Profile cover photo
Profile photo
Darshan Vartak
118 followers -
Life is beautiful !!!!
Life is beautiful !!!!

118 followers
About
Posts

Post has attachment
The Pacific War Museum in Fredrickberg brings all the brutality of war to life. The war-crimes, the destruction, the fatality, the toll it has on everyday life and at the end the endless sufferings, all due to the race for power, to excel as a nation, as a race, to prove that we are stronger, better.

The question is how can we humans be so inhuman, how can somebody throw a crying child up in the air to be caught on his bayonet. How do you start training 12-year-olds to use weapons and train them to kill other humans? How can you set up a lab to test chemical weapons on fellow humans to see how quickly or slowly they die?

I feel blessed to have born in a free society, away from war. The economic wars would still continue, there would still be discrimination, but all that is still much gentler and acceptable than being physically tortured and being witness to millions of fellow humans being massacred and put to death by the cruelty of the so-called fellow humans. History teaches a lot for sure and its a hope that the so-called leaders of this world learn from it.
Photo
Add a comment...

Post has attachment
तुझे आहे तुजपाशीं

कधी जाणवलंय का कि आपण कधी कधी त्याच त्याच परिस्थितीमधून जातो,असे वाटते कि काहीतरी चुकते आहे पण कळत नाही आणि जरी कळले तरी जे काही बदल करायला हवेत ते केले जात नाहीत. खूप वेळा तर उत्तर शोधण्यासाठी आपण बाकी सर्व मार्ग अंगिकारतो पण आत्मशोधन करायचे टाळतो.

त्याच वेळी दुसर कोणी तरी जवळपास तुमच्या सारखीच परिस्थिती असूनही खूप काही साध्य करताना दिसतो आणि मग कारण शोधली जातात कि आपण तसेच सर्व का नाही साध्या करू शकत. पण कधी स्वतःशीच संवाद साधून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो काय?

खर सांगायचं तर खूप काही कठीण नसतं. रोज जस काम करता तसच करा, फक्त जाणीवपूर्वक स्वतःकडे लक्ष ठेवा. एका तिसऱ्या माणसाच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करा. आपण कुठे सुधारणा करू शकतो? काय केल तर आपण परिणाम लवकर मिळवू शकतो? नको त्या गोष्टीं वर आपण जास्त वेळ घालवत तर नाही ना? अशा गोष्टींचा विचार करून थोडे फार बदल केले तर खूप फरक पडलेला दिसेल.

छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक करू शकतात. मला तांत्रीक गोष्टीं पेक्षा लोकांशी सव्वाद साधणे जास्त आवडते काय? वाचून करण्यापेक्षा स्वतः एखादी गोष्ट करून पाहणे मला जास्त आवडते काय? माझी काम करण्याची क्षमता सकाळी जास्त असते कि संध्याकाळी? मी वेळेच भान ठेवतो काय? तांत्रिक बाबीत चांगला हातखंडा असूनही मी संवादाच्या बाबतीत कामी पडतोय काय? हाती असलेला वेळ आणि काम ह्याचा मी योग्य मेळ खळतोय का. अश्या आणि तत्सम प्रश्नांना स्वतः च्या अनुभवातून उत्तर शोधा.त्या त्या क्षेत्रात थोडे थोडे बदल करा. दुसऱ्याचे अंधानुकरण करून कधीही प्रगती साधता येत नाही.

सुरवातीला अस सगळं करणं खूप कठीण जाईल, कारण आपल्याला यंत्रमय काम करायची सवय झालेली असते. पण जर एक पाऊल पाठी घेऊन विचार करून पुढचं पाऊल टाकण्याची सवय लागली तर वाचणारा वेळ आणि शक्ती नककीच अधिक प्रगतीसाठी आणि अशा गोष्टींसाठी वापरता येईल ज्याच्यासाठी सध्या अजिबात वेळ नाही.

तसच असा विचार करा कि आता मी जे काही करतोय ते भावनाविवश होऊन करतोय कि त्या मागे काही धेय आहेत, ज्याचा पुढच्या ५- १० वर्षात काही फायदा होणार आहे काय? मनाचे स्थैय आणि नियंत्रण या ठिकाणी खूप मोठी भूमिका बजावते. थोड आजूबाजूला पाहिलेत तर लक्षात येईल कि अशी लोक खूप काही सध्य करतात. शिक्षणाचा अभाव असूंनही काही लोक खूप वेळा या गुणांमुळे जास्त प्रभावशाली जाणवतात, पण त्याच वेळी तीक्ष्ण बुद्धी असूनही चंचल मन असलेले लोक खूप काही साध्य करू शकत नाहीत.

सुरवातीला खूप काही बदल करू नकात किव्वा खूप काही अपेक्षा पण ठेवू नका, कारण तुम्ही मनावर काम करताय, वेळ तर लागणारच. कधी कधी हा सर्व व्याप नकोच असे देखील वाटणे स्वाभावीक आहे. "आपल्याला काही बिल गेट्स किंवा डॉ. अब्दुल कलाम थोडेच व्हायचे आहे" असं मनात येईल पण मग काहीच करायचे नाही का? बदल कधीही कठीण असतोच, पण जर आपले लांबचे ध्येय त्याने अधिक सोपं होत असेल, तर प्रयन्त तर जरूरीचे आहेत. सवय लागायला वेळ तर लागतेच पण एकदा सवय लागली कि ती मोडायला हि वेळ लागतो. छोट्या छोट्या पण चांगल्या सवयी तुम्हाला प्रगतीपथावर तर नेतीलच पण त्याच बरोबर एक मानसिक आनंदही देतील.

https://manachetarang.wordpress.com/2018/06/09/tuze-aahe-tujapaashi/
Add a comment...

Post has attachment
लेडी बर्ड जॉन्सन वाइल्ड फ्लॉवर सेंटर

लेडी बर्ड जॉन्सन वाइल्ड फ्लॉवर सेंटर म्हणजे २८४ एकर मध्ये पसरलेल,मूळच्या टेक्सास मधील अतिशय सुंदर अश्या रान फुलांनी नटलेलं आणि जगाला निसर्गाच्या संवर्धनाचा संदेश देणार नंदनवन. ऑस्टिन पासून साधारण १० मैलावर असलेल्या ह्या सेंटर मध्ये किमान ८०० जातींची वेगवेगळी झाड पाहायला मिळतात.

टेक्सास. विशेषतः ऑस्टिन मध्ये लेडी बर्ड हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतो. माजी सेकंड आणि नंतर फर्स्ट लेडी "Claudia Alta" ज्यांना प्रेमाने लेडी बर्ड म्हणत यांचं निसर्गावर भयानक प्रेम होत. मुळच्या टेक्सास मधील असल्याने त्यांचे टेक्सास मधील रान फुलांशी वेगळच नातं. अभिनेत्री हेलन हेस आणि लेडी बर्ड जॉन्सन यांनी १९८२ मध्ये सुरु केलेल हे सेंटर रान फुलांचं आणि स्थानिक झाडांच हे पाहिलंच संवर्धन केंद्र असावं. त्यांच्याच शब्दात सांगाच तर "सौंदर्य हे सौंदर्यप्रसाधनांच्या खूप पलीकडची गोष्ट आहे" (Beautification is far more than a matter of cosmetics)

नेहमीच्या चीर परिचित अशा गुलाब, ट्युलिप्स, लिलीच्या राजेशाही आणि मान्यताप्राप्त फुलांची वनस्पती उद्यान तुम्ही पहिली असतील, तर हे उद्यान तुम्हाला नक्कीच चकित करेल. वसंत ऋतू पूर्ण टेक्सास मध्ये एका मागून एक अशी सुंदर सुंदर फुलाची दुलई घेऊन येतो. सुरवातीला ब्लू बोनेट च्या निळाईत न्हाऊन निघाल्यानंतर पिवळ्या, केशरी आणि लाल अश्या कित्तेक रंगांच्या सुंदर फुलांचे ताटवे सर्वत्र फुललेले दिसतात. अश्याच या सुंदर फुलांचे माहेरघर म्हणजे हे सेंटर. टेक्सास च्या विविध भागातील दुर्मिळ अशा झाडांचं संवर्धन इथे चालत. इथल्या बोटॅनिकल गार्डन आणि आर्बोरेटम मध्ये अश्या किती तरी सुंदर रानफूलनाची आणि इतरही झाडांची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळेल

बोटॅनिकल गार्डन शिवाय इथल्या ट्रेल वरून फेरफटका मारताना तुम्हाला हि रानफुलं त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणात वाढताना दिसतील. वॉच टॉवर वरून फुलांच्या रंगांची हि लयलूट पाहायला मस्त वाटतं. तिकीट काढताना दिलेली माहिती पुस्तिका, लेडी बर्ड यांच्या जीवनावरचा माहितीपट आणि छोटंसं वाचनालय तुम्हाला ह्या सेंटर विषयी अजून खूप काही माहिती देत. शाळेतील मुलांसाठी इथे भरपूर कार्यक्रम आणि टूर्स उपलब्ध आहेत. ट्रेल वर परिसराची जैवविविधता दर्शविणारे प्राण्याचे पुतळे पाहायला मिळतात.

पार्टनरशिप, माहिती वाटप, बियाणे संग्रह आणि बँकिंग, दुर्मिळ वनस्पती निरीक्षण आणि संशोधन, आणि नागरिक विज्ञान यांच्या माध्यमातून चाललेला संवर्धनाचा यज्ञ खरोखर वाखाणण्याजोगा आहे.

https://manachetarang.wordpress.com/2018/05/05/lady-bird-wildflower-center
Add a comment...

Post has attachment
पोहेला बैसाख

एसकेपेड (Escapade) च्या दुसऱ्याच दिवशी मैत्रेयीचा पोहेला बैसाख, म्हणजेच साऊथ एशियन न्यू इयर फेस्टिवल मध्ये ओडीसी डान्स परफॉर्मन्स होता. ४ ते ६ डिग्री सेलसिअसच्या थंडीत हा कार्यक्रम कसा होणार हीच चिंता होती. पण कलेचे उपासक वर्षाकाठी एकदाच येणाऱ्या या फेस्टिवल मध्ये थंडीने थोडेच घाबरणार होते. आऊटडोअर थिअटर असल्याने सकाळच्या पावसाने कार्यक्रम सुरु व्हायला थोडा उशीर केला. पण एकदा चालू झाल्यावर एकामागून एक होणारे कलेचे अविष्कार प्रेक्षकांना मोहवून टाकत होते

आदल्या दिवशी एसकेपेड(Escapade) च्या निमित्ताने वेस्टर्न नृत्याचा आस्वाद घेतल्यानंतर इथे तर क्लासिकल, लोकनृत्य, बॉलीवूड, वेस्टर्न आणि फ्यजन अशा अनेक नृत्य प्रकारांची पंगत होती. थंडीला न जुमानता बॉलीवूडच्या ठुमक्यांवर गिरकी घेणाऱ्या आणि प्रेक्षकांनाही टाळ्या वाजवायला लावणाऱ्या त्या ४ ते ५ वर्षाच्या मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. बांगलादेश आणि बंगालच्या बंधू भगिनींनी सादर केलेले अस्सल बांगला नृत्य अतिशय मोहक तर संगीत निव्वळ श्रवणीय होते.

अग्नी च्या युवक युवतींनी ठेका घेत स्टेज चा कब्जा घेतला आणि नावाप्रमाणेच धडाकेबाज नृत्य सादर करून सर्वांची मन जिंकून घेतली. मॉंन्सून डान्स कंपनी बाल कलाकारांना प्रोत्साहन देत पुढची नृत्यप्रेमींची पिढी विकसित करताना दिसत होती तर सरगम डान्स किव्वा ओडिसी डान्स कंपनी भरत नाट्यम् आणि ओडीसी सारख्या क्लासिकल नृत्याची भारतीय परंपरा सांभाळत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होत्या

साऊथ एशियन फेस्टिवल असला तरी त्यात वेस्टर्न आणि फ्यजन नृत्त्यांची कमी नव्हती. बॉलीवूड च्या जोडीला हॉलिवूड देखील स्पर्धा करत होत आणि हि जुगलबंदी प्रेक्षकांना दोन्ही संस्कृतींच खूप छान दर्शन घडवत होती.

हा उत्सव खरया अर्थानें ऑस्टिनची मिश्रसंकृती अधोरेखित करत होता.फेस्टिवल ला दर वर्षी मदत करणाऱ्या ऑस्टिन चे मेयर स्टिव्ह अड्लर यांची उपस्थिती ह्या फेस्टिवल च महत्व दाखवते. भारतापासून दूर जगाच्या ह्या टोकाला भारतीय संकृतीचा हा उत्सव म्हणजे कलेच्या उपासकांना एक पर्वणीच होती. कुठचेही प्रवेश शुल्क न घेता कलेच्या प्रशंसकांच्या मदतीतून चालणारा हा उत्सव म्हणजे नवकलाकारांना त्याची कला सादर करायची एक सोन्याची संधी.असे कार्यक्रम राबवून लोकांना कलेची मेजावनी देणाऱ्या ऑस्टिन च्या कलोपासकांना मनापासून धन्यवात

- दर्शन वर्तक

https://manachetarang.wordpress.com/2018/04/21/pohela-baisakh
पोहेला बैसाख
पोहेला बैसाख
manachetarang.wordpress.com
Add a comment...

Post has attachment
Escapade

मैत्रेयीच्या शाळेतील जॅझ डान्स विषयाच्या च्या निमित्ताने अमेरिकेतील शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विविध नृत्यं प्रकारांची झलक पाहण्याचा योग आला. दर वर्षी 'इनटरसेक्शन"(Intersection) आणि "एसकेपेड" (Escapade) असे दोन कार्यक्रम "परफॉर्मिंग आर्टस् सेन्टर" च्या सभागृहात साजरे केले जातात. त्यात वेस्टवूड हाय स्कूल बरॊबरच अजूनही बरीचशी हाय स्कूल आणि मिडल स्कूल भाग घेतात.

सर्वात जास्त नमूद करायची गोष्ट म्हणजे कार्यक्रमाची सुसूत्रता. दोन तीनशे आर्टिस्ट्स, त्यांचे नातेवाईक, अगदी गाड्यांच्या पार्किंग पासून ते, प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या हातावर बांधायच्या बॅड्स पर्यंत, आर्टिस्ट्स चे व्यासपीठावरील प्रवेश आणि निर्गमन किव्वा मधल दहा मिनिटांच मध्यांतर, सर्व कस एकदम कळ दाबल्यागत चालत असते, त्यात कुठलीही गडबड नाही कि बोट दाखवायला जागा नाही

जॅझ, बॅले, टॅप, मेक्सिकन लोक नृत्य आणि इतरही अनेक "फ्यजन" नृत्य यांचे एकामागून एक सादर केले केलेले नृत्याविष्कार, वेस्टर्न नृत्याविषई फारशी माहिती नसली तरी डोळे खिळवून ठेवतात. कुठलहि नृत्य ३ ते ४ मिनिटांनपेक्षा मोठ नसत. काही क्लासिकल सोलो परफॉर्मन्स थोडे मोठे असले तरी उगाचच लांबवल्यासारखे वाटत नाहीत. कालच झालेल्या "Escapde" मधेही असेच काही सुंदर नृत्याविष्कार पहायला मिळाले. त्यात बॅले ची गोड नजाकत होती तर जॅझ मधील थोडस लाऊड वाटणार पण हालचालींच सिन्क्रोनायझेशन होत. टॅप डान्स मधील टाचांच्या लयबद्ध आवाजाचं संगीत आणि डान्सर्स च्या चेहऱ्यावरील आनंद क्षणभर त्या आनंदोत्सवात आपल्यालाही ओढून घेत.

सर्व नृत्याविष्कारात, सन डान्सर्स नि सादर केलेले आणि अगदी नाजूक शांत संगीताने सुरू करून तितक्याच नाजूक अभिव्यक्तीतुन हालचालींचा वेग वाढवत, हातांच्या आणि पदन्यासाच्या सिन्क्रोनायझेशन ने मोहवून टाकत नृत्याच्या अदाकारीतील परमसीमा गाठणारे असे कित्येक आविष्कार चांगलेच लक्षात राहतात. एखादी सन डान्सर् सोलो प्रकारातील सुंदर आविष्कार सादर करते तर काही सन डान्सर्स कलेचा परमोच्च बिंदू गाठत एखाद्या कथानकाला मूर्त स्वरूप देतात.

दि होल नाईन यार्डस या गाण्यावरच अतिशय वेगवान आणि लालित्यपूर्ण नृत्य सभागृहात वेगळाच उत्साह निर्माण करून गेल, तर चिअर लीडर्स नि सादर केलेल बऱ्याच प्रमाणात ऍक्रोबॅटिक वाटणार नृत्य खरोखर खूप कठीण होत. दोन डान्सर्सच्या हातावर पाय देऊन हवेत उंच उभ्या राहणाऱ्या आणि तितक्याच चपळाईने गिरकी घेऊन जमिनीवर अवतारणाऱ्या त्या मुली थोडीही चुक करत नव्हत्या

भडक रंगाचे, पायघोळ आणि घेरदार ड्रेसेस घालून केलेल मेक्सिकन नृत्य कार्निवल चा वातावरण निर्माण करत होतं. पण डोळ्यावर पट्टी बांधून एकही चूक न करता अतिशय सुंदर पार्श्व संगीतावर केलेले सन डान्सर्स चे नृत्य म्हणजे कार्यक्रमांचा अत्युच्य बिंदू होता

सन डान्सर्स हा प्रकार हाय स्कूल मध्ये खूपच मानाचा समाजला जातो. अगदी मिडल स्कूल पासून सुरवात करून आणि पूर्णपणे समर्पित होऊन वेगवेगळ्या वेस्टर्न नृत्यांचा अभ्यास केलेले सन डान्सर्स, हाय स्कूल मध्ये सर्वात ग्लॅमरस समजले जातात. सेलिब्रिटी समजल्या जाणाऱ्या सन डान्सर्सना विशेषतः सिनियर इयर मध्ये तर इयर बुक मध्ये खास प्राधान्य असते.

एकूणच स्कूल मध्ये स्पॅनिश,डान्स,बॅण्ड,कूकिंग,सॉकर,टेनिस असे विषय ऑपशन मधून सुद्धा कधी नसणाऱ्या मला इथल्या हाय स्कूल मधील हे सर्व विषय पाहून नकीच असूया वाटली. कदाचित सन डान्सर्स म्हणुन नाव मिळवणाऱ्या ह्या मुली नंतर नृत्यामध्ये करिअर करत नसतीलही, पण त्यांना त्या वयात मिळणारे हे अनुभव, त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि आई वडिलाना वाटणारा अभिमान पुढच्या करिअर मध्ये नक्कीच उपयोगी पडत असावा.

- दर्शन वर्तक

https://manachetarang.wordpress.com/2018/02/26/escapade/
Escapade
Escapade
manachetarang.wordpress.com
Add a comment...

Post has attachment
Mind

Think about this, you must have encountered this number of times. The same humans with almost the same conditions and skills happen to do so differently. They react differently, they have different achievements and they also have different motivations.

Many times, all these things keep happening around us, and still, we are not aware of it. In fact, we see these things, but really are not consciously paying attention.

Now we all say we have the brain, but we have something more abstract called as the mind. And to a large extent, this abstract entity shapes us and even our physical attributes can be the product of this entity. Having said that how much do we work towards it.

We go to gym, we eat food, we work to make money and most of it probably just to feed ourselves isn't it. But think really hard, is it really all about feeding yourself. You may add things like, feeding family, taking care of them and all other materialistic jazz to all this, as that's what comes to mind when we talk about life nowadays.

But those who really discover the power of mind and the beauty of its being, they make most out of life. It is that consciousness that can make you do things that you probably would never have imagined. People have worked on this thing for centuries and have produced amazing results. One can tune his mind to resonate with his goals, his existence as a whole and can give him that enormous power to achieve something which is not possible ordinarily.

There isn't any magic here. It's probably a step by step process of attaining that position where you have tuned your mind enough to be in control most of the time. Total control is just impossible, but even if you achieve 10% more control than what you have today, you could be 50% more productive and 80% more confident.

The steps are simple. Start working on your mind, start communicating with yourself, reserve some personal time just for yourself to peep into your mind. You may use tools like Yoga, meditation, aroma, music, mantra's, chanting etc. The final goal is to get this communication to the level, where you can start experimenting with yourself and making yourself flexible. Strengthening those mind's muscles to get more insight into your own mind and ultimately getting a better understanding of human nature.

The more you understand yourself, the more connected you would be to the outside world. The cobwebs would go away and the things that seemed irrelevant, bothersome or even showstopper, start disappearing and you might be able to see a little bit farther. You will start getting answers from inside and would start seeing new possibilities for yourself.

Most of the time, we as humans don't even want to pursue this path as it seems too abstract and too complicated. We keep going in circles to get things which are more materialistic. Things that give us wealth, fame, recognition and satisfy our ego.

But we don't realize on the way that all those things slow us down and keep us away from more worthy goals, like reaching our personal high, in terms of better health, fantastic relationships, a wonderful orator and motivator, an artist, a creator, a scientist, a writer, who can ignite fire in others or just a dedicated philanthropist who finds all his inner satisfaction in making someone smile.

Does seem to be too difficult in today's world, where job, family, personal aspirations take away most of our time and we do realize that we are in a vicious circle where there is no end. But at the same time, we keep running that race, even if it does not make any sense. We just want to keep up with the outside world and not to be outcasted.

But it’s never so late, before your mind starts yelling and you find yourself in a hollow, where you think you have everything, but there is this void that feels you when you are alone. It's time to slow down, look inside, follow your heart and start leading a life of confidence, freedom and more importantly satisfaction.

achievements, motivations, brain, mind, beauty of mind, confidence, freedom , satisfaction, communicating with yourself, Yoga, meditation, aroma, music, mantra's, chanting, orator, motivator, artist, creator, scientist, writer, conscious, abstract, look inside, possibilities,goals,existence, make most out of life, understand yourself

http://livethypassion.com/mind/
Mind
Mind
livethypassion.com
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
Add a comment...
Wait while more posts are being loaded