Profile cover photo
Profile photo
Rahul Taigade
49 followers
49 followers
About
Rahul's posts

Post has attachment
Home

Post has attachment
Photo

पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा
पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा ........|| धृ. ||

देवाच्या पुढे अगरबत्तीची किटाळ
पोरांचा अभ्यासक्रम झाला रटाळ
बापाच्या खिशात नाही रुपडे
पोरग मागतंय क्लाससाठी कपडे (१ )

पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा ............................

क्लासेसच्या फिया (Fees) खोऱ्याने भरा
पोरांच्या नापास होण्याच्या अजब तऱ्हा
संकष्टी एकादशीला ठेवायचा उपास
देवाला विनवायच मला कर पास (२)

पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा ............................

मार्च ऑक्टोबर मार्च वाऱ्या
पोरांचा पालक म्हणतोय प्रगती करा
दहावी पास होताना चाललीय मारामार
पोरांचा पालक म्हणतो नाव बोर्डात आण (३)

पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा ............................

SC , NT ,OB ची गणित
admission च्या रांगेत वेगळीच रीत
देवाच्या दारा !!!! बाळ... हळूच रडा
admission नाहीतर suicide करा (४)

पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा ............................

नवमाही सहामाही सराव परीक्षा
झिजत राहा मागून भिक्षा
अरे !!!!! देवाच्या मना कळलंय जना
admission च्या वाटेवर donations चा जिना (५)

पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा ............................

साऱ्यांच्या अपेक्षांचं वजन वहा
जगाला म्हणायचं, या तमाशा पहा
नोकरीच्या वाटेवर उपरती झाली
दिलेल्या परीक्षांची पावती मिळाली (६)

पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा ............................

ऐका हो !!!!!! सरकार शिक्षण मंडळाच्या बाळा
नका फुलवू सुशिक्षित बेरोजगारांचा मळा
अरे.., पैसा द्या टीचभर पण पोटाला भाकर
नका बनू पोरांना परीक्षांनी पत्त्यातला जोकर (७)

पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा
पाहू तिथे जाऊ तिथे आहे घोटाळा ...........................



WebRep
Overall rating

WebRep
Overall rating


"निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते, प्रश्न कळत नाहीत आणि
उत्तर चुकत जाते,वाटतं सुटत गेला गुंता,पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत
जाते"
Wait while more posts are being loaded