Profile

Cover photo
Verified name
Loksatta Live
173,766 followers|4,735,126 views
AboutPostsCollectionsPhotosYouTube

Stream

Loksatta Live

Shared publicly  - 
 
पोलिसांना सततच्या कामामुळे मोठय़ा प्रमाणात ताण निर्माण होतो, त्या ताणाला दूर करण्यासाठी पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचारी तंबाखूचे सेवन करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. यासाठी जागतिक तंबाखूरहित दिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए) या संस्थेने मुंबई पोलिसांसाठी ‘तंबाखूरहित मुंबई पोलीस स्टेशन’ ही मोहीम सुरू केली होती. एका वर्षांच्या मोहिमेत मुंबई पोलिसांच्या काही पोलीस ठाण्यांतील पोलिसांचे तंबाखू खाण्याचे प्रमाण ७०हून ४५ टक्के इतके झाले आहे. http://loksa.in/whO235352 
 ·  Translate
8
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
वर्ध्यामधील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला सोमवारी रात्री उशीरा अचानक लागलेल्या आगीत २ लष्करी अधिकाऱयांसह १७ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. दारुगोळा भांडारात लागलेल्या आगीनंतर भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता काही किलोमीटरवरूनही आगीचे लोट स्पष्ट दिसत होते. आगीत १७ जवान जागीच ठार झालेत, तर १९ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. http://loksa.in/fRB235325
 ·  Translate
1
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
#Loksatta सोमवार, ३१ मे २०१६ ई-पेपर वाचण्यासाठी भेट द्या: http://epaper.loksatta.com/

* खडसेंचा पाय खोलात! http://loksa.in/lqv235310
* दर्डा-गडकरी भेटीची तीव्र प्रतिक्रिया: http://loksa.in/Ktx235311
* दरेकरांच्या उमेदवारीने निष्ठावंत संतापले..: http://loksa.in/ZzM235309
* सीएसटी, एलटीटीवरील ताण कमी होणार: http://loksa.in/IQp235312
* तृप्ती देसाई यांच्यासाठी कक्ष नोंदणी वादात: http://loksa.in/Drc235313 
 ·  Translate
3
Add a comment...
Have them in circles
173,766 people
Deepika Adhikari's profile photo
vishal shingala's profile photo
Anuj Saroj's profile photo
ANIL KUMAR's profile photo
Pavithra Pv's profile photo
veto awomi's profile photo
kauser dsouza's profile photo
varun rao's profile photo
AWANISH TRIPATHI's profile photo

Loksatta Live

Shared publicly  - 
 
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन ही ‘एक अलबेला’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. भगवान दादांवर आधारित असलेल्या या चित्रपटात विद्याने अभिनेत्री गीता बाली यांची भूमिका साकारली आहे. नुकताचं या चित्रपटातील शोला जो भडके हे गाणे लाँच करण्यात आले. त्यावेळी विद्याला सर्वांनी मराठीत बोलण्याचा आग्रह केला. तेव्हा विद्या म्हणाली की, मला मराठी येतं, पण मी मराठीत बोलणार नाही. कारण मी जर मराठीत बोलले तर इतर अभिनेत्रींना असुरक्षित वाटेल. http://loksa.in/JBl235367 
 ·  Translate
1
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
‘राज्यमंडळामार्फत मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाने आजमितीस जाहीर केलेली नाही. काही प्रसार माध्यमांमार्फत मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) वापरून दहावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा अनधिकृतपणे प्रसारित करण्यात येत आहेत. त्या अनधिकृत तारखांवर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख प्रसार माध्यमे आणि मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल,’ असे निवेदन राज्यमंडळाने दिले आहे. http://loksa.in/xkI235335 
 ·  Translate
4
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
 
विकसित देशांत वर्णभेदाचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो आणि तसे कोणी करताना आढळले तर त्यावर कारवाई केली जाते. अब्राहम लिंकन याच्यासारख्या द्रष्टय़ाने वर्णभेदाविरोधात लढाई पुकारली त्यास अडीचशे वर्षे उलटून गेली तरी अमेरिकेतून हा मुद्दा पूर्णपणे निकालात निघालेला नाही. अमेरिकेसारख्या मुक्त देशांत ही परिस्थिती असेल तर भारताच्या मागासपणाचे इतके अप्रूप वाटावयास नको. तेव्हा आपले मागासलेपण हा मुद्दा नाही. तर ते घालवण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत की नाही, हा मुद्दा आहे. या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर नाही असेच द्यावे लागेल. मानवी प्रतिष्ठेस तिसऱ्या जगात किंमत नसते. किंबहुना तशी ती नसते म्हणूनच हे जग तिसरेच राहते. तेव्हा हे आपले तिसरेपण सोडावे अशी भारताची इच्छा असेल तर या असल्या प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी आणि तीत सातत्य हवे. याचे कारण हे असले बदल एका रात्रीत होत नाहीत. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. ती करण्याची गरज आहे. नपेक्षा आपले हे ‘काळे’ वास्तव बदलणार नाही. http://loksa.in/cgw235315 
 ·  Translate
6
Add a comment...

Loksatta Live

Shared publicly  - 
3
1
Arun Kumar  Gupta's profile photo
 
Sultanpur
Add a comment...
Loksatta Live's Collections
People
Have them in circles
173,766 people
Deepika Adhikari's profile photo
vishal shingala's profile photo
Anuj Saroj's profile photo
ANIL KUMAR's profile photo
Pavithra Pv's profile photo
veto awomi's profile photo
kauser dsouza's profile photo
varun rao's profile photo
AWANISH TRIPATHI's profile photo
Contact Information
Contact info
Email
Address
Express Towers, Nariman Point, Mumbai , Mumbai, Maharashtra, India 400021
Story
Tagline
Loksatta - A leading Marathi news daily
Introduction
Launched on January 14, 1948, Loksatta, has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. http://www.loksatta.com/