Profile cover photo
Profile photo
Ranjeet Paradkar
473 followers
473 followers
About
Posts

Post has attachment
~ ~ असामान्य माणसाची अविश्वसनीय कहाणी - झीरो (Zero - Movie Review) ~ ~

ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. हे लोक प्रयोग करतात पण त्यातही त्यांनी निवडलेलं पात्र हे 'लार्जर दॅन लाईफ'च असते. सामान्य माणसाच्या जवळ जाणारं पात्र साकारण्याचा प्रयत्न अजून तरी होताना दिसत नाही. प्रयोगशीलतेच्या नावाखाली अजूनही स्टार लोक असामान्य माणसांची सामान्य कहाणी किंवा सामान्य माणसाची असामान्य कहाणीच सादर करताना दिसतात आणि नेमकं असंच काहीसं 'झीरो'बाबतीतही आहे. किंबहुना, 'झीरो' अजून एक पाउल पुढे जाऊन 'असामान्य माणसाची असामान्य, नव्हे अविश्वसनीय कहाणी' सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. प्रेक्षक पुन्हा एकदा एका कुठूनही कुठेही पोहोचणाऱ्या सिनेमाबद्दल शाहरुखवर टीकेची झोड उठवू शकतात, उठवत आहेतही. मात्र, गंडला असला तरी प्रयोग करण्याचा प्रयत्न तर केला आहे, ह्याचा विसर पडायला नको. कारण हीच भूमिका शाहरुखऐवजी कुणा दुसऱ्या नटाने साकारली असती, तर फसलेला असला तरी प्रयोग केल्याबद्दल त्याला दाद, शाबासकी सगळं नक्कीच मिळालं असतं. असा विचार मनात आल्यावर, प्रस्थापितांवर टीका करत असताना बहुतेक वेळा आपण अभावितपणे वाहवत जात असतो, असा एक संशयही स्वत:विषयी निर्माण होतो.

.

.

.

.

.

.

- रणजित पराडकर
Add a comment...

Post has attachment
असामान्य माणसाची अविश्वसनीय कहाणी - झीरो (Zero - Movie Review)
२०१८ संपल्यात जमा आहे. ह्या वर्षीच्या यशस्वी-अयशस्वी सिनेमांचा विचार केला तर दोन ठळक बदल अगदी स्पष्टपणे जाणवतात. एक म्हणजे सिनेमा बनवणारे अधिकाधिक प्रयोगशील झाले आहेत आणि दुसरा म्हणजे प्रेक्षक ह्या प्रयोगशीलतेकडे पाहताना स्टारव्हॅल्यूचा विचार कमी करायला लाग...
Add a comment...

Post has attachment
ह्या सगळ्यावरून एक स्पष्टपणे लक्षात येतं की स्वातंत्र, मोकळीक मिळून काही उपयोग नसतोच. उलट ती एक अजून मोठी जबाबदारी असते. पिसाळल्यासारखं, वखवखल्यासारखं अनावश्यक चित्रण करत सुटणं म्हणजे त्या स्वातंत्र्याला ओरबाडणं झालं. ह्याच्या आधी हा अनुभव 'सेक्रेड गेम्स'मध्ये आला होता. अनुराग कश्यपच्या बहुतांश सिनेमांमध्ये येतच असतो. मोकळीक मिळाली की भडक हिंसा आणि सेक्स दाखवणं, हा अगदी सोपा मार्ग आहे. ह्या मोकळीकीचा वापर करून काही नाविन्यपूर्ण किंवा वादग्रस्त विषय, जे एरव्ही हाताळता येणार नाहीत, ते कुणी हाताळत नाही कारण ते अवघड असेल. सोपं हेच आहे की फाडा पोटं, उडवा मुंडकी, काढा कपडे, झवा मागून पुढून ! हिंसा आणि सेक्स अगदी सहज विकले जातील म्हणून दाखवायचे, इतका सरळसाधा व्यावसायिकपणा ह्या मागे असून, त्यावर उद्या सेन्सॉरची गदा आली की मात्र ह्याच व्यावसायिकपणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवणार.

'मिर्झापूर' हा ह्या हलक्या विकृत व्यावसायिकतेचा अजून एक किळसवाणा, तिरस्करणीय चेहरा आहे. हा चेहरा सर्जनशील वगैरे अजिबात नसून मिळालेलं स्वातंत्र्य ओरबाडून उपभोग घेण्यासाठी वखवखलेला आहे.
Add a comment...

Post has attachment
नाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)
चालून आलेलं ऐश्वर्य, सत्ता असतानाही केवळ स्वत:च्या नाकर्तेपणाने त्यावर बोळा फिरवण्याची अनेक उदाहरणं इतिहासातही आहेत आणि आपल्या अवतीभवतीही.  सर्व तऱ्हेची मोकळीक, मुभा असताना, चांगले रिटर्न्स मिळत असताना आणि बजेटचीही विशेष चिंता नसतानाही भारतीय सिनेमेकर्स वेब...
Add a comment...

Post has attachment
पाऊस, अंधार आणि एकटेपण, ह्या तिन्हींत एक समान धागा आहे. अजूनही असतील, पण एक नक्कीच आहे. तो म्हणजे 'भय'. अंधार आणि एकटेपणातल्या भयाचा अंश चित्रपटांतून व कथांतून अनेकदा समोर येतो, आला आहे. 'पाऊस' मात्र फार क्वचित अश्या रुपात समोर आला आहे.
'सत्या' मध्ये पावसाची एक मुख्य भूमिकाच होती. तो पाऊस 'सत्या'मध्ये मुंबईची ओळख देत होता. कथानकातल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात त्याची उपस्थिती, त्याची साक्ष होतीच. चित्रपटात पावसाचा इतका प्रभावी वापर 'सत्या'नंतर आत्ता वीस वर्षांनंतर 'तुंबाड' मध्ये दिसतो. अर्थात पावसाच्या ह्या दोन्ही भूमिका पूर्णपणे भिन्न आहेत. 'तुंबाड'चा पाऊस अनिश्चिततेचं गूढ भयप्रद सावट आणणारा आहे. त्याच्या सततच्या कोसळण्यातून एक उद्गार ऐकू येत राहतो. तो उद्गार हृदयाचा स्पंदनं वाढवतो, मन अस्थिर करतो. त्याचं कोसळणं नेहमीच अशुभ वाटतं आणि तरीही त्यात एक प्रकारची विचित्र अपरिहार्यताही अटळपणे जाणवत राहते. 'तुंबाड'च्या कथेचा अनन्यसाधारण महत्वाचा भाग - भय - हा ह्या पावसाने 'अंधार' आणि 'एकटेपणा'च्या जोडीने समर्थपणे पेलला आहे.
हे भय, ही भीती वेगळ्या प्रकारची आहे. तिचा जन्म लोभ, लालसेतून झाला आहे. इथली अमानवी शक्ती भुताची नसून देवाची आहे. इथला मनुष्य फक्त स्वत:च घाबरत नाही, तो त्या अमानव्यालाही घाबरवतो. किंबहुना, भय विरुद्ध भय असा हा सामना आहे, ज्यात अर्थातच भयाचाच विजय होणार असतो आणि होतोही.

Add a comment...

Post has attachment
अभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)
पाऊस, अंधार आणि एकटेपण, ह्या तिन्हींत एक समान धागा आहे. अजूनही असतील, पण एक नक्कीच आहे. तो म्हणजे 'भय'. अंधार आणि एकटेपणातल्या भयाचा अंश चित्रपटांतून व कथांतून अनेकदा समोर येतो, आला आहे. 'पाऊस' मात्र फार क्वचित अश्या रुपात समोर आला आहे. 'सत्या' मध्ये पावसाच...
Add a comment...

Post has attachment
~ ~ हार्मनी विथ ए. आर. रहमान (Harmony with A. R. Rahman) ~ ~

.

.

.

.

To conclude, 'हार्मनी' मला सिनेमॅटिकली जास्त आवडलं. पाचपैकी दोन एपिसोड तर म्युझिकली फारच कमी पडल्यासारखे वाटले. सर्वोत्तम एपिसोड डागरसाहेबांचा. Shows why Classical Music is the supreme.
माझी ह्या सिरीजने निराशा झाली कारण 'रहमानसाठी पाहणं' म्हणजे 'संगीतासाठी पाहणं' असतं, छायाचित्रणासाठी नव्हे. छायाचित्रणाचं काम अफलातून झालं आहेच, पण सिरीजचं नेमकं प्रयोजन जर त्या त्या भागातील संगीत आणि त्यांचं त्या त्या भागातील निसर्गाशी नातं उलगडणं हे असेल, तर त्यात एक असमतोल नक्कीच आहे. भारतीय सिनेसंगीत एकसुरी आणि सामान्यत्वाकडे वेगाने घसरत चालले असतानाच्या काळात 'ए. आर. रहमान' एक वेगळा साउंड आणि वेगळं सृजन घेऊन समोर आला होता. He was a Knight in Shining Armour. अधूनमधून त्याने काही अदखलपात्र कामं जरी केली असली, तरी आजही 'रहमान' हे नाव संगीतास्वादकांसाठी अपेक्षांच्या एका मोठ्या उंचीवरच आहे. प्रत्येक वेळी, जसं सचिनकडून शतकाची अपेक्षा असायची, तशी रहमानकडून जादूची अपेक्षा असते. पाच भागांच्या ह्या वेब सिरीजमध्ये असे जादूचे क्षण शोधत राहावे लागले, हा माझा अपेक्षाभंग आहे. 'रहमान'ऐवजी दुसरं काही नाव असतं, तर कदाचित ह्याच निर्मितीने मला अधिक जास्त आनंद दिला असता.

- रणजित पराडकर
Add a comment...

Post has attachment
हार्मनी विथ ए. आर. रहमान (Harmony with A. R. Rahman)
ही 'अॅमेझॉन प्राईम'वर रिलीज झालेली पाच भागांची एक सिरीज. ह्यात ए. आर. रहमान भारतातल्या चार वेगवेगळ्या राज्यांतल्या चार कलाकारांशी संवाद साधून, त्यांच्या कलेशी ओळख करून व करवून देतो आणि पाचव्या भागात हे चार जण चेन्नईला रहमानच्या स्टुडीओत येऊन रहमान आणि त्याच...
Add a comment...

Post has attachment
पहारा
तुझ्या प्रश्नांमधे असते भयानकशी अनिश्चितता तुला उलथायची असते स्वत:च्या आतली सत्ता नवी अन् वेगळी किंमत असे प्रत्येक बदलाला  कधी मोजायची असते, कधी साभार नशिबाला कुणाला काळजी नाही, कुणी ना चौकशी करते तुला पाहून हळहळते, असे नाही कुणी येथे जराशी भूल घेण्याला मना...
Add a comment...

Post has attachment

एकंदरीत, मूळ चित्रपटातील पसरटपणा वगळणारा, तसेच त्याला बऱ्यापैकी मवाळ करणारा 'धडक', एक स्वतंत्र चित्रपट म्हणून ठरवलं तरी पाहता येत नाही. 'सैराट'च्या प्रेमात पडलेल्या लोकांना प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा जरी दाखवली, तरी ते आवडणार नाहीच, त्यामुळे उत्कटतेत नव्हे तर तीव्रतेत कमी असणारी ही प्रतिमा पसंतीस उतरणं कठीण आहे. मात्र, जर तुम्ही (माझ्याप्रमाणे) 'सैराट'ला 'एक बरा चित्रपट'हून जास्त काही मानत नसाल, तर 'धडक' नक्कीच पसंतीस उतरू शकतो. कारण जवळजवळ २० टक्क्यांनी कमी केलेली लांबी, हे 'धडक'चं बलस्थान खूप महत्वाचं आहे. 'धर्मा'चा असल्यामुळे निर्मितीमूल्यही वाढीव आहे. ते छायाचित्रणातून स्पष्ट जाणवतं.

'सैराट' एकदा पाहून विसरून गेलेल्यांनी 'धडक'ही एकदा पाहून विसरून जाण्यास हरकत नसावी.
Add a comment...
Wait while more posts are being loaded