Profile cover photo
Profile photo
Krishi Vidnyan Kendra Sagroli
92 followers -
Building Sustainable Communities...
Building Sustainable Communities...

92 followers
About
Posts

Post is pinned.Post has attachment
KVK Sagroli - Krishi Tantradnyan Mahotsav - 2016
Add a comment...

Post has attachment
परभणी येथील सिंचन परिषदेत कृषी विज्ञान केंद्रा मार्फत शेतकऱ्यांचा सहभाग

परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालय व सिंचन सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने दि ३० ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या सिंचन परिषदेमध्ये पाणी व्यवस्थापना बरोबरच इतर लघुउद्योग व शेतीपूरक जोडधंदे इत्यादी विविध विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत नांदेड जिल्ह्यातील ५ प्रगतशील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत सहभागी करून या परिषदेचा लाभ मिळवून देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. व्यंकटेश्वरलू, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी हे लाभले होते. तर प्रमुख वक्ते म्हणून श्री विजय अण्णा बोराडे, डॉ. सुभाष टाळे, डॉ. भगवानराव कापसे, श्री माधवराव पाटील शेळगावकर, डॉ. सुरेश कुलकर्णी, श्री ज्ञानेश्वर बोडके, डॉ. स्मिता खोडके हे उपस्थित होते यांनी पाणी व्यवस्थापण व लोक सहभाग, पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक व्यवस्थापण, पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळबाग व्यवस्थापण, ग्राम स्वच्छता अभियान, देश विदेशातील पाणी व्यवस्थापण, विदेशी भाज्या उत्पादन, सोयाबिन प्रक्रिया आधारित व्यापारी उत्पादने या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान युसुफ इनामदार यांनी उभारलेल्या फळप्रक्रिया उद्योग व माधव शिंदे यांनी उभारलेली मिनीदालमिल या युनिटला भेट देण्यात आली. यात सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियांत्रिकी विभागाचे इंजी. वैजनाथ बोंबले यांचा सहभाग होता.
Photo
Photo
1/16/18
2 Photos - View album
Add a comment...

Post has attachment
कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे फुड फेस्टिवलचे आयोजन

सगरोळी येथे संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र येथे दि ६ जानेवारी २०१८ रोजी फुड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यात सगरोळी मधील बचत गटांच्या महिलां तसेच गृहिणींनी चटपटीत पदार्थांचे स्टॉल लावून आपला सहभाग नोंदविला.
महिलांना अन्नप्रक्रिया उद्योगा मध्ये असणाऱ्या संधीची ओळख व्हावी आणि त्या मधून होणाऱ्या नफ्याची जाणीव व्हावी यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी दरवर्षी फूड फेस्टिवलचे आयोजन करते. या मध्ये सगरोळी मधील बचत गटांच्या महिलांचा तसेच गृहिणींचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. भेळ, पाणीपुरी, समोसा, कचोरी, मच्युरीयन, मिरचीभजे, वडापाव, विविध प्रकारची सरबते व मिल्कशेक असे अनेक चविष्ट, चटपटीत पदार्थांचे स्टॉल महिलांनी फूड फेस्टिवल मध्ये मांडले होते. सगरोळी गावातील नागरिक आणि परीसरातील जवळपास १००० विद्यार्थीयांनी या पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रगती टेक्सटाईल्सच्या सौ. शांता हराळे, सौ. सुषमा मुत्तेपोड, सौ. सुनिता कोळनुरे आणि सौ. अंजली देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी सौ. अबोली देशमुख, सौ.श्रद्धा देशमुख, डॉ सुरेश कुलकर्णी डॉ. पराग तुरखडे, इंजी. वैजनाथ बोंबले. हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन प्रा. माधुरी रेवणवार आणि प्रगती टेक्सटाईल सगरोळीच्या सदस्यांनी पाहीले.
Photo
Photo
1/8/18
2 Photos - View album
Add a comment...

Post has attachment
Daily Sakal News Dated 01 January 2018
Photo
Add a comment...

Post has attachment
कृषी व्यवसायातून समृद्ध शेतकरी बनविण्याचा प्रयत्न...
व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षणाचे आयोजन

कृषी क्षेत्रातील सततच्या येणाऱ्या विविध संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांमध्ये भरवशाचे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणे काळाची गरज आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र नियमित व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करीत असते. या वेळी दि १२ ते १४ डिसेंबर २०१७ दरम्यान तीन दिवसीय निवासी “व्यावसायिक शेळीपालन” प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्यातून एकूण २२ पुरुष मंडळी उपस्थित होती. या प्रशिक्षणा दरम्यान शेळीपालनातील विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. महेश अंबोरे विषय विशेषज्ञ पशुवैद्यक शास्त्र कृषी विज्ञान केंद्र पोखरणी, डॉ गोविंद देवदे, पशुधन विकास अधिकारी मुखेड, डॉ. भूषण सदार विषय विशेषज्ञ पशुवैद्यक शास्त्र कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, प्रा कपिल इंगळे, प्रा व्यंकट शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान महत्वाचे असे अझोला उत्पादन, मुरघास, युरिया प्रक्रिया, हायड्रोफोनिक पद्धतीने चारा उत्पादन या विषयाचे प्रात्याक्षिके करून घेण्यात आली. कृषी निगडीत विविध विषयावर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ इंजी. वैजनाथ बोंबले प्रा माधुरी रेवणवार, प्रा. विवेक पतंगे यांनी माहिती दिली.
दि १४ डिसेंबर २०१७ रोजी समारोप प्रसंगी डॉ दत्ता मेहत्रे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, शेळीपालन पुस्तिका व माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उत्तम नियोजन संस्कृती संवर्धन मंडळाचे व्यावसायिक प्रशिक्षण विभागाचे संयोजक श्री संतोष उलगडे यांनी केले.

PhotoPhotoPhotoPhoto
12/19/17
4 Photos - View album
Add a comment...

Post has attachment
डोणगाव खुर्द येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

बिलोली तालुक्यातील डोणगाव खुर्द येथे संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र, आणि नाबार्ड अर्थ सहाय्यीत शाश्वत विकास प्रकल्पा अंतर्गत महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मदतीने दि. ६ डिसेंबर २०१७ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात ३१२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
डोणगाव खुर्द हे शंकरनगर पासून ११ किमी अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठीचा रस्ता देखील चांगला नाही तसेच वाहनांची देखील फारशी सोय नाही यामुळे गावकऱ्यांना कोणत्याही आजारासाठी दवाखान्यात येण्यासाठी अवघडच आहे. त्यातही महिला तर स्वतःच्या आरोग्याकडे कधी फारसे लक्ष देत नाहीत. शेतातील काबाडकष्ट आणि आहाराकडे दुर्लक्ष यामुळे महिलांना हाडांचा ठिसूळपणा, रक्तक्षयाचा त्रास होतो. ज्यामुळे कंबर, पाठ गुडघे दुखणे, चक्कर येणे, अशक्त पणा जाणवणे हे त्रास होतात. याचाच विचार करून संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र आणि नाबार्ड अर्थ सहाय्यीत शाश्वत विकास प्रकल्पान्तर्गत संस्थेचे पाणलोट विकास कामाचे दत्तक गाव डोणगाव खुर्द येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मदतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले.
या शिबिराचा डोणगाव खुर्द आणि परिसरातील ३१२ महिला, पुरुषांनी लाभ घेतला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत नांदेड येथील लोटस हॉस्पिटल चे डॉ. पंकज टोके, गणेश बंडे आणि त्यांच्या इतर स्टाफने रुग्णांची तपासणी करून मोफत औषधी वाटप केली. गंभीर आजारांसाठी पुढील मोफत उपचार या रुग्णांना मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डोणगाव खुर्द येथील श्री सदानंद कसलू यांचे आय ए एस अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सेवा निवृत्त मुख्याध्यापक एस.एम डोणगावकर, शाश्वत विकास मंचाचे जिल्हा समन्वयक मारोती वड्डे, पंचफुला वड्डे, चंपतराव व्होनशेट्टे, रामभाऊ माचापुरे, डी जि बनसोडे, शंकर वाघमारे, मारोती वाघमारे, रमादेवी व्यापारे आणि योगिता कांबळे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे व्यवस्थापण संस्कृती संवर्धन मंडळाचे प्रा. माधुरी रेवणवार, धम्मानंद लष्करे, कैलास सूर्य यांनी केले.
Photo
Photo
12/8/17
2 Photos - View album
Add a comment...

Post has attachment
Daily Agrowon News Dated 07/12/2017
Photo
Add a comment...

Post has attachment
Animal Exhibition At Petwadaj Tq Kandhar

Participated as member of judging committee in Animal Exhibition held at Petwadaj tq Kandhar on dated 2.12.2017 by Animal husbandry dept kandhar. Kandhar area is well known for pure Red Kandhari breed. Total 138 Animals participated in exhibition in different group. Dr.Bhushan sadar from KVK and Dr Bodemwad,Dr Katare from Animal Husbandry dept. are member of judging committee. Grampanchayat Petwadaj organised exhibition properly in collaboration with Gov vet clinic Petwadaj. Dr Bhivsnkar, LDO, Petwadaj take lots of efforts to organize this exhibition. Due to such type of animal exhibition farmers get aware and inspiration to rear pure good quality genom.
Photo
Add a comment...

Post has attachment
कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे जागतिक मृदा दिना निमित्य जमिन आरोग्य पत्रिका वितरण समारंभ आणि टरबूज लागवड व व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे दि ५ डिसेंबर २०१७ रोजी जागतिक मृदा दिना निमित्य जमिन आरोग्य पत्रिका वितरण व टरबूज लागवड व व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुनील देशमुख संचालक संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुंदरबाई मरखले, जिल्हा परिषद सदस्या नांदेड, मा लक्ष्मन ठक्करवाड, जिल्हा परिषद सदस्य नांदेड, दत्तराम पाटील बोधने उपसभापती पंचायत समिती बिलोली, सौ सुजाता सिद्नोड सरपंच सगरोळी हे लाभले होते तर डॉ तुकाराम मोटे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड, निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी बिलोली, विनोद गुंडमवार तहसीलदार बिलोली, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून अरुण घूमनवाड, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी नांदेड, निलेश गोडसे, सिंजेंटा इंडिया प्रा. लि., बालाजी मंगरुळे, सेल्स मॅनेजर स्मार्टकेम टेक्नोलॉजी प्रा. लि., यांची उपस्थिती लाभली होती .
या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ तुकाराम मोटे यांनी विविध कृषी विभागाच्या योजना विशेषता: रब्बी पिक विमा योजना, कृषी अभियांत्रिकी योजना व गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व कीटक नाशक फवारणी करतेवेळेस घ्यावयाची काळजी या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळावे असे आवाहन केले. अरुण घुमनवाड जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी नांदेड यांनी मातीचा नमुना कसा घ्यावा याविषयी माहिती दिली. तसेच सिंजेंटा इंडिया लि. चे निलेश गोडसे हे टरबूज लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञान व स्मार्ट केम टेक्नोलॉजी लि. चे बालाजी मंगरुळे यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी रासायनिक खत व्यवस्थापन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मा लक्ष्मन ठाकरवाड सदस्य जिल्हा परिषद नांदेड, मा दत्तराम पाटील बोधने उपसभापती पंचायत समिती बिलोली यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमा निमित्य बिलोली, धर्माबाद, देगलुर, तालुक्यातील २०५२ शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये दीपक फरटीलायझर लि, महिंद्रा ट्रॅकटर्स, न्यू हॉलंड ट्रॅकटर्स, उत्कर्ष अग्रो प्रोसेसींग सगरोळी व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी इत्यादिनी स्टॉल उभारून आपल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात मा श्री सुनील देशमुख यांनी केंद्र सरकारच्या जमिन आरोग्य पत्रिका अभियानाचे कौतुक करून लोक सहभागाचे आवाहन केले. देशी गोसंवर्धन व सेंद्रिय शेती याविषयी आपले अनुभव कथन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे माती व पाणी प्रयोगशाळा प्रमुख प्रा. कपिल इंगळे यांनी माती व पाणी प्रयोग शाळेची वाटचाल व जमीन आरोग्य विषयी भेडसावनाऱ्या समस्या मांडल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ दत्ता म्हेत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. व्यंकट शिंदे यांनी मानले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञानी व इतर सर्व कर्मच्यार्यानी परिश्रम घेतले.
Photo
Photo
12/5/17
2 Photos - View album
Add a comment...

Post has attachment
Photo
Photo
12/2/17
2 Photos - View album
Add a comment...
Wait while more posts are being loaded