Profile

Cover photo
Verified name
Loksatta Live
10,867 followers|1,454,825 views
AboutPostsPhotosYouTube

Stream

Loksatta Live

Shared publicly  - 
 
ऑनलाइन शॉपिंग कम्युनिटी संकेतस्थळे 
ई-व्यवहार संकेतस्थळ आणि ग्राहक यांच्यातील दुवा असला तरी तो ग्राहकांनी ग्राहकांसाठी तयार केलेला आहे. यामुळे यामध्ये ग्राहक एकमेकांना योग्य मार्गदर्शन करून फसवणुकीचे प्रमाण कमी करू शकतात. याचबरोबर कोणत्या वेळी कोणती गोष्ट खरेदी केल्यास ते अधिक स्वस्त पडेल याचा तपशीलही या माध्यमातून मिळतो. यामुळे ही संकेतस्थळे मार्गदर्शक संकेतस्थळ म्हणून ओळखली जातात. याचबरोबर या संकेतस्थळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणाऱ्यांनाही आपण शॉपिंग सल्लागार असल्यासारखे भासते. http://loksa.in/MYP157309 
 ·  Translate
1
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
‪#‎Loksatta‬ नेटकौल : दाऊदच्या अटकेच्या मुद्यापासून घुमजाव करणा-या भाजपने जनतेची फसवणूक केली आहे, असे वाटते का? 
 ·  Translate
1
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
जगभरातील समीक्षकांनी गौरवलेल्या, देशातील सवरेत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय सन्मान मिळालेल्या कलाकृतीमागची लेखिका, घराघरात बघितल्या जाणाऱ्या लोकप्रिय मालिकेची पटकथाकार..चित्रपट, नाटक, मालिका या सर्व माध्यमांमध्ये यशस्वीपणे वावरणारी लेखिका- अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी बुधवारी (दिनांक ६ मे)'व्हिवा लाउंज'च्या व्यासपीठावर येणार आहेत. मधुगंधाने लिहिलेल्या 'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटामागची तिची कथा या निमित्ताने उलगडणार आहे. http://loksa.in/hBV157279
#MadhugandhaKulkarni   #Viva   #Loksatta   #Marathi   #News  
 ·  Translate
1
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
यंदाही राज्याच्या बहुतांश भागांत पाण्याची तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरूच आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविताना केले जाणारे गैरव्यवहार थांबविण्याची कोणतीही नवी यंत्रणा नव्या सरकारकडेही नाही. या पाश्र्वभूमीवर राज्यातील पाण्याचे चित्रमय, भेदक वास्तव. सर्व छायाचित्रे पाहण्यासाठी भेट द्या: http://loksa.in/XbL157219
#Loksatta   #Maharashtra   #Drought   #Water   #SaveWater  
 ·  Translate
2
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत बसवले जाणार असून दुरदर्शनवर लवकरच मोदी यांच्या समाजावर आधारित मालिका येणार आहे. मोदींच्या घांची तेली समाजाचा इतिहास या मालिकेतून दाखविला जाईल. चित्रीकरणाची सुरुवात एका तेली मुलाने झाली. त्याची आई त्याला तेली समाजाचा इतिहास, चंद्रगुप्त, अशोका आणि मोदी यांच्याबाबत सांगत असल्याचे दृश्य चित्रीत करण्यात आले. ही मालिका १२८ भागांमध्ये प्रसारित होईल. ऑक्टोंबरमध्ये ही मालिका दुरदर्शनवर झळकेल असे सूत्रांनी सांगितले. http://loksa.in/Uuo157183
#NarendraModi   #Doordarshan   #Loksatta  
 ·  Translate
3
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
खरा इतिहास सांगणाऱ्यांना यमसदनी पाठविले जाते आणि शिवशाहिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो, हे जितेंद्र आव्हाड यांचे वैयक्तिक मत आहे, मात्र ती पक्षाची भूमिका नाही, असेही पवार यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. मात्र बाबासाहेब पुरंदरे इतिहासकार नसल्याच्या आव्हाड यांच्या मताशी पवारांनी सहमती दर्शविली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या कार्यक्रमानंतर त्यांनी संवाद साधला. http://loksa.in/cBr157180
#History   #BabasahebPurandare   #Loksatta  
 ·  Translate
2
Add a comment...
Have them in circles
10,867 people
Iswar Ram's profile photo
dolly nair's profile photo
Neelima Nekuri's profile photo
sarfaraz ahmad's profile photo
Rahul Pandya's profile photo
yuva kishore's profile photo
yegnaprabha b's profile photo
rakesh barkul's profile photo
BHARAT KUMAR's profile photo

Loksatta Live

Shared publicly  - 
 
मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाणाची काहीच माहिती नसल्याचे सांगत केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत घुमजाव केले. दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे याबाबत काहीच कल्पना नसून त्याच्या ठावठिकाणाची माहिती मिळताच त्याला अटक करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले जातील, अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत दिली. सत्तेत येण्याआधी भाजप सरकारने दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा केला होता. इतकेच नव्हे तर, सत्तेत आल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत दाऊद जेरबंद असेल असे वक्तव्य देखील भाजप नेत्यांनी केले होते. http://loksa.in/Kit157302 
 ·  Translate
1
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
नोकरीच्या शोधात मुंबईत आल्यानंतर भाजी विक्रेता ते मुंबई काँग्रेसचा 'चेहरा' असा नाट्यमय राजकीय प्रवास राहिलेल्या कृपाशंकर सिंह यांचे भविष्य बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामुळे अंधारात सापडण्याची शक्यता आहे. कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ९५.०३ कोटींची संपत्ती जमवली असून यातील १८.९६ कोटींची मालमत्ता बेहिशेबी असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने कृपाशंकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. यामध्ये त्यांच्या बेनामी सदनिका, गाड्या, बॉलीवूड कलाकार आणि बड्या व्यक्तींना दिलेली कर्जे यांचा उल्लेख करण्यात आला असून हा एकूण तब्बल ३२० कोटींचा घोटाळा असल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. http://loksa.in/LjW157247
#KripashankarSingh   #Mumbai   #Loksatta  
 ·  Translate
1
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
* तुम्ही तुमच्या आयफोनच्या अ‍ॅपमधील माय वॉचमध्ये जाऊन घडय़ाळाच्या सेटिंग्समध्ये बदल करू शकता. पण सुरुवातीलाच त्यावर खूप वेळ खर्च करू नका. तुमच्या लाईफस्टाइलमध्ये हे नवीन घडय़ाळ कसे फिट होते याचा काही दिवस अंदाज घ्या. सुरुवातीला फोनवर असलेल्या गोष्टींसोबत घडय़ाळाचे नोटिफिकेशन्स जुळतील. पण ते तुम्हाला फारच त्रासदायक वाटायला लागलं तर त्यातील घडय़ाळावर नको असलेले नोटिफिकेशन्स केवळ फोनवरच दिसतील असा बदल तुम्ही सेटिंगमध्ये करू शकता.
* ई-मेलसाठी तुम्ही काही महत्त्वाचे ई-मेल आयडी व्हीआयपी लिस्टमध्ये टाकून त्यांचेच मेसेजेस तुमच्या घडय़ाळामध्ये दिसतील अशी व्यवस्था करू शकता. 
सविस्तर वाचा: http://loksa.in/hPH157188 #AppleWatch #iPhone #Loksatta  
 ·  Translate
1
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
#‎Loksatta‬ आजचे व्यंगचित्र - मंगळवार, ५ मे २०१५:  http://loksa.in/pNE157181 
 ·  Translate
1
Add a comment...
People
Have them in circles
10,867 people
Iswar Ram's profile photo
dolly nair's profile photo
Neelima Nekuri's profile photo
sarfaraz ahmad's profile photo
Rahul Pandya's profile photo
yuva kishore's profile photo
yegnaprabha b's profile photo
rakesh barkul's profile photo
BHARAT KUMAR's profile photo
Contact Information
Contact info
Email
Address
Express Towers, Nariman Point, Mumbai , Mumbai, Maharashtra, India 400021
Story
Tagline
Loksatta - A leading Marathi news daily
Introduction
Launched on January 14, 1948, Loksatta, has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. http://www.loksatta.com/