्याचा चांगला प्रभाव पडणाऱ्या आदिवासी संस्था/संघटना/ग्रुप/व्यक्ती यांच्या सक्सेस स्टोरी सदरात अनुभव कथन करण्यासाठी निमंत्रित केले होते.

या वेळेस पण या सदरात आयुश च्या वारली चित्रकला उपक्रम साठी निमंत्रित करण्यात आले आहे. संजय दा पऱ्हाड, संदिप दा भोईर, कल्पेश द गोवारी, श्रीनाथ दा ओझरे, सदानंद दा पुंजारा सहभागी होत आहेत. सोबत भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे ५ प्रतिनिधी सहभागी होते आहेत.

आपल्याकडून सक्सेस स्टोरी सदरात पुढील नावे आयोजकांना कळविण्यात आली आहेत.
१) अजय खर्डे (नंदुरबार जिल्हा)
TTSF (ट्रायबल टॅलेंट सर्च फाऊंडेशन) चे संस्थापक, आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासाठी भरीव कार्य. तसेच कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गात सामाजिक जबाबदारी विषयी संवेदशीलता वाढविण्यात मोठा वाटा.

२) डॉ सुनिल पऱ्हाड (खंबाळे, पालघर जिल्हा)
सामाजिक जागृती आणि आदिवासी सशक्तीकरणात सक्रिय सहभाग. आदिवासी चळवळ मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ देता यावा साठी नोकरी चा त्याग. जल जंगल जमीन शिक्षण आरोग्य हक्क चळवळ संस्कृती अस्तित्व इत्यादीसाठी भरीव कार्य. आदिवासी चळवळ मजबूत करण्यासाठी संघटन बांधणीचे दायित्व. आदिवासी एकता परिषद, भूमी सेना, आदिवासी समन्वय मंच आणि आयुश यात महत्वाची भूमिका

३) एकनाथ भोये (नाशिक)
निवृत्त विधी अधिकारी, सध्या आदिवासी विषयावर कायदेशातीर जागरूकता करण्यात भरीव कार्य. आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटना/संस्था/कार्यकर्ते/नेते यासाठी कायदेशीर दृष्टिकोनातून मार्गदर्शन. सामान्य आदिवासींत कायदेशीर तरतुदींविषयी जागरूकता करण्यात मोठा वाटा.

४) निलेश भूतांबरा (पनवेल)
प्रबळगड माची टुरिजम चे फाउंडर. अभयासु आणि चिकित्सक पद्धतीने पूर्ण नियोजनपूर्वक प्रबळगड माची येथे पर्यटन वाढीस लावून स्थानिक आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात महत्वाचा वाटा.

५) रवींद्र तळपे (पुणे)
आदिवासी विद्यार्थी, आश्रम शाळा येथील अनेक प्रश्नावर सरकारला कायदेशीर पद्धतीने आदिवासी समाज हित जपण्यासाठी PIL दाखल करून पाठपुरावा, अनेक प्रश्नावर समर्पक उपायोजना करण्यासाठी मोठा वाटा

६) संपत देवजी ठाणकर (गंगानगाव, पालघर जिल्हा)
आदिवासी पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भरीव कार्य. अनेक वर्ष अभ्यास करून आदिवासी संस्कृती आणि परंपरा यावर स्वखर्चाने ७ पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण व प्रकाशन. * गावदेव जागरण उपक्रमा* मार्फत गावा गावात हिंडून आदिवासी संस्कृती आणि परंपरा विषयी जागरूकता

७) नामदेव आणि भास्कर भोसले (उरळी, पुणे जिल्हा)
पारधी समाजा विषयी परंपरा संस्कृती या विषयी अभ्यास करून विविध लिखाण, कादंबरी प्रकाशन. पारधी समाजाच्या विविध प्रशांवर पद्धतशीर आंदोलनात महत्वाची भूमिका.

८) राजेंद्र मरस्कोले (नागपूर)
OFROT (ऑरगॅनिझशन फॉर ट्रायबल राईट्स) चे नेतृत्व. आदिवासी हक्क बाधित ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग. आदिवासी समाज हितासाठी कायदेशीर मार्गाने विविध प्रकरने सोडविण्यात महत्वाची भूमिका

सहज लक्षात आले, प्रत्येक क्षेत्रात आपले अनेक यशस्वी उदाहरणे आहेत. आदिवासी यशोगाथांचा संग्रह व्हावा या साठी आपण प्रयत्न करीत आहोत.
आपल्या संपर्कातील समाजावर प्रभाव पडणाऱ्या सक्सेस स्टोरी येथे जमा करू शकता www.sucess.adiyuva.in

आदिवासी समाज हितासाठी असलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न मजबूत करूया,
Lets do it together!

जोहार !
Add a comment...

|| आयुश उपक्रम माहिती : १२ ऑकटो २०१८ ||

आदिवासी कलाकृती, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यातून आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन हेतू प्रयत्न सुरु आहेत. (स्थानिक पातळीवर रोजगार).

आपल्या माहितीसाठी, वारली चित्रकला क्लस्टर विकास उपक्रम संदर्भात उच्चस्तरीय अधिकारी भेट दौरा संपन्न.

१) फिल्ड व्हिजिट ५/१०/२०१८
क्वेस्ट (Quality Evaluation for Sustainable Transformation centre) कार्यकारी संचालक किशोरी गद्रे, बांबू बोर्ड चे सल्लागार विवेक नागभीरे, MTDC आंतराष्ट्रीय रेलशन ऑफिसर मानसी कोठारे, आदिवासी विकास विभाग मंत्रालयाचे कन्सल्टन्टआणि CMF, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू चे विस्तार अधिकारी, सोबत आर्किटेक्चर, इंजिनिअर, आणि इको फ्रेंडली विषयावर चे तज्ञ असे एकूण १२ जण सहभागी झाले होते.

वेती(संदीप दा भोईर), सूर्या नदी (भीम बांध), एना (वनश्या दा भुजाड), साखरे (पाडा), खंबाळे (संजय दा पऱ्हाड), रायतली (संदेश दा), गंगानगाव (संपत दा ठाणकर) असा दौरा करण्यात आला. ठरलेल्या ठिकाणी तेथे एकत्र आलेल्या कलाकाकारांशी संवाद आणि कलाकृती निरीक्षण केले. या दौऱ्यात सचिन दा सातवी आणि डॉ सुनिल दा पऱ्हाड यांनी मार्गदर्शन केले.

२) आयुश कोर टीम बैठक ६/१०/२०१८
आदिवासी विकास विभाग चे उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू/जव्हार चे प्रकल्प अधिकारी कुंभार आणि त्यांचे सहायक, फिल्ड व्हिजिट चे १२ अधिकारी, आयुश ची कोर टीम, कलाकार, गट प्रतिनिधी सहभागी झाले होते. आयुश तर्फे प्रस्थावित वारली चित्रकला क्लस्टर विकास उपक्रम विषयी सचिन सातवी यांनी प्रेझेन्टेशन दिले. उच्च स्थरीय अधिकाऱ्यांनी काही गोष्टी सुचवल्या आणि त्यांचे मत मांडले. बैठक बिरसा मुंडा ग्राम पंचायत सभागृह कासा येथे पार पडली

३) कलाकार सवांद बैठक ६/१०/२०१८
उपस्तित कलाकारांसोबत उपक्रमविषयी माहिती आणि संबंधित विषयावर चर्चा झाली. अनेक अनुभव, आव्हाने, पुढील एक्टिविटी यावर पुढील दिशा ठरविण्यात आली. कोर टीम मीटिंग नंतर बिरसा मुंडा ग्राम पंचायत सभागृह कासा येथे पार पडली

४) फॉलोवॊ अप बैठक ११/१०/२०१८
मुंबई येथे क्वेस्ट (Quality Evaluation for Sustainable Transformation centre) कार्यालयात फॉलोवॊ अप बैठकीत चेतन दा गुराडा, डॉ सुनिल दा पऱ्हाड, आणि संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू, पर्यायी व्यवस्था मजबुतीकरणा चा प्रयत्न करतो आहोत.
आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे.

जल जंगल जमीन जीव सोबत आपली स्वायत्त आदिवासी अर्थव्यवस्था मजबूत करूया.

आपण पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया.
Lets do it together!
जोहार !

आयुश | आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | 0 9246 361 249
Add a comment...

Post has attachment
|| आयुश उपक्रम : समन्वयक नियुक्ती ||

आदिवासी कलाकृती, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यातून आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन हेतू प्रयत्न सुरु आहेत.

या उपक्रमा अंतर्गत एका वर्षासाठी मानधन/करार तत्वावर समन्वयक नियुक्त करीत आहोत. (५ जागा)

आपल्या पैकी किंवा आपल्या संपर्कात कुणी इच्छुक असल्यास नोंदणी करण्यास सांगावे.

सविस्तर माहिती, नोंदणी अर्ज येथे उपलब्ध
www.job.adiyuva.in

_____________________________

आयुश | आदिवासी युवा शक्ती | 9246361249
Warli Painting Cluster | Join as Co ordinator
|| वारली चित्रकला उपक्रम || *समन्वयक नियुक्ती* आदिवासी कलाकृती, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यातून आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन हेतू रचनात्मक कार्य आणि विविध *उपक्रम राबविण्यासाठी समन्वयक नियुक्त केले जात आहेत*. आपल्या पैकी किंवा आपल्या संपर्कात कुणी इच्छुक असल्यास जरूर कळवावे. सविस्तर माहिती आणि नोंदणी अर्ज येथे उपलब्ध https://goo.gl/forms/nO7IAmVsccwi6l1z2 ______________________________ आयुश । आदिवासी युवा शक्ती ...
job.adiyuva.in
Add a comment...

|| आयुश : आदिवासी संपर्क जाळे ||

तुमच्या मित्रांना फेसबुक आयुश ग्रुप वर ऍड केलेत का?
आज या ग्रुप वर २७,००० सभासद आहेत.

चलो आदिवासी संपर्क जाळे वाढवूया, आपली ऊर्जा समाज हिता साठी कामी आणूया

ग्रुप लिंक :
https://www.fb.com/groups/adivasi/

________________________________

आयुश | आदिवासी युवा शक्ती | 9246361249
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
Success Story documentary shown by Government Of Maharashtra (Adivasi Vikas Vibhag) on occasion of state level world Indigenous peoples day program at Nashik on 9th Aug 2018
Add a comment...

Post has attachment
|| राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ ||

हैदराबाद येथे १३ जुलै रोजी एकदिवशीय कार्यशाळा

राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद (NTEC - 2018) भारतातील आदिवासी उद्योजकांसाठी व्यवसाय आणि व्यावसायिक नेटवर्किंग शिखर परिषद आहे. आदिवासी उद्योजकांमधील औद्योगिक विकास आणि व्यापाराशी संबंधित महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आदिवासी उद्योजक, केंद्र सरकार, विविध राज्य सरकार, अनुसूचित बँक, धोरण सल्लागार, सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी महामंडळे यांना एकत्र आणण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. हे व्यासपीठ देशातील आदिवासींच्या उद्यमिता विकासासाठी उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधी, आर्थिक आणि बाजारपेठ समर्थन वातावरण समजून घेण्यासाठी अनुभवी आणि संभाव्य अशा दोन्ही आदिवासी उद्योजकांना व्यासपीठ आहे.

National Tribal Entrepreneurs Conclave
Location: 13 July, Hotel Marriott, Hyderabad
Event Timing: 9 AM to 6 PM
More Details - http://ntecindia.org/
Organizer : DICCI

सदर कार्यक्रमात आदिवासी उद्यमींना असलेल्या संधी आणि या संदर्भातील आदिवासी समाज हिताचे उपक्रम आणि संपर्क वाढवण्यासाठी आयुश ग्रुप तर्फे सचिन सातवी सहभागी होत आहेत.

आपल्या पैकी इच्छुकांनी सहभागी होऊन आदिवासी समाजाच्या अस्मिते सोबत स्वावलंबी अर्थव्यवस्था मजबुतीकरणासाठी संभाव्य पर्याय शोधून सशक्तीकरणास हातभार लावूया. Lets do it together!

NTEC बद्दल थोडक्यात
National Tribal Entrepreneurs Conclave (NTEC - 2018) is the business and professional networking summit for the Tribal Entrepreneurs of India. It provides an opportunity to bring together the Tribal Entrepreneurs, Central Government, various State Governments, Scheduled Banks, Policy Consultants, PSUs, Private Corporations, to discuss important matters pertaining to the industrial growth and commerce across the tribal business community. The platform offers the tribal businessmen, both experienced and aspiring to understand the business opportunities, financial and market support ecosystem available for the entrepreneurship development of tribal people in the country.

DICCI बद्दल थोडक्यात
The DICCI is an apex body of SC/ST Entrepreneurs in the country with 25 State and 7 International chapters, working since 2005. DICCI organizes NVDP, Industrial exhibitions and trade fairs to enable networking and market support platform and showcase products manufactured by SC/ST Entrepreneurs.

जोहार !

AYUSH | Adivasi Yuva Shakti
www.adiyuva.in | 0 9246 361 249
Write Review at https://goo.gl/3PZEMM
Commenting is disabled for this post.

|| आयुश उपक्रम : महिला गट बांधणी ||
|| आयुश उपक्रम : महिला गट बांधणी || वारली चित्रकार गट बांधणी नंतर एक प्रायोगिक उपक्रम हाती घेतो आहोत. डहाणू, तलासरी, पालघर, जव्हार, विक्रमगड या ५ तालुक्यात प्रत्येकी १० महिलांचे गट तयार करीत आहोत. ज्यूट पिशवी, कापडी पिशवी, कापडावर डिझाईन, भिंतीवर चित्र, पार...
Add a comment...
Wait while more posts are being loaded