Profile cover photo
Profile photo
GuruBirbal
16 followers -
प्रश्न पैशांचा आहे, विचारून पहा
प्रश्न पैशांचा आहे, विचारून पहा

16 followers
About
Posts

Post is pinned.Post has attachment
शाळेत असतांना अर्थशास्त्र क्वचितच कोणाच्या आवडीचा विषय असतो; मात्र दररोजच्या जीवनात पैशांबद्दलचे काही निर्णय घेताना – जसेकी शेअर बाजारात गुंतवणूक करताना, कर्ज घेताना, इन्कम टॅक्स भरताना, विमा काढताना किंवा नवनवीन घोटाळ्यांची नावे वाचताना मन शंका-कुशंकांनी भरून जातं.

आर्थिक जगाबद्दलचं ज्ञान एकतर मराठीत सहजरित्या उपलब्ध नाही अथवा ते क्षेत्रातील जाणकार मंडळींपुरतं सीमित आहे. ह्या आर्थिक जगाबद्दल पडणारे बरेचशे प्रश्न आणि त्यांचे निरसन आपल्या मातृभाषेत विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न म्हणजे गुरुबिरबल.

ज्यांना प्रश्न पडलेत आणि ज्यांच्याकडे त्याची उत्तरे आहेत अशा लोकांना आम्हाला जोडायचे आहे. असं करतांना आर्थिक साक्षरता, ज्याला आपण ‘फायनान्शिअल लिटरेसी’ म्हणून ओळखतो ती वाढवणे आणि अर्थ विषयक ज्ञान लोकांपर्यंत मराठीत पोहोचवणे हेच गुरुबिरबल चे ध्येय आहे.

www.GuruBirbal.com

Post has attachment
पैसे दुप्पट किंवा चौपट होण्यासाठी किती वर्ष लागतील, टर्म इन्शुरन्स (Term Insurance) किती असावा, निवृत्ती (Retirement) नंतर बचत किती असावी, शेअर मार्केट (Share Market), कर्ज ह्या बद्दल काही महत्वाच्या युक्त्या, पहा युक्तिशास्त्र.

Post has attachment
पहिल्या व्हिडीओ मध्ये सेन्सेक्स म्हणजे काय आणि कसा मोजतात हे पाहिल्यानंतर आता सोप्या शब्दात समजून घ्या फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय.

प्रश्न पैशांचा आहे, विचारून पहा - GuruBirbal.com

Post has attachment
सेन्सेक्स ने नवा उचांक गाठला, सेन्सेक्स वधारला, सेन्सेक्स गडगडला, सेन्सेक्स निर्देशांकात मोठी घसरण अशा बातम्या नेहमी कानावर येतात. पण सेन्सेक्स म्हणजे नेमकं काय?

प्रश्न पैशांचा आहे, विचारून पहा - GuruBirbal.com
Wait while more posts are being loaded