Profile cover photo
Profile photo
Naga rick
18 followers -
I am nagari(ck)
I am nagari(ck)

18 followers
About
Posts

Post has attachment
अहमदनगरचा पाणी प्रश्न -

अहमदनगरला पुढच्या पिढ्या वाचवायच्या असतील तर जिल्ह्यात पाण्याचे शास्त्रज्ञ/इंजिनिअर्स हवेत आणि पाण्याचा आदर करणारे नागरिकही. फक्त पदवीधारक नकोत, नाहीतर ३५ वर्षांपासून बिनकामाचे वॉटर इंजिनीअरिंगचे कोर्सेस चालू आहेत महाराष्ट्रात, कृषी(ठोकळे शेतकरी?) पर्यावरण शास्त्र (धरण प्रकल्प?) आणि अर्बन आर्किटेक्चर/प्लांनिंग (सांडपाणी? झाडे? पाणलोट?) शिकवणारे कोर्सेसही. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची शास्त्रातील उदासीनता जिल्ह्याला महाग जाईल का? सकस अन्न हेच औषध(दवाखाने बंद), प्रोटीन पीक(मास नको/कमी), कमीत कमी पाणी वापरून शेती याचा विचार शेवटच्या गरिबांपर्यंत भारतीय करणार? महाराष्ट्र कोरडवाहू जमिनीत कापूस लावतो आणि दुष्काळग्रस्त भागात ऊस... यातूनच महाराष्ट्राला शास्त्रातले किती समजते हे दिसून येत. वर्ष २०२५ पर्यंत भारत खाद्य परावलंबी होणार? बियाणं परावलंबी? खाद्य कंपन्या/सप्लाय चेन परावलंबी? ५०% खुंटलेल्या भारतीय पिढ्या येणाऱ्या काळात ७५% होणार? भारतात खाद्य आयात वाढणार? भारतात खाद्य आयात २०१५-१६ मध्ये १४०२६८ कोटी रुपयांची झाली.

#अहमदनगर जिल्ह्याच्या पिढ्या गेल्यात मानवनिर्मित दुष्काळ निर्माण करण्यात, पण एकाने वॉटर युनिव्हर्सिटी/रिसर्च केला नाही - प्राचीन भारतीय पाण्याच्या पद्धती पासून आधुनिक शास्त्रीय शोधापर्यंत, वॉटर इंजिनीअरिंग करून पाण्यावर एकाने नवनवीन प्रयोग केले नाहीत. चुकीच्या गोष्टींना जेंव्हा समाज प्राधान्य देतो तेंव्हा असे मानवनिर्मित दुष्काळाचे उद्योग सुरु होतात. ७०% पाणी जर शेतीला जात असेल, तर दुष्काळग्रस्त अहमदनगर जिल्ह्यात तर पाण्याचे शास्त्रीय ज्ञान जास्त हवे - आक्वाफर रिप्लेनिशमेंट(जलसंवर्धन), वॉटर कॉन्सर्व्हशन (जलसंवर्धन), रेनवॉटर हार्वेस्टिंग(पाणलोट), ग्राऊंडवॉटर गव्हर्नन्स(जल नियमन), फिल्टर वॉटर, ड्रीप इर्रीगेशन, सुवेज, वॉटर ट्रीटमेंट(जल प्रक्रिया), वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर(जल आराखडा), डिसॅलिनेशन, रिव्हर्स ऑस्मॉसिस, ग्रे वॉटर, ब्लॅक वॉटर, ब्रँकिश वॉटर(ड्रीप ड्रिलिंग, डिसॅलिनेशन), स्टॉर्म वॉटर, क्लाऊड सीडींग...

जेंव्हा शेवटचा पाऊस येतो, तेंव्हा ते पाणी शेतात उरलेले खाद्य/खत (न्यूट्रीयन्ट्स/फर्टिलायझर) वहात नदीत/समुद्रात घेऊन जातात. त्या नायट्रोजन खताचा आणि खाद्याचा उपयोग पाण्यावर तरंगणारी हिरवळ (अल्जी) वाढण्यासाठी होतो. त्या अल्जीमुळे पाण्याखालील मासे/झाडे मरतात. त्यामुळे झाडाच्या मुळाला पोहोचेल असे मोचकेच खत आणि पाणी(ड्रीप) शेतीला वापरावे. अहमदनगर जिल्ह्यात कालवे/विहिरीचे पंप असे उद्योग करू नयेत. पाण्याचा, खताचा, जमिनीचा आणि डोक्याचा दुरुपयोग यामुळे जगात आणि अहमदनगर जिल्ह्यात खाद्य सुरक्षा (फूड सिक्युरिटी) हा भयाण प्रश्न भेडसावत आहे आणि राहील. सुवेज पाण्याचा वापर कसा करावा, सुवेज म्हणजे बाथरूम, संडास, किचन, वगैरेचे जाणारे नाल्यातले सांडपाणी. महाराष्ट्रात क्रिकेट मैदानावर पाण्याच्या दुरुपयोगाची एवढी आरडाओरड झाली, पण श्रीमंत क्रिकेट संस्थेने त्या शहरातले सांडपाणी घेऊन त्याचे वॉटर ट्रीटमेंट करून ते का नाही वापरले क्रिकेटच्या मैदानावर? फक्त लुटायचे क्रिकेटच्या टुकार प्रेक्षकांना - घरात टीव्ही लावून किंवा शहरात मैदान करून. इतर देशात ३ पाण्याचे नियमन होते - वेगवेगळे पाईप लावून - शुद्ध पाणी, अशुद्ध पाणी (सुवेज, सांडपाणी), प्रक्रिया पाणी (वॉटर ट्रीटमेंट, वेगळे प्लम्बिंग) महाराष्ट्र क्रिकेट संस्थेने का नाही वॉटर ट्रीटमेंट प्लम्बिंगचे पाईप शहरात टाकून, शहरातले सांडपाणी(सुवेज) ट्रीट करून त्या प्लम्बिंग इन्फ्रास्ट्रक्चरने शहराला आणि जवळच्या गावातल्या शेतीला पुरवेल?

भारताची शहरे लांब दूर पाईपलाईन टाकून, लिकेज करून, गावाचे पाणी का पळवत आहेत? मुंबई सारखे श्रीमंत शहर समुद्राच्या पिण्याच्या पाण्याचे डिसॅलिनेशन प्लांट का नाही टाकत शहराजवळ? अहमदनगर आणि मुंबई मधली गावे समुद्रातुन पिण्याचे पाणी(डिसॅलिनेशन) आणू शकतील का? प्लॅस्टिकच्या वॉटर बॉटलचे धंदे का नाही बंद झाले अजून भारतात? शेतीला जर ७०% पाणी जात असेल तर कमीत कमी पाण्यात, जास्तीत जास्त जमिनीला पोषक अशी गावागावात भारतात कोणती सकस पिके आहेत? का लाव अति पाणी लागणारा गहू, तांदूळ आणि ऊस कायमचा? शेतीचे अर्थशास्त्र, ग्राहकाच्या खाद्य सवयी, फूड कंपन्यांचे भाजी/पिकाचे रंग/आकार नियम या सगळ्यात भाजी/पिकाला लागणाऱ्या पाण्याला किती महत्व दिले जाते? भारतात घरे/बंगले/इमारती बांधण्याअगोदर त्या घराला लागणारी कायमची पाण्याची, सुवेज, रेनवॉटर हार्वेस्टिंगची सोय का करत नाहीत रिअल इस्टेट बिल्डर्स?

शहरात रस्ते निर्माण करतांना दोन्ही बाजूंनी खणलेल्या जमीनीची माती(टॉप सॉईल) ठेवावी, त्या मातीला चोरू नये किंवा ट्रकमध्ये टाकून इतर ठिकाणी फेकू नये. त्या मातीत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडे लावावीत. शहराच्या सिवेज पाइपलाईन/ड्रेनेज मध्ये उतरून विषारी वायुमुळे नगरपालिकेचे कामगार मरत असतील तर भारत त्या कामासाठी रोबोट/ड्रोन केंव्हा वापरणार? अशी एक पिढी जाणारी पाण्याची बरीच कामे आहेत ही, उगीचच लोकसंख्या वाढवण्यात दिवस चाललेत भारतीय पिढ्यांचे. त्यात ६०% शेतकरी, शेत कामगार? जमिनीखाली असणारे हजारो वर्षाचे पाणी उपसून ५० वर्षात संपवणारे? निदान १५/२० वर्षे एकत्र येऊन न थांबता पाण्याची कामे करा. जितका जास्त वेळ लावणार पाण्याची कामे करायला, तितकी ती कामे प्रचंड महागणार - पैश्याने, मनुष्यबळाने, मानवी विकासाने... पाणी सुरक्षा धोक्यात आली कि अन्न सुरक्षा धोक्यात येणार, अन्न सुरक्षा धोक्यात आली कि राष्ट्र सुरक्षा धोक्यात येणार. भारत, चीन, पाकिस्तान या देशांना पाणी हा प्रश्न सातत्याने भेडसावणार आहे. अहमदनगर जिल्हा शास्त्रीय संशोधनातून हा पाणी प्रश्न तिन्ही देशांसाठी सोडवू शकेल? धरणे बांधा आणि नद्या जोडा हे पाणी शास्त्र नाही.

#Ahmednagar Maharashtra India
Photo

Post has attachment
भारत खरच सहनशील समाज आहे का? भारतात हिंसा का होते आणि ती हिंसा कोण भडकावतो?
Is India barbaric? Do Indians carry science in hand like mobile phones, but their lifestyle is still run by medieval thinking? Until 5000 years ago, humans lived in anarchy. You can't give examples of such past in 21st century to peddle your agenda of hatred in India. Your money, your caste, your religion, your language, your community...? Why? Why Indians don't talk about Bengal famine? People died then because they couldn't afford food, though food was available. Do Indians think, that is not happening in India today? Why Africa is not developed after 1960s? The major reasons for that are lack of strong transparent public institutions and tribal violence. Does India lack good institutions (governance, judiciary, police, education etc.)? The answer is YES. When you have shaky public institutions, you get shaky country. It comes back to same story of Indians - inequalities - income, health, emotional, cognitive inequalities. Violence is well researched topic now - brain imaging, genetics, sociology, psychology. Read Steven Pinker. Indians create violence/delusion with mob mentality, through mainstream media, hate speeches, and technology like social media as well. India had 20 internet shutdowns this year, till June 2017, for violence fueled by rumours. India lost Rs.6000 crore trade because of such internet shutdowns last year (2015-16). India is one of the top countries for DOMESTIC violence. The major motives of violence are exploitation(income, gender), dominance(race, caste), revenge(moralistic violence, filmy ideas), utopian ideologies(nationalism, communal). India has a great opportunity to build public institutions that can be set examples for Africa(54 countries) and Arab countries for transparent governance. Don't blow it.

Origins of violence https://www.youtube.com/watch?v=vxMP4IAkgpU
History of Violence https://www.youtube.com/watch?v=sjT4HlNJNgI
Scramble for Africa - Colonism, Cold War, New Oligarchs https://www.youtube.com/watch?v=Pw12KGSj53k

#अहमदनगर #Ahmednagar
Photo

भारताचे २६ कोटी विद्यार्थी/नी जागतिक शिक्षणाच्या स्पर्धेत मागे का पडतात? #अहमदनगर जिल्ह्याचे?
Education - Centralised decentralised approach in Japan
About 26 crore children attend school in India. Japan, South Korea, Taiwan - These countries developed because of good education. These countries have CENTRALISED control of education. The high quality of education is enforced by bureaucracies to keep high quality education in schools, reducing corruption from both sides - demand and supply sides. Bureaucracy is more interested in keeping high quality of education than teacher interests. भारतात मात्र केंद्र आणि राज्य सरकार - दोन्हीचे अधिकारी शिक्षणाची जबाबदारी घेत नाहीत. त्यांच्या विभागातले चार विद्यार्थी एका वर्गात नापास झाले किंवा मागे पडले तर हे अधिकारी घरी पाठवले पाहिजे. काही येत नाही तरी पास कसे होतात ५०% विद्यार्थी भारतात? भारतात शिक्षकाला ट्रेनिंग देणाऱ्या १७००० टुकार संस्था (BEd,DEd,MEd) आहेत. त्याही बंद केल्या पाहिजेत. २०११ पासून प्राथमिक शिक्षकाच्या इच्छुकांमध्ये सरकारी चाचणीत ९९% अर्जदार दरवर्षी नापास होतात. त्यातूनच किती भारतीयांना शिक्षक होण्यात आवड आहे हे दिसते. शिक्षक संघ/टीचर युनिअनचा उपयोग राजकारण करणे आणि आळशी शिक्षक शाळेत ठेवणे असे उद्योगही बंद केले पाहिजेत. शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार करून शिक्षकाची नौकरी घेतात लोक. शाळा बुडवून शिक्षक फिरतो निवडणुकीला पुढाऱ्याचे गुणगान गात. भारतात खाजगी शिकवण्याला (private education, coaching classes) तर ऊतच आलाय गल्लीबोळात. The rapid growth of low cost HIGH QUALITY education created economic boom in these countries. The GDP% share of education is also not that high compare to income of these countries. The education in these countries works well because QUALITY of education is very high. The students in these countries develop strong cognitive skills, do extremelly well in inter/national tests like PISA and have strong vocational/technical skills etc. The parents in these countries are extremely committed in improving education in community, not just for their kids. There are supplimentary/decentralised systems (not rote coaching classes) in these countries to develop personality of kids - participate in study program at school, study alone, private lessons/mentoring, private preparatory school - 5.30 am - 6.30 pm schedule.

#Ahmednagar

चीन आणि भारत यात काय फरक आहे? काही देश गरीब आणि काही देश श्रीमंत का आहेत? १९९१ पासून उदारीकरणामुळे दरवर्षी भारताचा ७.५% जीडीपी वाढला आहे.अहमदनगर चीन सारखी दर ७ वर्षांनी जिल्ह्याची अर्थव्यवस्था(जीडीपी) दुप्पट करू शकेल का? प्रत्येक वर्षी १०% विकास दर - अहमदनगर असे करू शकेल येणाऱ्या ३० वर्षात? २००७ मध्ये लिहिलेले प्रश्न अजून अहमदनगर जिल्ह्याला सोडवता आले नाहीत.

Why Norway has $50+ haircut? The answer is labour productivity. India has huge population. Cheap labour is its expertise. The problem with that is exploitation by select few in India itself and other countries. India should develop skills to dismantle CONCENTRATED WEALTH in India. The distributed wealth/capital with knowledge labour will create more innovation and entrepreneurs. That will create more economic growth and human capital. Who knows, with better labour productivity, India will have $50 haircut charges than putting humans as NAUKAR(domestic labour) in Indian homes. India has schools with more teacher absenteeism. Indian teachers/professors are bigger problem who prefer to live in urban India and don't go/teach in rural India to develop skills. For last 30+ years, investment per worker in agriculture is declined in India. I was asking local politicians who own sugar factories, how will you develop skills of these workers who cut sugarcane crop in Ahmednagar district. No answer yet. That job can be automated overnight in India. Brazil cuts sugarcane crop using machines.

China has official and unofficial job markets. Chinese rural migrant workers wait in streets to get odd jobs in big cities like Beijing. Read 'Factory Girls' book. Compare it to life of 1930s Factory Girls in Europe. Indians should learn to understand their history/generations first. Indian education per capita expenditure was 1/100 of British pound in 1860-1912 period. Before 1947, it was less than 1% GDP, among the lowest in the world. After 1947, it didn't improve much. Indian women were completely ignored for education in this period. India not educating these past/present generations of women is a major reason of huge population in India. घरातली मुलगी/महिला न शिकवणे हे भारताच्या पिढ्यांना शेकडो वर्ष महागात गेलय आणि जाईल. India never developed primary education and spent education money on other educational institutes for select few. Now, India brought RTE and Indians are still idiots to develop poor Indians. Most of these Indians are still living rural/agrarian life of past generations. India didn't invest in agriculture for centuries. Read economic/tax history of agriculture and its labour in India. Rural China was converted in semi-skilled jobs like infrastructure, automotive, manufacturing, railways etc. that created new businesses in China right from scratch - real estate, roads, bridges, cars, bullet trains etc. Indian rural wage has been stagnated for years. Chinese rural wage has been going up by 7% every year. China developed because it solved Health, Education and Gender inequalities, which India still can't solve - urban poor, rural India to 8% Adivasis. China is bound to face downward economic cycle in future (due to China's debt problem? bankrupt EU/America consumer? Africa uprising for commons rights?, Uprising against 0.4% Chinese people hold 70% China's wealth, Deindustralisation of local manufacturing in countries, China real estate/currency bubble, Educated Chinese citizens to spot CCP propaganda media?), but it has invested 50% GDP in development of human capital on 10% economic growth for 30 years. Can India do that? Does India have robust institutions(government, political, legal, market) to drive that growth and build human capital? Ahmednagar?

Why Nations Fail (Book).
Ahmednagar By Year 2031 article in Ahmednagar Blog - २००७ मध्ये लिहिलेले प्रश्न.
Extralegal economy - The Other Path - Power of the Poor in Peru - Hernando de Soto

#अहमदनगर #Ahmednagar

झाल्या किरकोळ अंतराळ चर्चा सुरु? कार्टोसॅट, PSLV, लाँच? भारताला ४+ टन व्यापारी/कमर्शिअल सॅटेलाईट/लाँच करणारे भारतीय हवेत. अंतराळ ही ३०००० कोटी डॉलर्सची जागतिक बाजारपेठ आहे. अमेरिका, युरोप, रशिया, जपान, चीन असे देश कमर्शिअल सॅटेलाईट बनवतात. नासा लाँच उद्योगातून बाहेर पडलय. आता नव्या अंतराळ कंपन्या तयार झाल्यात - स्पेस एक्स सारख्या. भारत ६०० कोटी डॉलर्सचे अंतराळ बजेट ठेवून पुढच्या ५ वर्षात(२०२२) २५ रॉकेट्स अंतराळात सोडणार, जे चीनने मागच्या एक वर्षात केल. अमेरिकेचे अंतराळ बजेट($४००० कोटी) चीनच्या सहा पट आहे. भारत पुढच्या १० वर्षात कमर्शिअल क्वान्टम सॅटेलाईट (सिक्युरड कम्युनिकेशन, ट्रान्समिशन, क्वान्टम इंटरनेट, क्वान्टम कॉम्पुटिंग) निर्माण करणार?
#अहमदनगर जिल्ह्यात अंतराळ समजणारे किती? ४+ टन वजनाचे सॅटेलाईट निर्माण करणारे? जागतिक बाजारपेठेत अंतराळ/डिफेन्स पार्टस निर्माण करणारे? शून्य. अंतराळ समजण्यास पैशे नाही, साधन नाहीत असे आळशी लोक म्हणतात. अशी निमित्त (एक्सयूजेस) बाजूला ठेवून चांगली लोक काम करतात. कल्पना चावला सारखा अहमदनगरचा ऍस्ट्रोनॉट होणार? इस्राईल देश म्हणजे २ नगरची लोकसंख्या. तो छोटा देश भारताला डिफेन्स टेकनॉलॉजि देतो. उगीचच कॅन्टोन्मेंट बोर्ड, VRDE चे येडे जमा केलेत अहमदनगर जिल्ह्यात. काही ढेकळ त्यांनी अहमदनगरच्या नागरिकांना शिकवल नाही. अहमदनगर जिल्ह्याची अंतराळ बाजारपेठ म्हणजे ज्याला काहीही शास्त्रीय पाया नाही ते कुंडली उद्योग (हॉरोस्कोप). याला शनी आहे, तिला मंगळ आहे असे बाबागिरीचे फालतू उद्योग. लोक २० सॅटेलाईटस लावून जग जोडतात, अहमदनगर जिल्ह्याच्या ५० लाख टुकारांना जिल्ह्याची १५०० गावे जोडता येत नाहीत.

ISRO, NASA, SpaceX, OneWeb, Blue Origin, OneSpace, ExSpace, Team Indus, Astrome Tech, Ariane,Vega (Arianespace), Atlas (ULA), Delta iV (ULA), Falcon 9 (SpaceX), PSLV-XL(ISRO), Soyuz-FG (NASA,Roscosmos), Long March 2F (CNSA), H-IIA (Mistsubishi Heavy Ind., Japan), Pegasus XL (Orbital ATK, Aircraft launch) GSLV MK III (ISRO, Sriharikota)

#Ahmednagar

ग्रामीण भागातली मुलगी आणि तिचा अंतराळ प्रवास https://www.youtube.com/watch?v=3xPDZeH61bE
जयंत नारळीकर - विज्ञान प्रसार आणि आम्ही https://www.youtube.com/playlist?list=PLkU5_uOnjxgVr3s3TqZHo3Rg5dGxE_Ffu
Rocket Vocabulary https://www.youtube.com/watch?v=52uikGLvKqA
Rocket Science https://www.youtube.com/watch?v=HESOat2iPzU
How to build a satellite https://www.youtube.com/watch?v=8J0iA7EH9CM
Inside ISRO https://www.youtube.com/watch?v=Jv-RoOEjWGA
ISRO-IIST https://www.youtube.com/watch?v=ViIdI1rUnlE
Internatioal Space Station https://www.youtube.com/watch?v=SGP6Y0Pnhe4
IUCAA/Jayant Naralikar https://www.youtube.com/watch?v=8BLUm2t82z0
Rise of the Rocket Girls (book) https://www.youtube.com/watch?v=YtdDOfO7hC0
How does China's quantum satellite work? https://www.youtube.com/watch?v=qj22gj6vNX4
Astro career https://www.youtube.com/watch?v=r0EGR1SpOXU

Post has attachment
#अहमदनगर जिल्ह्याला बायोटेकनॉलॉजि किती समजते? अहमदनगर बायो चीप्सचे शेनझेन (चीन, Shenzhen) होऊ शकते का? अहमदनगर जिल्ह्यात गावातल्या टाळक्याकडे खालील स्किल्स/ज्ञान/गुण हवेत... #Ahmednagar
Photo

Post has attachment
Photo

Post has attachment
अहमदनगर जिल्ह्यात किती शास्त्रीय विचारसरणीची गावे आहेत? ०/१/२?
https://youtu.be/CSEGj-GNIcw

अहमदनगर जिल्ह्यात गावागावात श्रमदानाने मोफत पाणलोट कसे निर्माण करावे?
https://youtu.be/KQwhdfuhnV4

Post has attachment
झिरो बजेट नैसर्गिक शेती
रासायनिक/सेंद्रिय शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, शेतीसाठी देशी गाय/गांडूळ यापुढे जाऊन तुम्हाला भारतासाठी शास्त्रशुद्ध विचार करावाच लागेल. देशी गाय (१ ग्रॅम शेणात ३०० कोटी जिवाणू/सुष्मजीव) आणि देशी गांडुळांवर (नांगरणी नको) जरी भारतात/महाराष्ट्रात शेती/ह्यूमस होत असली तरी तशी शेतीची पद्धत जगात चालेलच असे नाही. अहमदनगर जिल्ह्यात किती आहेत या zbnf प्रणालीचे शेतकरी? आंतरपीक आलीच नाहीत/नैसर्गिक आपत्तीत आंतरपीक गेली/भावच मिळाला नाही यावर काही भाष्य नाही इथे. तसेच विविध प्रकारच्या जमिनीत आणि किती वर्षे रासायनिक शेती केलेली पूर्वीची जमीन आहे त्याचा विचार केलेले अध्ययन दिसत नाही इथे - किती वर्ष लागतील त्या जमिनीला नैसर्गिक होण्यासाठी? अहमदनगर/इतर शहरातल्या गल्लीबोळातल्या सरकारी मोकळ्या बंजर जमिनी पहेलवान करू शकता येतात का हे तंत्र वापरून? त्या कशा कराव्या? ४० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला, तर १००० शेतकरी/जमिनी तरी नापीक/नापास झाल्या असतील ना या प्रणालीत. त्याचीही मांडणी नाही इथे. चांगला प्रयत्न आहे पण हा. सुपोषण/न्यूट्रिशनचे अज्ञानी आणि खुंटलेल्या भारतीय लोकसंख्येला स्वस्त पौष्टिक अन्न गरजेचे आहे. महाराष्ट्रात शेतकरी मात्र अशास्त्रीय ठोकळे ठेवू नका, सहकार साखर कारखाने/कॅश क्रॉप्स/धरणाच्या फुफाट्यातून शेण/गांडूळात अडकलेले आणि अति लोकसंख्या वाढवणारे ठेवू नका. त्या शेण/गांडूळाची मायक्रोबायोलॉजि समजून घ्या आणि साधे ज्ञानही शास्त्रीय असू शकते. शास्त्र सोपे असू शकत नाही असे पूर्वग्रह ठेवू नका. जमिनीत काही नाही असे कोण म्हणते आता? सॉईल मायक्रोबायोलॉजी असा विषय आहे आता. महाराष्ट्रात शेतकरी आणि शिक्षणसंस्था अशास्त्रीय असतील तर काय करणार? धोतर घालूनही मायक्रोबायॉलॉजि शिकता येते असे किती शेतकरी आहेत महाराष्ट्राच्या गावागावात? कच्चे दूध/रॉ मिल्क - कच्चे दूध पाश्चराईझ करू का नको? युरोपमध्ये कच्चे दूध/रॉ मिल्क का विकतात मग? किनवण(फर्मेंटेशन) म्हणजे नेमके काय? जीवामृत कल्चर जर मोनोकल्चर झाले तर जमिनीला धोका आहे का आणि युरियासारखे जमिनीची प्रतिकारक्षमता कमी होत होत भविष्यात पीक उत्पादन कमी कमी होणार का? When does organism/microorganism become bad? When its population becomes out of control.

शोषण हे फक्त शोषण आहे. भारताचे शोषण बाहेरचे करतात आणि भारतातले करत नाही हा विचार चांगला नाही - साखर कारखाने, जमिनी बळकावणे, बाजार समित्या, खाणी, महागडे खाजगी शिक्षण/दवाखाने...

गोसंस्कृती (कॅटल) ही प्राचीन आहे, फक्त भारतात नाही. आफ्रिकेत प्राण्याचे कळप गवत खात शेणा/मुताने जंगलाच्या जमिनी सुपीक ठेवत. कळपाची लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी वाघासारखे प्राणी होते. ती नैसर्गिक संस्कृती मानवाने कोलमडली. त्यामुळे जमिनी बंजर झाल्या (climate change?). याची नैतिक जबाबदारी भारताची मानवी (शहरी?) लोकसंख्या घेताना दिसत नाही. भारतात कोणी दिसत नाही मग मानवी लोकसंख्या नियंत्रण करताना? निदान वृक्षारोपणाची आणि नैसर्गिक पालनाची जबाबदारी? सुभाष पाळेकर याच्यासारखी स्वतःची शेती विकून, बायकोचे दागिने विकून शास्त्रीय शेती/जंगल संशोधन करताना भारतीय दिसत नाहीत.

जे राष्ट्र जमीनाचा(सॉईल/सजीव) नाश करते, त्या राष्ट्राचा नाश होतो (FDR). जमिनी/समुद्राचा नाश म्हणजे वातावरणाचा नाश. आकाशगंगेत १०००० कोटी तारे आहेत असे म्हणतात. एक मूठभर सजीव मातीत(सॉईल) तेवढेच सूक्ष्मजीव(मायक्रोब) आहेत. पण मानवाला त्या सूक्ष्मजीवांची फार कमी माहिती आहे. त्यामुळे मातीखाली काय चाललय हे समजून मातीला सजीव ठेवणे फार महत्वाचे आहे. मानवाच्या शरीरात १०० ट्रिलियन (१०० लाख कोटी, ट्रिलियन = १० चा १२ घात) पेशी(सेल्स) आहेत, त्यातील ९० ट्रिलियन पेशी(सेल्स) सूक्ष्मजीव (मायक्रोब) आहेत. त्यासाठी तुम्ही अभ्यास करणार, दवाखान्यात जाणार, मग मातीच्या खालचे सूक्ष्मजीव(मायक्रोब) शेतकरी का शिकत नाही? १०००० BC - मानवाने जंगले बोडखी करून शेती सुरु केली त्यानंतर त्याचे पोट भरल्यावर कित्येक शतकांनी त्याचे ताळमेळ नसलेले गटबाजीचे देवधर्म, आध्यात्म्य आले. निसर्ग ही सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. निसर्गाबरोबर काम कराल, शेतीला शून्य/कमी खर्च आहे, निसर्गाविरुद्ध काम कराल, खर्चच खर्च आहे.

शास्त्रीय संशोधन
लोकांच्या पदव्या/डिग्री आणि किती शास्त्रीय संशोधन/रिसर्च पेपर्स लिहिले या आच्छादनाचा(पॅडींग) मूलभूत शास्त्राशी काही संबंध नाही. बरेचसे रिसर्च पेपर्स व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी आणि पाठ खाजवाखाजवी (पिअर रिव्ह्यू) साठी लिहिले जातात, बरेचसे स्वतःचे यश दाखवण्यासाठी. आजकाल तर कुठून काहीही डेटा आणि तेच तेच संदर्भ घेऊन काहीही रिसर्च पेपर लिहितात. व्यावसायिक/सामाजिक श्वेतपत्रिकांना तर ताळमेळच नाही. मी शाळेत होतो तेंव्हा वहीत हागुन ठेवू नको असे म्हणायचे चांगले शिक्षक. आजकाल तर PhD/MBA/Engineer झालेले इतके हागुन ठेवतात, कि इतक्या प्रतिष्ठित शाळेत ते कसे गेले हेच समजत नाही.


आदर्श/शाश्वत सोडा, अहमदनगर जिल्ह्यात किती शास्त्रीय विचारसरणीची गावे आहेत? ०/१/२?
https://youtu.be/CSEGj-GNIcw

#अहमदनगर जिल्ह्यात गावागावात श्रमदानाने मोफत पाणलोट कसे निर्माण करावे? #Ahmednagar
https://youtu.be/KQwhdfuhnV4

झिरो बजेट नैसर्गिक शेती
https://www.youtube.com/playlist?list=PLVnvxWY3x8ipjSYbYWkuCdyZN6jcxTrhA
https://www.youtube.com/watch?v=wkwD9gmcG2Q
https://www.youtube.com/playlist?list=PLEF3AC2CFE07692A4
https://www.youtube.com/watch?v=twHvNi6Z0E0
https://www.youtube.com/watch?v=kb_t-sVVzF0

सॉईल मायक्रोबायॉलॉजी
https://www.youtube.com/watch?v=GEtl09VZiSU
https://www.youtube.com/watch?v=i5S88OKrEQU

सॉईल मायक्रोबायॉलॉजी/शाळेसाठी दारात/घरात शेतीचे शास्त्रीय प्रयोगास करण्यासाठी स्वस्त मायक्रोस्कोप कसा आणणार? फोल्डस्कोप? https://www.youtube.com/watch?v=KpMTkr_aiYU

जमिनीची सुधारणा कशी करावी?
https://www.youtube.com/watch?v=9yPjoh9YJMk

Cowspiracy - Meat, Grain, Water, Dairy, Methane, Cowdung
https://www.youtube.com/watch?v=_wwNnCjIfmU
https://www.youtube.com/watch?v=zJD4iGOgVp0
Photo

#अहमदनगर जिल्ह्यात गावागावात/गल्लीबोळात लोकसंख्या वाढवणारे टुकार नकोत - ना कला/संस्कृतीची जाण, ना शास्त्राची सखोलता, ना खेळाचे कौशल्य, ना जिल्ह्याचे ज्ञान. अहमदनगर जिल्ह्यात १५०० गावात २ आदर्श गावे? ५/१० असतील कदाचित. बाकीची गावे का नाहीत आदर्श गावे आणि शास्वत(sustainable) देखील? भारताची ६ लाख गावे? गावाचे अर्थशास्त्र जागतिक पातळीवर समजणारी गावे - गावातला पैसा गावात? शेतीत दोन्ही बाजूची भांडवलशाही (उत्पादन आणि विक्री) समजणारी गावे? राजकारण आणि बाजारीकरण यांनी मिळून भारताच्या गावागावात सामाजिकरणाची वाट लावली काय? महाराष्ट्रात खाजगी पेटन्ट विरहित बेसिक सायन्स/मूलभूत विज्ञान हवय. अहमदनगर जिल्ह्यात गावागावात शास्त्र समजणारे शेतकरी हवेत. सेंद्रिय आणि रासायनिक शास्त्राचे दुष्परिणाम समजून घेणारे, मायक्रोबायोलॉजि वाचणारे. डॉक्टरकीची पुस्तके घरी बसून अभ्यास करणारे, शास्त्रीय वादविवाद घालणारे, शेतीचा/जमिनीचा छोटासा तुकडा बाजूला ठेवून त्यावर विविध शास्त्रीय प्रयोग करणारे, शास्त्रात चुका काढून नवीन शास्त्रीय शोध लावणारे शेतकरी हवेत. झिरो बजेट शेती म्हणजे रासायनिक (Chemical)/सेंद्रिय (Organic) शेती नव्हे.
#Ahmednagar
https://www.youtube.com/playlist?list=PLklxJFZkKFrMWB3rTyT8UROOhnMYegmED
Wait while more posts are being loaded